Dictionaries | References

उन्हाळी

   
Script: Devanagari

उन्हाळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Heat of weather; the heat of the hot season. 2 The hot dysury. v लाग, हो 3 A particular plant. 4 C The hot season.

उन्हाळी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Heat of weather; the hot dysury.

उन्हाळी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  उन्हाळ्याचा वा उन्हाळ्याशी संबंधित   Ex. आपल्या प्रांतात नागपूर व औरंगाबाद विभागात उन्हाळी महिन्यात तापमान फार वाढलेले असते.

उन्हाळी     

 स्त्री. 
हवेंतील उष्णता ; उन्हाळ्यांतील उष्णता ; उकाडा .
एक मूत्रविकार ; उन्हाळे . ( क्रि . लागणें , होणें . ) मुरडा हागवण उन्हाळे । दिशा कोंडतां आंदोळे । - दा ३ . ६ . ३० .
एक वनस्पति ; रानटी तीळ ; हिचीं फुलें लाल व पांढर्‍या रंगाचीं असून शेंगा चपट्या व पानें लहान व लांबट असतात . काडाचा सर्पणाकडे उपयोग होतो . शिवाय व्रण , खोकला , विष , दमा , अर्श , ज्वर , वायुनाशक वगैरे गुण यामध्यें आहेत .
( कों . ) उन्हाळा पहा .
०पावसाळी  स्त्री. खेळांतील दोन पक्षांपैकीं कोणी डावाला सुरवात करावयाची हें ठरविण्यासाठीं खापरी किंवा पैसा यांस एका बाजूनें थुंकी लावून तो वर फेकतात . त्या खापरीचें किंवा पैशाचें कोरडें अंग ती उन्हाळी व थुंकी लागलेलें अंग ती पावसाळी . त्यापैकीं एकानें कोणतें तरी अंग मागावयाचें व मागितलेलें अंग वर आल्यास त्यानें प्रथम खेळावयाचें असतें .
०भात  न. वायंगणें भात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP