-
सताप कुल, रुटेसी
-
सताप कुल, रुटेसी
-
बेल, कवठ, सताप, लिंबू, कढिलिंब इत्यादींचे द्विदलिकित कुल. हे हचिन्सन यांनी सताप गणात (रुटेलीझमध्ये) अंतर्भूत केले आहे. बेसींच्या व बेंथॅम व हूकरच्या पद्धतीत भांड गणात (जिरॅनिएलीझमध्ये) घातले आहे. सुगंधी प्रपिंडचित्रित बहुधा संयुक्त पाने, नियमित द्विलिंगी फुले, संदले व प्रदले ४-५, केसरदले ५,८,१० अथवा अधिक, सुटी किंवा अनेक जुड्यांची असून किंजपुट बिंबावर व ऊर्ध्वस्थ. किंजपुटातील अनेक कप्प्यात दोन ते अनेक बीजके, फळे विविध.
Site Search
Input language: