मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती| ओव्या ४५१ ते ५०० सार्थ लघुवाक्यवृत्ती ओव्या १ ते ५० ओव्या ५१ ते १०० ओव्या १०१ ते १५० ओव्या १५१ ते २०० ओव्या २०१ ते २५० ओव्या २५१ ते ३०० ओव्या ३०१ ते ३५० ओव्या ३५१ ते ४०० ओव्या ४०१ ते ४५० ओव्या ४५१ ते ५०० ओव्या ५०१ ते ५५० ओव्या ५५१ ते ६०० ओव्या ६०१ ते ६५० ओव्या ६५१ ते ७०० ओव्या ७०१ ते ७५० ओव्या ७५१ ते ८०० ओव्या ८०१ ते ८५० ओव्या ८५१ ते ९०० ओव्या ९०१ ते ९५० ओव्या ९५१ ते १००० ओव्या १००१ ते १०५० ओव्या १०५१ ते ११०० ओव्या ११०१ ते ११५१ ओव्या ११५१ ते १२०० ओव्या १२०१ ते १२५० ओव्या १२५१ ते १३०० ओव्या १३०१ ते १३५० ओव्या १३५१ ते १४०० ओव्या १४०१ ते १४५० ओव्या १४५१ ते १५०० ओव्या १५०१ ते १५५० ओव्या १५५१ ते १६०० ओव्या १६०१ ते १६५० ओव्या १६५१ ते १७०० ओव्या १७०१ ते १७५० ओव्या १७५१ ते १८०० ओव्या १८०१ ते १८५० ओव्या १८५१ ते १९०० ओव्या १९०१ ते १९५० ओव्या १९५१ ते २००० ओव्या २००१ ते २०५० ओव्या २०५१ ते २१०० ओव्या २१०१ ते २१५० ओव्या २१५१ ते २२०० ओव्या २२०१ ते २२५० ओव्या २२५१ ते २३०० ओव्या २३०१ ते २३५० ओव्या २३५१ ते २४०० ओव्या २४०१ ते २४५० ओव्या २४५१ ते २५०० ओव्या २५०१ ते २५५० ओव्या २५५१ ते २६०० ओव्या २६०१ ते २६५० ओव्या २६५१ ते २७०० ओव्या २७०१ ते २७५० ओव्या २७५१ ते २८०० ओव्या २८०१ ते २८५० ओव्या २८५१ ते २८७५ सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ४५१ ते ५०० श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे. Tags : laghuvakyavruttishankaracharyaलघुवाक्यवृत्तीशंकराचार्य ओव्या ४५१ ते ५०० Translation - भाषांतर वृक्षागारचिया पुरुषासी अन्य वाक्यें न येती उपयोगासी । एकचि वाक्य कीं प्रवाहीं न पडसी । अससी वृक्षीं स्वस्थ तैसें परोक्षही सच्चिदानंद ब्रह्म एक आहे विशुद्ध । तेणें वाक्यें नव्हे बोध । अधिकारी जरी ॥५२॥तूंचि प्रत्यक्ष ब्रह्म अससी । वेदाचीं वाक्यें जीं ऐशीं । तोच गुरु बाणविती शिष्यासी । विवेचनद्वारां ॥५३॥ऐसें हें जें वाक्य अपरोक्ष । तेणेंचि ज्ञान होय प्रत्यक्ष । तेव्हांचि अधिकारिया होय मोक्ष । अज्ञान नासे नी ॥५४॥ऐसेंही वाक्य जरी बोधिलें । आणि शिष्याप्रतिही विश्र्वासलें । परी विवेचन न होतां व्यर्थ गेलें । जाले पाषांढी गुरूनेंचि ब्रह्म म्हणतां । देहादिकांसी मानिली आत्मता । तस्मात् पाखांडी ययापरता । दुजा कोण असे ॥५६॥हें ज्ञान नव्हें अधिक अज्ञान । वाढलें दृढ जालें बंधन । ऐसा पाखांडी कोटि कल्पेंकरून । न सुटे कदां ॥५७॥तस्मात् खरें जयासी तरणें । तेणें विवेचन सांग करणें । सर्व आभासाहून ओळखणें । यथार्थ आत्मत्व ॥५८॥आतां तेंचि विवेचन कैसें । बोलिजे तें सावधान मानसें । अगा हे रविदत्ता ग्रहण करी तैसें । विवेचून यत्नें ॥५९॥बोधाभ्ज्ञासाच्छुद्धबोधो विविच्येदतियत्नतः ॥बोधासाभाहून शुद्ध बोध । विवेचून घेइजे प्रसिद्ध । तोचि आत्मा ब्रह्म आत्मा ब्रह्म विशुद्ध । बोधाभास अनात्मा ॥४६०॥एकदां विवेचनें नाहीं कळलें । परी वारंवार पाहिजे विवेचिलें । यास्तव अति प्रयत्नें म्हणितलें । सत्य सत्य त्रिवाचा वृक्षीं बैसला तो मुख्य बिंब । प्रवाहीं दिसे तो प्रतिबिंब । हे दोन परी असती स्वयंभू । एक सत्य एक मिथ्या ॥६२॥जें दिसे तें सत्य नाहीं । उगेंच पडिलें वाटे प्रवाहीं । न दिसे पाहें सर्वांही । तें प्रवाहा वेगळें ॥६३॥तेंवीच स्फूर्तीपासून देहांत । जितुकीं तत्त्वें हीं समस्त । तितुकींही जाणतिया दिसत । परी तीं असत्य सर्व ॥६४॥जो सर्वत्रांसी स्वप्रकाशें । साधनेंविण जाणतसे । परी तो कळेना अल्पसें । आणि आपणा न देखे ॥६५॥तोचि आत्मा ब्रह्म निश्चयेंसी । विलक्षण असे या सर्वांसी । जन्ममरणा पापपुण्यासी । देहकृता नातळे ॥६६॥जो प्रतिबिंबरूप आभास । जो मागें बोलिला बहुवस । आणि पुढेंही बोलिजे तयास । तोचि कर्ता भोक्ता ॥६७॥ऐसा आभास जो मिथ्या दिसे । तो तिहीं काळींही सत्य नसे । जो देखणा तो तिहीं काळीं असे । तोचि आत्मा आपण आत्मा म्हणिजे आपणा म्हणावें । येर सर्व तें आपण नव्हे । ऐसे जाणोन अंगें व्हावें । देह असतां ब्रह्मरूप ॥६९॥आत्माचि कैसा ब्रह्मरूप । ऐसा असे जरी आक्षेप । तरी सावधान असावें साक्षेप । उभयांचीं लक्षणें बालूं ॥४७०॥जग उत्पत्ति-स्थिति-लय । मायेस्तव होत जाय । परि तिहीं काळीं जे अद्वय । अबाधित तें सद्रूप ॥७१॥सृष्टीपूर्वीं सद्रूप होतें । यास्तव अधिष्ठान या भ्रमातें । सत्यावीण अन्यथा भासातें । दिसणें न घडे ॥७२॥एवं सृष्टिपूर्वी आहेच आहे । सृष्टि होतां माजीं राहे । म्हणोनि सर्वां आहेपणा लाहे । घटीं मृत्तिका जेवीं ॥७३॥पुढें नासूनी जाता सर्व । उरे तें सद्रूप स्वयमेव । जेवीं घट भंगतां रूप नांव । मृत्तिका उरे ॥७४॥एवं सृष्टीच्या आदि अंतीं उरें । मध्येंही असे निर्विकारें । तेंचि सद्रूप ब्रह्म साचारें । अविनाश सदां ॥७५॥जेवीं तिहीं काळी सत् न नासे । तेवीं सदोदित ज्ञानही असे । तेंचि चिद्रूप निर्विशेषें । शून्य देखणें ॥७६॥माया असतां प्रकाशावीं । माया निमतां अवलोकावी । तया नाहींपणाची प्रतीति घ्यावी । तेचि ज्ञप्ति चिद्रूप ॥७७॥एवं सत्चित्लक्षणें दोन । तेवींच तिसरें आंनदघन । सर्वथा सुखःदुःखविहीन । आनंदरूप ॥७८॥स्फुरणापासून अलीकडे । दिसती सुखदुःखाचें सांकडें । यास्तव आनंदरूपता न जोडे । सुखदुःखाभावीं सिद्ध ॥७९॥