Dictionaries | References

बोर्‍या

   
Script: Devanagari
See also:  बोरा , बोरिया

बोर्‍या     

 पु. 
पोती , गोणपाट इ० करण्याच्या उपयोगी कापड ; अशा कापडाचें केलेलें पोतें , तरट , बिछाईत ; जाजम ; बारदान ; गोणपाट .
शिंदी , ताड इ० च्या पात्यांची चटई ; आंथरी . काय मह्रर्ष तृणाचा बोर्‍या । - अमृत ११७ .
लोंकर इ० ची जाड बैठक ; बुरणूस ; सुताचा विणलेला झोर्‍या .
( बे . ) साळी , भात ठेवण्यासाठीं तुराट्या इ० ची विणलेली कणंग ; बोहरीं . ( सामान्यतः ) बोहरा किंवा बोहरी .
( ल . ) फजीती . - वि .
दिवाळखोर .
अनाथ ; दुर्बळ ; गरीब ; कंगाल ( माणूस ); भिकार ; ( पदार्थ ). [ फा . बूरिया ]
०उडणें   होणें वाजणें - फजीती होणें ; अप्रतिष्ठा होणें ; पत उडणें ; बोजवारा होणें .
०बागवान वि.  कंगाल .
०भाई वि.  कफल्लक . बोरी स्त्री .
सराफ लोकांची पैसे ठेवण्याची लांब पिशवी ; कसा .
चटई .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP