Dictionaries | References

उमासा

   
Script: Devanagari
See also:  उमास

उमासा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To take breath; to have an interval of leisure or rest. Ex. मला उ0 टाकायला फावत नाहीं; मला क्षणभर उ0 टाकूं दे मग संगें चालता होईन. Also उमस or उमास खाणें in this sense, and उमस or उमसा पडणें in. con.

उमासा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Qualmishness; the rising and swelling (of lust, &c.).
उमासा टाकणें   Take breath or have an interval of leisure or rest.

उमासा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मळमळ

उमासा     

श्वास ; उच्छवास ; उसासा . ( क्रि . टाकणें ). अपरिमित तियेला येति तेणें उमासे . - सारुह ३ . ६३ . मला उमासा टाकायाला फावत नाहीं .
 पु. 
विश्रांति ; उसंत ; विसावा . सैन्य पळालें दशदिशा । म्हणती त्राहें त्राहें जगदिशा भीमें आकांत मांडिला कैसा । पळतां उमासा घेऊं नेदी ॥ - जै १३ . ६३ .
मळमळ ; पोटांतील खळबळ ; पोटांत ढवळणें , कालवणें ( क्रि० येणें ).
उमाळा ; आवेग ; उकळी ; लाट ( हर्ष , शोक वगैरेचा ). अभिमानाचे आळेपिळे । महत्त्वउमासे येती बळे । - एभा ८ . २१२ .
घेरी ; बेशुद्धि . उमासा येऊनि पडिला वनीं । परी दृष्टीसि कोठें न दिसे पाणी ॥ - महिपतिकथासारामृत २४ . १९० . [ सं . उद + मिष . प्रा . उम्मिस ] उमस , उमास खाणें - विश्रांति घेणें ; दम टाकणें .
उद्भवण्याची स्थिति , तयारी ( वादळ , रोग , गळूं वगैरेची ). धुमसणें ; पिकणें ; तयार होणें .
खोकल्याची उबळ .
जंत वगैरे झाल्यामुळें होणारा अन्नद्वेष वगेरै ( क्रि० येणें ) [ सं . उद + मथ ; दे . उम्मच्छिअ = व्याकुळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP