Dictionaries | References

अडाण

   
Script: Devanagari

अडाण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
aḍāṇa n The people of a village not employed in cultivation; as contrad. from शेतकरी A field-man. 2 Udder.

अडाण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  People not employed in cultivation. Udder.

अडाण     

 स्त्री. ( माळवी ) कुवा असलेली जमीन . याच्या उलट विराण म्हणजे वैराण , रुक्ष , पाणी किंवा बिहीर नसलेली जमोन . ( म . आड = विहीर + रान - वन - जमीन )
 न. कास ; ओटी ; अडण पहा . [ सं . ऊधस - न ; ग्री . औथर ; ज . युटेर ; इं . अडर . ]
 न. पाटबंधारा ; बंधारा ( डॅम ). [ अडण - णा ]
 न. 
शेती नसलेले किंवा न करणारे गांवकरी ; शेतकर्‍यांउलट ; बलुतेदारांपेक्षां हे निराळे . [ सं . अज्ञान . का . अडने ]
०कबाड  न. अडाण ; खेड्यांतील कारागीर , व्यापारी , मजूर , कामकरी , इ० ( शेतकरी नव्हे ते ). ( अडणारा ; शेतकर्‍यांवर अवलंबून रहाणारा तो अडाणी - गांगा ८ ). [ अडाण + काबाडी ].
०चोंट वि.  अडाणी ; मंदबुध्दीचा ; घोडचुक्या करणारा ; मठ्ठ .
०जात  स्त्री. अशिक्षित , रानवट , जंगली लोक ; रीतभात माहीत नसणारे .
०पट्टी  स्त्री. शेतकरी व बलुतेदार या लोकांखेरीज बाकीच्या सर्व धंद्यांच्या व उदमी ( अडाण ) लोकांवर बसविलेला कर . अडाण - बाकी - वसुली वगैरे असे सामासिक शब्द अनेक होतात .
०मत  न. खेडवळ , विलक्षण , भलतेच विचार - समजूत - कल्पना वगैरे ; हटवादीपणाचें मत ; दांडकमत .
०वस्ती  स्त्री. बलुतेदार व शेतकरी यांवांचून बाकीच्या ( अडाण ) लोकांची खेड्यांतील अगर त्याच्या एकाद्या भागांतील वस्ती .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP