पु. - नवरसापैकी एक रस . ( प्रेम , कामभावना वगैरेचे वर्णन करणारा ). देशियेचेनि नागरपणे । शांतु शृंगारातें जिणे । - ज्ञा १० . ४२ . ( समासांत ) शृंगार - लीला - रस - सुख - विनोद - शास्त्र - गृह - प्रिय - भाव - संभाषण - मत्सर इत्यादि .
- अलंकार ; भूषण ; शोभा ; थाट . अगा बालका लेवविजे लेणे । तया शृंगारा बाळे काई जाणे । - ज्ञा १० . ५८ .
- ( स्त्रियांनी केलेले ) प्रेमदर्शक हावभाव , आविर्भाव ; लज्जादि प्रदर्शन ; नखरा , चाळे वगैरे .
- स्त्रीपुरुषांचा कामुक व्यवहार . [ सं . ]
०कलह पु. प्रेमकलह ; प्रेमाचे लटके भांडण .
०गळेसरी स्त्री. एक गळ्यांतील भूषण , दागिना .
०चेष्टा स्त्री. १ ( स्त्रियांनी केलेल्या ) कामुक चेष्टा , चाळा ; प्रेमविषयक हावभाव , खेळ . २ स्त्रियांचा नखरा ; प्रेमप्रदर्शन ; प्रेमविलास .
०पटटी स्त्री. घराच्या पुढील दरवाजाच्या चौकटीच्या वरच्या बाजूस गणेशपट्टीच्या वर बसविलेली कोरीव कामे केलेली पट्टी
०पण न. शोभा . मग न चालते कळंकेवीण । शशिबिंब जैसे परिपूर्ण । तैसे चोखी शृंगारपण । मनाचे जे । - ज्ञा १७ . २३० .
०पेटी स्त्री. स्त्रियांची फणी - करंडयाची सुंदर पेटी . ' तुम्ही माईला तेवढी शृंगारपेटी आणालीत । - बहकलेली तरुणी १९ .
०मराळिका, मराळी स्त्री . सुंदर स्त्री ; रूपवती . [ शृंगार + मराळिका = हंसी ]
०मुरड पु. शृंगारोपभोग . शृंगार मुरड उत्तम जन । तेथे भोग भोगितसे । - नव ११ . ६४ .
०लज्जा स्त्री. प्रेमविषक वरवर . दिसून येणारी लाज , विनय ; ओढूनताणून आणलेला बुजरेपणा , नखरा ; कामुक लज्जेचा आविर्भाव .
०लालन न. ( स्त्रियांनी केलेले ) कामुक चाळे , चेष्टा ; प्रेमयुक्त लाड , कौतुक , हावभाव .
०साज पु. स्त्रियांचा गळ्यांतील एक दागिना .
शृंगारणी स्त्री . सजवणूक ; आरास ; शोभा ; साज
शृंगारणे स्त्री . सुशोभित करणे ; सजविणे ; नटविणे ; शोभविणे ; भूषवणे .
शृंगारिक , शृंघारिक वि . - शृंगारासंबंधी .
- शृंगारी ; शृंगाराचा भोक्ता . शृंघारिक नवरसिक । यामध्ये सांडावे येक । - दा १४ . ५ . २१ .
शृंगारित वि . सजविलेला ; नटाविलेला ; भूषविलेला ; शोभायमान ; सुशोभित .
शृंगारी , शृंगारीक वि . - शृंगारशास्त्रांत निपुण .
- कामुक ; वैषयिक ; प्रेमासक्त ; कामी .
- शृंगारासंबंधी ; प्रेमविषयक .
- ( कों . ) घराच्या बांधणीचा एक प्रकार आहे त्या प्रकारचा .