Dictionaries | References

अलुता

   
Script: Devanagari
See also:  अलुत्या

अलुता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A common term for certain Village officers secondary to the बलुते. Thus बारा अलुते आणि बारा बलुते of whom see the full list under बलुतेदार.

अलुता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A term for certain village officers.

अलुता     

 पु. तेली , तांबोळी , साळी , माळी , जंगम , कळावंत , डौरी , ठाकर , घडशी , तराळ , सोनार , चौगुला हे बलुत्याच्या खालच्या वर्गाचे १२ कामगार होत . ग्रॅन्टडफच्यामतें सोनार , जंगम , शिंपी , कोळी , तराळ , वेसकर , यांचा हक्क महारापेक्षां निराळा . माळी , डवर्‍यागोसावी , घडशी , रामोशी , तेली , भिल्ल , तांबोळी , गोंधळी यांना नारुकारुच्या उलट अशी संज्ञा आहे . शेतकर्‍यांकडून यांना जें धान्य हक्क म्हणून मिळतें त्याचें प्रमाण ठराविक नाहीं . यांतील सोनार सरकारी नाणीं पारख करणारा पोतदार होय . तराळ म्हणजे पाटलाजवळ सतत हजर असणारा , सरकारी अधिकार्‍यांची सरबराई करणारा , त्यांचें सामान वाहणारा महार होय . बाराच्या बारा अलुते कोठल्याहि खेड्यांतून क्वचितच सांपडतात . कोठें कोठें वाजंत्री , गारपगारी वगैरे नवीन अलुतेदार आढळतात . बलुता पहा . [ बलुता द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP