Dictionaries | References अ अवसबाई तुह्माकडे, पुनवबाई तुह्माकडे Script: Devanagari Meaning Related Words अवसबाई तुह्माकडे, पुनवबाई तुह्माकडे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (अवस=अमावास्या. पुनव=पौर्णिमा) अमावस्या व पौर्णिमा या विरूद्ध गुणधर्माच्या तिथी आहेत. त्या दोन विरूद्ध पक्षांच्या दोन नेत्या आहेत असे समजून दोघींनाहि राजी राखण्याकरितां एकजण म्हणतेः ‘अवसबाई, मी तुझ्या पक्षाची.’ पुढे पुनवबाईची गांठ पडताच ती म्हणते, ‘पुनवबाई, मी तुझ्या पक्षाची.’ दोन्ही विरूद्ध पक्षांना ही आपल्याच पक्षाची अभिमानी व्यक्ति आहे असे आपल्या कारवाईनें भासविणार्या व्यक्तीसंबंधी म्हण आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP