-
न. ( अप .) आंग
- शरीर ; देह .' पै जयाचेनि अंगसंगें । ' - ज्ञा ९ . २६९ . ' अंगाला वारा लागेल , आंत जा । '
- अवयव ; इंद्रिय ; गात्र . ' अति क्षीणता पावलीं सर्व आंगें . ' - दावि २४२ .
- ( ल .) कोणत्याहि गोष्टीचा घटक , विभाग ' हत्ती , रथ घोडेस्वार आणि पायदळ हीं प्राचीन काळीं सैन्याचीं चार अंगे समजलीं जात असत .'
- बाजू ; दिशा . दारा अंग =( व .) दरवाज्यामागें किंवा जवळ . ' आठै आंगें पोळती । वसृधरेंचीं । ' - शिशु ७४८ . ' किल्याचें आंग भिउनि फिरंग भार हा पळतो कानड्याचा . ' - ऐपो १८३ . ' तुमचें पागोंटें मागल्या अंगानें बैडौल दिसतें .' ४ वेदांग ; वैदिक वाडमयापैकी विशिष्ट ग्रंथ समुहास संज्ञा . उदा० शिक्शा , ज्योतिष , निरुक्त , इ .
- एखाद्या कामांत असलेला हात , घेतलेला भाग किंवा संबंध . ' त्या मसलतीत रामाजींपतांचें अंग आहे .'
- चोरून मदत किंवा मिलाफ ; आश्रय ; फुस . ' ह्मा चोराला कोतवालाचें अंग आहे .' ' ही सासुबरोबर भांडते , हिला नवर्य़ाचें अंग आहे .'
- अधिष्ठान ; ठिकाण ; शरीर ; देह ( एखाद्या गुणदोषाचा कर्ता , पात्र ). ' ही चोरी ज्याचें अंगीं लागेल त्यास मी शासन करीन ,' ' त्याच्या अंगीं चित्रकलेचा गुण आहे .'
- ( एखाद्या वस्तूचा किंवा कार्याचा ) गौण , अप्रधान ; भाग . उ०विवाहामध्यें होम हा प्रधान आहे . अवशिष्ट कर्में अंगें होत .
- खुण . ' अंनुभवाचीं आंगें जाणें । ' - दा ५ . ९ . २२ .
- आंतड्याचा गुदद्वाराबाहेर येनारा भाग , किंवा पसूतीनंतर योनीच्या बाहेर येणारा भाग . ( सामा .) गुदद्वार . ' आंगीं सारी बर्फ कुणाच्या छत्री गाजर मुळा । मेणबत्तीचा खेळ चालला ' - विक्षिप्त १ . १३५ .
- विशिष्ट काम करण्याची पात्रता , ताकद , क्षमता , बुद्धि .
- आपल्या बाजूचा माणुस ( मोठ्या अधिकावरील ); पुरस्कर्ता , तरफदारी करणारा ; वशिला ' दरबारांत अंग असल्यावांचुन कार्य सिद्धिस जात नाही .'
- ( ज्यो .) पूर्वक्षतिजावरील क्रांतिवृत्तावरचा बिंदु , अंश . ( अस्तलग्नाच्या उलट ).
- ( संगीत ) प्रबंधाचा पोटीविभाग ; रागवाचक स्वरसमुदाय ; हे विभाग सहा आहेत ;- स्वर , विरुद्ध पद , तेनक , पाट , ताल .
- ( ताल ) तालाचें मात्रानियमानें झालेलें कालप्रमाण हीं अंगे सात आहेत ;- अणु , द्रुत , द्रुताविराम , लघु , लघुविराम , गुरु व प्लुत .
- कौशल्य ; चातुर्य ; कल . ' त्याला गाण्याचें अंग आहे .'
- मधधाच्या पूर्वेचाजुना जुना बंगला देश ; सध्याचें मोघीर , भागलपूर , पुर्णिया इ० . जिल्हे यांत येतात . याचा उल्लेख अथर्ववेदांत आलेला आहे . पुढील काळी शोण , गंगा या नद्यांच्या आसपासच्या प्रदेश ; कर्णाचें राज्य .
- आचारांग सुत्रापैंकीं एक जैन आगम ग्रंथ .
- स्वतः खुद्द . आंगें असाहि प्रयोग आढळतो . ' दीप वांचुनि दिवा लाहे । तै आंग भुललाचि कीं। ' - अमृ ३ . २० . ' राहोनि गुप्त धृष्टद्युम्नें तच्छोध लाविला आंगें । ' - मोपादि ३४ . १८ . २० घालाघालींचें आंग सांधौं कैसें । चालितां बिंबु न दिसें । ' - शिशु १००६ . ' कारभाराचें सांगावें अंग कैसें । ' - दा ११ . ५ . २३ . - शअ . ( व .) कडे . उ० ' भिंतीअंग ' ( वाप्र .)
-
०ओढविणें आपल्या आंगावर घेणें ; स्वतः पुढें होणें ; ( एखाद्या कार्यातकडे ). ' आपुलेंचि अंग तुम्हीं वोडविलें । त्यांचें निवारिलें महादुःख । '
-
०काढणें , काढून घेणें
- स्वतः एखाद्या कामांतून माघार घेणे ; संबंध तोडणें ( एखाद्या कामांतून ). ' मी त्या कामांतून आपले अंग काढून घेतले आहे .'
- ( कु . गो .) दचकणें . ' आंग काडप .'
-
०घालणें
- हात घालणें ; मदत करणें ; मन घालणें . ' या कामांत तूं जर अंग घातलेंस तर फार सोय होईल .'
- दुःखामुळें ( जमिनीवर पडणें ) ' ऐकोनियां आंग घाली पृथ्वीवरी । ' - दा ३ . ५ . ३० .
Site Search
Input language: