Dictionaries | References क कडसनी Script: Devanagari See also: कडसणी Meaning Related Words कडसनी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( काव्य ) चौकशी ; विचार ; वाटा . घाट ; परीक्षा ; शोध ; निवड . ' ये युक्तीची कडसणी । नाहीं जयाच्या अंतःकरणीं । ' - ज्ञा २ . ३४२ . ' बसउनि केली कडसणी । निज निष्ठेची । ' - रास ४ . २९१ . ' नित्यमुक्त आणि जीवन्मुक्त । हेहि कडसणी हे निभ्रांत । ते उपाधि आरोपित । म्हणुनच ॥ ' २ नाडा ; दोरी ( बटव्याची , गाडीवरील बोझा आवळण्याची पडद्याची , तंबुच्या कनातीच्या वरच्या भागाची इ० ). ' ऐसा सद्गुरु पूर्णपणी । तुटे भेदाची कडसणी ॥ ' - दा ७ . १ . १८ . ३ ( ल .) मंथन ; घुसळणें . ' करितां दधिकडसणी । मग नवनीत निर्वाणी । दिसें जैसें ॥ ' - ज्ञा २ . १२९ . ४ ( ल .) विचार ; भेद ; भेदभाव . ' मी तूं हे कडसणी । ' - विपु २ . ४१ . ' देव भक्त हे कडसणी । निरसोनि गेली । ' - दा ८ . ८ . ८१ . ५ ( ना .) धाकदपटशा ; तंबी ; दटावणी ; काच . ' तेथे द्वैतबुद्धिची कडसणी । ' - परमा २ . १९ . ६ चातुर्याची रचना ( बोलण्याची लिहिण्याची ), ( सं कृष ; प्रा . कडढ = खेचणें ; का . कडे = घुसळणें ?)०देणें ( व ) पखवाज किंवा तबला आवळून बांधणें .०घालणें कडसणींत धरणें - अडचणींत घालणें , पेचांत आणणें ; घोटाळ्यांत पाडणें . - स लागणें - उतरती कळा लागणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP