Dictionaries | References

कुरघोडी

   
Script: Devanagari

कुरघोडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kuraghōḍī f The posture of a man preparing to take another on his back. 2 The play of leap-frog. कु0 करणें g. of o. To deride, jeer, scout, trample upon; to ride over the back of.

कुरघोडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The posture of a man preparing to take another on his back. The play of leap-frog.
कुरघोडी करणें   To deride, jeer, scout, trample upon; to
ride over the back of.

कुरघोडी     

ना.  मात , वरचढपणा , वरचष्मा , वरताण , वर्चस्व .

कुरघोडी     

 स्त्री. १ दुसर्‍याला पाटीवर घेण्यासाठीं ओणवें होणें . २ एकापुढें एक पांच सहा जण ओणवे उभे राहुन अगदीं मागच्यानें पुढच्यांच्या पाठीवर थाप मारुन जाऊन बसण्याचा खेळ . ( क्रि० करनें ). ' शिवाय कुरघोड्या वेगळया ' - अफला २५ . ३ ( ल .) छी थु करणें ; पायाखालीं तुडविणें ; मात करणें ; वरचढपण गाजविणें ; ' स्वार्थ साधण्याकरितां ते दोघे एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या विचारांता होते .' - स्वप . ४ ( चेंडु ) एका बाजूचे गडी ऒणवे राहुन दुसर्‍या बाजूचे त्यांच्या पाठीवर बसतात व आपल्य पैकी एक कडुन चेंडु वर उडवितात , नंतर तो चेंडु ज्या बाजुचें गडी जिंकतील त्यांना डाव आला असें समजून त्यांना दुसर्‍या बाजुच्या गड्यांच्या पाठीवर बसावयास मिळतें .

कुरघोडी     

कुरघोडी करणें
मुलांच्या खेळांत कुरघोडी म्‍हणजे एकाने दुसर्‍याच्या पाठीवर स्‍वार होणें. (ल.) दुसर्‍यावर अधिकार गाजविणें
मात करणें. ‘स्‍वार्थ साधण्याकरितां ते दोघे एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या विचारांत होते’-स्‍वप ४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP