-
स्त्री. १ ( सामा . ) दोन्ही तोंडे पोकळ असून मध्ये पोकळ असणारा धातूचा , लांकडाचा , वेळूचा लांब तुकडा . नळ पहा . ३ मूत्रनलिका . ४ श्वासनलिका ; अन्नमार्ग ; गळा ; कंठ . पहा त्या हिरण्यकश्यपे आपुलियेची बांधवी नळी । - तुगा २७९९ . ५ ( विणकाम ) धोटा ; गणा किंवा काडी ज्यांत ठेवतात ते टोपण ; कोश . ६ ( कु . ) फुंकणी . नळी फुंकिली सोनारे । ७ मोरी ; गटार . ८ गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचे हाड ; नळगुडी ; नडगी . ९ ( हात , पाय , मांड्या यांच्या ) लांब हाडांपैकी प्रत्येक . १० नाकपुडीचे छिद्र . ११ नळीच्या आकाराचे कौल . याचे एक तोंड जास्त रुंद व दुसरे किंचित निमुळते असते . १२ पाभरीच्या फणास बसविलेल्या बांबूच्या पोकळ तुकड्यांपैकी प्रत्येक . याचे एक टोक फणाच्या भोंकांत व दुसरे चाडाच्या बसविलेले असते व यांतून बी जमीनीत पडते . १३ डोंगरांतील अरुंद खिंड , मार्ग . १४ ( ल . ) बंदूकवाला ( बार , घोडा इ० शब्दांच्या लाक्षणिक अर्थाप्रमाणेच हा अर्थ आहे ). १५ ( गो . ) पळ ; धूम . [ नळ ]
-
०काढप ( गो . ) पळ काढणे ; धूम ठोकणे . नळीचे वर्हाड करणे ( स्वतःची ) तुंबडी भरणे ; तळीराम गार करणे . नळी नख देणे , नळी दाबणे १ ( एखाद्याच्या ) पोटावर पाय देणे , निर्वाहाची साधने नष्ट करणे . २ निष्ठुरतेने वागविणे .
-
f A tube or pipe; a spout, a gunbarrel, an ureter, the wind pipe, the gullet, the case enclosing the weaver's spool or shuttle, a long bollow body gen.: also a drain or sewer.
-
०निमटणे नरडी दाबणे ; प्राण घेणे . सूर्योदयो जाहल्यापाठी । समूळ अंधाराते घोंटी । खद्योताची नळी निमटी । नक्षत्रकोटी तत्काळ गिळी । - एभा १३ . ४२२ . नळीवर नेसणे ( धोतर , लुगडे इ० ) गुडघ्याच्यावर नेसणे . नळीचे कुलूप न . जुन्या काळचे वाटोळे गांवठी कुलूप . बेडकीचे कुलूप . नळीचे पीस न . बारीक निमुळत्या नळीच्या आकाराचे साळूचे पीस . सड , केस , लव , पिसे , नळ्याची पिसे ... इतके आच्छादनाचे प्रकार आहेत . - मराठी ६ वे पुस्तक ( १८७५ ). नळीदार कौल कऊल न . मातीचे अर्धनळीच्या आकाराचे कौल ; याच्या उलट थापीव कौल . नळीदार चोळणा पु . पायांच्या नडग्या झांकणारी , घोट्यापर्यंत लांब असलेली विजार , पायजमा . नळ्या गंधक पु . कांडीच्या आकाराचा गंधक .
Site Search
Input language: