Dictionaries | References

अनीगोंदी

   
Script: Devanagari
See also:  अनागोंदी

अनीगोंदी     

 न. कर्नाटकांतील विजयानगर साम्राज्याचें प्राचीन राजधानीचें एक शहर .
०कारखाना   कारभार जमाखर्च बक्षिस बोलणें - खोटा , अव्यवस्थित गोंधळी , पोकळ , रिकामा , कारभार - जमाखर्च , इ० . ( विजयानगर साम्राज्य नष्ट झाल्यानंतरचा कोणी एक राजा आपलें वैभव दाखविण्यासाठीं पृथ्वीवरील सर्व देशांचा भपकेदार जमाखर्च आपला म्हणून मांडीत असे ; म्हणजे त्यांच्या सर्व उत्पन्नाच्या मोठमोठ्या रकमा जमेच्या बाजूस मांडून तेवढ्याच रकमा पुन्हा खर्चाच्या बाजूस मांडीत असे . यावरुन वाक्यप्रचार ). [ का . अने = हत्ती + गुंदी - गोंदी = गल्ली ]. चा राजा - पु . मागितलेली वस्तु विचार न करतां देणारा ; भोळा सांब ; गबाळी . म्ह० सर्वच अनागोंदी ; सगळा अ० कारभार = जिकडे तिकडे सर्व अव्यवस्थित अशा अर्थांनेहि वापरतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP