Dictionaries | References

कवतिक

   
Script: Devanagari
See also:  कवतीक , कवतूक

कवतिक     

ना.  आश्चर्य , कौतुक , नवल .

कवतिक     

 न. ( काव्य ) कौतुक ; नवल ; आश्चर्य ; लीला . ' एर्‍हवीं एकही नुरतीं भूतळीं । कवतिका लागीं । - शिशु ७०२ . ' आतां अर्जुना आणिकही येक । सांगेन ऐकें कवतिक । ' - ज्ञा २ . ३०३ . ' भणोनि तें वाणितां कवतिकें । वाचे सौरसु न देखे । ' - ऋ ३८ . ' एकु घरा नेउनि कवतिकें पांजरा घातला ' - पंच ५ . १ . ' अवधारिजे कवतीक ' - उषा २८ . ११ . ' रामकृष्णें केलें कवतुक गोकुळीं । गोपाळांचें मेळी गाई चोरी । ' - तुगा १६ . ( सं . कौतुक )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP