Dictionaries | References ए एकांड्या Script: Devanagari Meaning Related Words एकांड्या A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Of which the scrotum has but little sensible division--as a horse &c. This is one of the inauspicious marks of the horse. 2 fig. A single champion or warrior; one that serves without followers and without being attached to any corps. Applied to a clever Hardás, musician &c. who acts without assistants; and, generally, to one of whom we say "He is a host in himself." एकांड्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ज्याचें अंड विभागलेलें न दिसतां एकच दिसतें किंवा ज्याचें अंड एका बाजूस लोंबत असतें असा घोडा ; असें अंड असणें ही एक घोड्याची खोड समजतात . - अश्वप १९६ . [ एक + अंड ]एकांगवीर पहा . कोणत्याहि पलटणीला जमा नसून स्वतंत्रपणें लढणारा ; स्वतंत्र शिलेदार ; शूर ; धाडशी पुरुष ; ( इं . ) कॅव्हॅलिअर . एकांड्या शिलेदाराची स्वत : ची जमात नसते व हा कोणाच्या ताब्यांत नसतो , वाटेल त्या जातीचा पण फार धाडशी व शूर असून त्याला सालीना ३०० ते २००० रु . पर्यंत वेतन व उत्तम कामगिरी केल्यास क्वचित पालखी व अब्दागिरीचा मान मिळे . प्रत्येक पथकांत अथवा पागेंत त्यांच्या त्यांच्या मानानें ह्यांची १० ते १०० पर्यंत संख्य़ा असे . अत्यंत आणीबाणीच्या वेळीं हा पुढें होई . हाच पुढें बढती मिळवून पाग्या अथवा पथकी होई . - वैद्य - मध्य . भारत . १ . २ . १२७ ; - हरिवंश बखर ३१ . नित्य नवे गणतीस लागती एकांडे देशावरले . - ऐपो २१६ . सरंजामी सरकारी एकांडे ठळक ठळक मागें उरले . - प्रला १२५ .एकटाच काम पार पाडणारा ; दुसर्या कोणाची मदत न घेणारा ( हरदास , गवई इ० ). [ सं . एक + अंड ; तुल० तेलगु एकांडमु = एकटा , अपेट ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP