|
अ.क्रि. युद्ध करणे ; झुंझ करणे ; द्वंद्व करणे . झगडणे ; भांडणे ; तंटा करणे . ( ल . ) स्पर्धा करणे ; चढाओढ करणे ; टक्कर मारणे . [ हिं . लडना ] ( वाप्र . ) लढून पडणे - मोठ्या औत्सुक्याने , उत्कंठेने एखाद्यावर झटून पडणे ; तुटून पडणे . लढत - स्त्री . युद्ध ; झुंज ; झगडा ( क्रि० लागणे ; चालणे ; होणे ). लढा अर्थ १ पहा . [ लढणे ] लढता - वि . लढाऊ ; युद्धकुशल ; लढवई पहा . शिंदे यांची फौज एवढी , लढती , तिची ही गत . - भाब ७५ . लढवय्या ; लढणारा .; योद्धा . लढवय्या - पु . लढाण्यांत हुशार असलेला मनुष्य ; योद्धा ; वीर . [ हिं . ] लढवई , लढवाई - वि . झुंजार ; रणधीर ; रणशूर . लढाईस योग्य ( मनुष्य , घोडा , जहाज , रथ , शस्त्र ). [ हिं . ] लढविणे - सक्रि . झुंजावयास लावणे . बरोबरी , स्पर्धा करण्यास लावणे . हे पागोटे त्या पागोट्याशी लढवून पाहिले परंतु लढत नाही . चालविणे ; करणे ; योजणे ; उपयोग करणे ( मसलत , शक्कल , युक्ति , यत्न , तजवीज , साधने ). लढा - पु . भांडण ; वाद ; तंटा ; वादाचा विषय , भूमि . ( क्रि० लागणे ; चालणे ; असणे ; होणे ; राहणे व तोडणे ; चुकविणे ). प्रतिबंध ; अडथळा ; निरोध ; हरकत ; निग्रह करणारे , आड येणारे , गति कुंठित करणारे कारण . त्या कागदावर घोटणी नाही म्हणून रेघ ओडतांना मध्ये लढा लागतो . ( शब्दशः व ल . ) गुंता ; गुताडा ; गुरफटा . लढाई - स्त्री . भांडण , तंटा करणे . सामना ; रण , संग्राम . युद्ध ; युद्धसंसार . [ हिं . लडाई ] ( वाप्र . ) ०जिंकणे लढाईत जय मिळविणे ; विजयी होणे . लढाऊ वि . लढण्यास योग्य ( मनुष्य , पशु , जहाज इ० ). [ हिं . लडाऊ ] ०गलबत जहाज न . लष्करी जहाज .
|