-
न. एक मुलींचा खेळ . - मखे ३०३ .
-
न. १ विशिषाट खुणांनी दर्शविलेलें अंतर ; टप्पा ; ' मिनिट कांटा एक तासांत ६० घरें चालतो .' - के २ कोष्टकांतील खण , खाना . ' मध्यें तीन घरें मोकळी टाकलेली होतीं व चवथ्या घरांत पांचचा आंकडा होता .' ( सं . गृह )
-
न. १ रहावयासाठीं बांधलेली जागा ; वाडा . २ एका कुटुंबांतील ( एके ठिकाणीं ) राहणारी मंडळी ; कुटुंब . ३ गृहस्था श्रमधर्म ; संसार ; प्रपंच . त्याला नोकरी लागतांच त्यानें स्वतंत्र घर थाटलें ४ एखाद्या पदार्थ शिरकवण्यासाठीं केलेला दरा , भोंक , खोबण . भिंतीस घर करून मग खुंटी ठोक . ७ ( मालकाच्या इच्छेविरुध्द मिळविलेलें , बळकावलेलें ) वस्तीचें ठिकाण . कांटयानें माझ्या टाचेंत घर केलें . ८ एखादी वस्तु सुरक्षितपणें ठेवण्यासाठीं केलेलें धातूचे , लांकडाचें आवरण , वेष्टण , कोश , उ० चष्म्याचें घर . माझ्या चष्म्याचें घर चामडयाचें आहे . ९ पेटींतील , टाइपाच्या केसींतील कप्पा , खण , खाना . १० सोंगटयांच्या , बुध्दिबळांच्या पटावरील , पंचांगातील ( प्रत्येक ) चौक ; चौरस ; मोहर्याचा मूळचा चौरस ; मोहर्याचा मारा . राजा एक घर पुढें कर घोडा अडीच घरें ( एकाच वेळीं ) चालतो . ११ ( ज्यो . ) कुंडलीच्या कोष्टकांतील सूर्य , चंद्र इ० ग्रहांचें स्थान . १२ घराणें ; वंश ; कुळ . त्याचें घर कुलीनांचें आहे . त्याच्या घराला पदर आहे . = त्याच्या वंशांत परजातीची भेसळ झाली आहे . १३ उत्पत्तिस्थान ; प्रांत , प्रदेश , ठिकाण , ठाणें ( वारा , पाऊस , प्रेम , विकार , रोग इ० काचें ); सर्वज्ञतेचि परी । चिन्मात्राचे तोंडावरी । परी ते आन घरीं । जाणिजेना । - अमृ ७ . १३० . कोंकण नारळाचें घर आहे . १४ रोग इ० कांच्या उत्पत्तीचे कारण , मूळ , उगम , जन्मस्थान , खाण . वांगे हें खरजेचें घर आहे . आळस हें दारिद्रयाचें घर आहे . १५ वादांतील आधारभूत मुद्दा , प्रतिष्ठान , गमक , प्रमाण . १६ सतार इ० वाद्यांतील सुरांचें स्थान ; सनईसारख्या वाद्याच्या दोन भोकांमधील अंतर ; सतारीच्या दोन पडद्यांमधील अंतर . १७ शास्त्र , कला इ० कांतील खुबी , मर्म , रहस्य , मख्खी , किल्ली . तुम्ही गातां खरे पण तुमच्या हातीं गाण्याचें घर लागलें नाहीं . गुणाकार , भागाकार हें हिशेबाचें घर . १८ सामर्थ्य ; संपत्ति ; ऐपत ; आवांका ; कुवत . जें कांहीं करणें तें आपलें घर पाहून करावें . १९ मृदंग इ० चर्मवाद्यांचा , वादी , दोरी इ० परिच्छेदानें परिच्छिन्न प्रांत , जागा . २० ( संगीत ) तान , सूर यांची हद्द , मर्यादा , क्षेत्र . २१ ( अडचणीच्या , पराभवाच्या वेळीं ) निसटून जाण्यासाठीं करून ठेवलेली योजना ; आडपडदा ; पळवाट ; कवच ; हा घर ठेवून बोलतो . २२ खुद्द ; आपण स्वत :; स्वत : चा देह . म्ह० इच्छी परा तें येई घरा . २३ ( वर्तमानपत्राचा , पत्रकाचा , कोष्टकाचा रकाना , सदर . ( इं . ) कॉलम . येऊन जाऊन पत्रप्रकाशकास स्वत : चा असा मजकूर दर खेपेस पराकाष्ठा दोन तीन घरें घालणें येतें . - नि १५ . २४ वयोमानाचा विभाग ; कालमर्यादा . हा नवा गृहस्थ पन्नाशीच्या घरांत आला होता . - कोरकि ३२ . २५ ( मधमाशीचें पोळें वगैरेतील ) छिद्र . केळीच्या सोपटाचीं घरें ज्यांनीं पाहिलीं असतील - मराठी सहावें पुस्तक पृ . २२५ . ( १८७५ ) २६ ठाणें ; ठिकाण . कुबल , बांकी घरें । शिवराजाच्या हाता आलीं - ऐपो ९ . २७ बायको ; स्वस्त्री . घरांत विचारा . घर उघडणें पहा . [ सं . गृह ; प्रा . घर ; तुल० गु . घर ; सिं घरु ; ब . घर ; आमेंजि . खर ; फ्रेजि . खेर ; पोर्तु जि केर . ] ( वाप्र . )
-
०आघाडणें ( कों . ) घर जळून खाक होणें .
Site Search
Input language: