बावन्न अक्षरांचे चार वर्ण १ २१ स्वर (अ आ इत्यादि) आणि क ख ग घ ङ,- हे विप्रवर्ण.
१० - च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण, हे क्षत्रिय वर्ण.
१० - त थ द ध न प फ ब भ म, हे वैश्य वर्ण.
११ - य र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ, हे शूद्र वर्ण.
अकवर्गोऽभवत् विप्रे। चटवर्गस्थक्षत्रियाः ॥
तपवर्गोऽभवत् वैश्ये। यशवर्गेण शूद्रजाः ॥ (दु. श. को
बावन्न अक्षरांचे रंग अ आदि सोळा स्वर आणि श ष ह ळ क्ष प फ ब भ म, हे गौर्वर्ण. क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न हे कृष्णवर्ण. जोड अक्षरें तितकीं मिश्र रंगांचीं
अशप गौरवर्णानि। कचटत् कृष्णमेव च ॥
मिश्रितः शुक्लवर्णानि। वर्णस्तुत्रिविधः स्मृतः ॥
बावन्न बिरुदें (श्रेष्ठत्वाचें निदर्शक चिह्रें) १ शिरताज, २ मायताजवा, ३ माहे मरातब, ४ गंड भैरी, ५ शार्दूल, ६ चवरी, ७ घंटा, ८ चंग, ९ पट्टा, १० समला, ११ गडी, १२ नागबंद, १३ रुमाल, १४ वाकी, १५ बरफ १६ रणजोड, १७ तोडा, १८ शेरा, १९ कंकण, २० तुरा, २१ कलगी, २२ मेघडंबर, २३ सूर्य, २४ पान, २५ हुमा, २६ अंकुश, २७ त्रिशूळ, २८ खांडा, २९ फरश, ३० बानामोरचेल, ३१ वल्लम, ३२ लंगर, ३३ सैली, ३४ शिंगी, ६५ नाडी, ३६ नागज्योति, ३७ मोर, ३८ मुगुट, ३९ हालरवाक, ४० लंगोट, ४१ शेंदुर, ४२ कोरडा, ४३ गुरज, ४४ शंख, ४५ चक्र, ४६ पद्म, ४७ गदा, ४८ सडका, ४९ मेख, ५० मोगरी, ५१ पंचरंगी आणि ५२ निशाण, (विद्या, कला, शौर्य वगैरे गुणांत पूर्वकालांत श्रेष्ठत्व दर्शक चिह्रें मानिलीं होतीं.)
उष्ट्रानीं बिरिदें बांधोन। तुंबरापुढें केलें गायन। (
[ए. भा. ५-८२])
बावन्न मातृका ॐ कांरापैकीं अ उ म या तीन मात्रा वरील बिंदु ही अर्धमात्रा मिळून साडे तीन मात्रा व त्यापासून पुढें बावन्न मातृका (अक्षरें) ॐ कार आणि स्वर व व्यंजनें मिळून ५२ मुळाक्षरें. (१६ स्वर सोळाचे अंकीं व ३६ व्यंजनें छत्तीसचे अंकीं पहा)