ऐसें सच्चिदानंद ब्रह्म । तिहीं लक्षणीं सर्वदां सम । तोचि हा कूटस्थ आत्माराम । निर्विकाररूप ॥४८०॥तेंचि लक्षणें आत्मत्वीं असतीं । यास्तव ब्रह्मिच आत्मा चिन्मूर्ति । श्रुति युक्ति आणि अनुभूति । तिहीं प्रतीतीं सिद्ध हेंचि लक्षण आत्मत्वीं कैसें । प्रस्तुत बोलिजे असे तैसें । तें लक्षण ऐकतां विश्र्वासें । मन हें साधकाचें ॥८२॥सच्चिदानंद ब्रह्म बोलिलें । तेंचि आत्मत्वीं असे पहिलें । जें का अस्ति भाति प्रिय म्हणितलें । अपर पर्यायें ॥८३॥अस्ति म्हणजे आहेपणा । तेंचि सद्रूप पूर्णपणा । भाति म्हणजे चिद्रूप देखणा । प्रिय रूप आनंद ॥८४॥एवं आस्ति भाति प्रियरूप आत्मा । तोचि सच्चिदानंद परमात्मा । येथें भेद नाहीं एक नामा । वाचून कांहीं ॥८५॥सूर्य भानु नामें दोन । परि द्विधा नव्हे सहस्त्रकिरण । तैसाचि आत्मा ब्रह्म पूर्ण । नामभेदें एकरूप ॥८६॥असो अस्ति भाति आणि प्रिय । याचा पिंडीं कैसा प्रत्यय । तेंचि बोलिजे यथान्वय । दृष्टांतासहित ॥८७॥मी आहे जों सर्व जनांसी । आहेच आहे दिवा कीं निशीं । मी नाहीं हा संशय कोणासी । कधींही नव्हे ॥८८॥सर्वत्रांसी पुसोनि पहावें । कीं सखया अससी कीं नव्हे । तरी तो म्हणे हें काय बोलावें । नलगे असतां ॥८९॥जरी मी नाहीं उगेंच बोलतां । लाज वाटे तयाचे चित्ता । आणि अहाचि वाटे समस्तां । हंसून भाविती भ्रम ॥४९०॥ऐसा आहेपणा जो आपुला । सर्वत्रीं असे संचला । येथें संशय नाहीं कोणाला । हा अस्तित्त्वें आत्मा ॥९१॥आहेपणा जागृतींत असे । स्वप्नींही भास देहीं वसे । बहु बोलणें कासया अपैसें । आहे झोंपेमाजी ॥९२॥झोपी गेला परी मी नाहीं । ऐसा प्रत्यय नसे कवणाही । मी निजलों होतों निःसंदेहीं । या रीती आहे हा प्रत्यय ॥९३॥एवं आहेपणा सांगितला ऐसा । आतां चिद्रूप भातित्वें असे कैसा । तोही बोलिजे सावध असा । निरूपणासी ॥९४॥कर्णीं शब्द हा जाणतसे । त्वचीं स्पर्शातें ओळखीतसे । शब्द स्पर्श हे दोन्ही भिन्नसे । परी ज्ञान दोहींचें एक ॥९५॥शब्द स्पर्श जाणिले जया ज्ञानें । तेणेंचि रूपातें अनुभवणें । रस गंधातेंही ओळखणें । ज्ञानें ययाची ॥९६॥श्रोत्र ऐके परि देखेना । डोळा देख परि ऐकेना । एवं इंद्रियांचे धर्म घेववतीना । एकाचे एकासी ॥९७॥परि पांचांतें जाण एकलें । तें कधींही न जाय लोपलें । जरी ते विषय वेगळाले । परि ज्ञान एक ॥९८॥हे असो कर्मेंद्रियांची क्रिया । जाणणेंचि होय ज्ञाना यया । अथवा जडत्वें पंचविषयां । जाणें तेंचि ज्ञान ॥९९॥एवं जागृतीचे जितुके व्यापार । बहुधा परी पांचची प्रकार । तितुकेही जाणे सविस्तर । स्वप्रभें ज्ञान ॥५००॥ N/A References : N/A Last Updated : October 19, 2010 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP