|
वि. कपाळावर पांढरा ठिपका असणारी ( गाय , बैल , म्हैस , रेडा इ० ) [ चंद्र ] स्त्री. चंदेरी ; पितळी वाटी [ चंदेरी ] स्त्री. १ तंद्री ; टक ; एकसारखी नजर ; एक लय ; एकाग्रता ; ध्यानावस्था ( प्राणोत्क्रमणसमयीं किंवा मद्याच्या धुंदींत ). चंद्री लागे होय विरूप । जठराग्निहि विझे । - स्वदि १३ . ५ . ३१ . २ मनाची एकाग्रता झाली असतां , एकीकडेच सारखें लक्ष लागलें असतां बुबुळांना जी निश्चलता येते ती . ( क्रि० लागणें ). येकांच्या बैसल्या अमृतकळा । येकांस चंद्री लागली डोळां । - दा ३ . ५ . ४ . दृष्टीं देखियेला गजानें तो वैरी । तेणें नेत्रीं चंद्री लागलीसे । ३ निश्चल न बसण्याजोगी स्थिति ; दिवसभर मेल्याला चंद्री लागली आहे . ४ अतिशय उत्कंठा ; चिंता . परी संततीवीण दिसे दरिद्री । म्हणोनी लागली मनीं चंद्री । - मुसभा ६ . ८ ( एखाद्याची ) चंद्री भुलणें , गुंग होणें - ( हर्ष , भय , आश्चर्य यांच्या योगानें ) बावरणें ; घाबरणें ; गडबडणें ; बेहोष होणें ; बेभान , गुंग होणे . लोकांचीं घरें भडभडा चेत घेताहेत ... पाहशील तर चंद्री गुंग होईल . - बाळ २ . १०४ . [ सं . चंद्र ]
|