Dictionaries | References

ओनामा

   
Script: Devanagari
See also:  ओनामासीधं

ओनामा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
The A B C of, the very rudiment.

ओनामा     

ना.  अथश्री , आरंभ , पहिला धडा , प्रारंभ , श्रीगणेशा , सुरुवात , हरिओम् ,

ओनामा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सुरुवात

ओनामा     

  1. ॐनम ; सिद्धम् चा संक्षेप किंवा अपभ्रष्ट रूप ( ॐ = ब्रह्मा ; नमःच्या योगी चतुर्थी असावी परंतु ॐ अव्यय असल्यानें चतुर्थीची जरुर नाहीं . सिद्ध शब्द मंगलवाचक आहे . ॐनमःसिद्धम् म्हणजे ( शब्द ) ब्रह्मास नमस्काररूप मंगलवर्ण . पण हा वाक्यप्रचार जैन आहे . अर्थ - सिद्धास नमस्कार - जिनास नमस्कार . श्रीगणेशायनमः हा सनातनीं त्यास प्रतिरुप असा जैन वाक्यप्रचार . 
  2. ( ल .) प्रारंभ ; पहिला धडा ; सुरवात ; मुलतत्व . ' संस्थानें वगळुन वाकीच्या राहिलेल्या हिंदुस्थानाला डोमिनियन स्टेटस लागु करतों असें . कोणी म्हणेल तर त्याला राज्यघटनेचा ओनामाहि कळत नाहीं असें म्हणावें लागेल .'- सासं २ . ४५० . ' म्हणता कशास ओनामा । जनहो घ्या हरिच्या नामा । ' 

ओनाम्या  वि .  
  1. ओनामा शिकणरा ; कोणत्याहि विद्येला ज्यानें नवीनच सुरवात केली आहे असा . 
  2. ओनामा शिकविणारा ; पंतोजी . ( ओं नमः )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP