Dictionaries | References

इंद्राय तक्षकाय स्वाहा

   
Script: Devanagari

इंद्राय तक्षकाय स्वाहा

   जनमेजयाच्या सर्पसत्रांत नागाधिपति तक्षक याची आहुति देण्याचा प्रसंग आला असतां, तक्षक इंद्राची पाठ धरून बसला. तेव्हां ‘इंद्राय तक्षकाय स्वाहा।’ असा ब्राह्मणांनी मंत्र म्हणून तक्षक आणि त्याचा आश्रयदाता इंद्र या दोघांनाहि खाली आणले. या कथेवरून मूळ (गुन्हेगार) माणूसत्याचा पाठीराखा या दोघांनाहि शिक्षा करणें. ‘‘जॉनसनसारख्या रसिकांनी...ज्यांस कवित्व सिंहासनावर आरूढ करवून सर्वांच्या अभिनंदनास पात्र करून ठेविले होते, त्यांस मेकॉले प्रभृति अर्वाचीन निबंधकारांनी पदच्युत करून, ‘इंद्राय तक्षकाय स्वाहाया न्यायाने जॉनसन प्रभृति मोर्चेलवाल्यांनाहि त्यांच्याबरोबरच खाली ओढले.’’-नि. ८५७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP