Dictionaries | References

एकीबेकी

   
Script: Devanagari

एकीबेकी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A play among children. Odd and even.

एकीबेकी     

 स्त्री. 
बायका - मुलांचा एक समविषम ओळखण्याचा खेळ ; यांत मुठींत पैसे वगैरे घेऊन दुसर्‍यास ते सम आहेत कीं विषम आहेत असें विचारतात . त्यानें सांगितलेलें ( मोजून पाहतां ) खरें ठरलें तर मुठींतील सर्व पैसे इ० त्यास द्यावयाचे , खोटें झाल्यास दुसर्‍यापासून तितके आपण घ्यावयाचे ; गुजराथेंतहि हा खेळ आहे . एकीबेकी पोरा सांग झडकरी . - भज ११४ .
जूटफूट ; समेट आणि भांडण . [ एक + बेक = दोन ] म्ह० एकींत जय , बेकींत क्षय .

एकीबेकी     

एकीबेकी न्यायें होतसे प्रचित। तेणें लोक समस्त भुलताती।।
लहान मुले एकीबेकीचा खेळ खेळत असतां केव्हां एकी म्हणून सांगतात तर केव्हां बेकी म्हणून सांगतात. काही वेळां उत्तर बरोबर जमते तर काही वेळा जमत नाही. कोणतेहि उत्तर दिले तरी शेकडा पन्नास टक्के बरोबर येण्याचा संभव असतो. याप्रमाणें भविष्य सांगणारे वगैरे लोक काही तरी उत्तरे देतात. त्यांतील काही पटतात, काही पटत नाहीत. पण जी पटतात त्यावरून काही लोक फसतात. -तुगा २८४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP