मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या ३५१ ते ४००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ३५१ ते ४००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


गगन तत्त्वाचा व्यापार होणें । मुख्य आकाशाचें अंतःकरण ।
वायूंतून निघे ध्यान । तेजांतून श्रोत्र ॥५१॥
वाचा आपाचें कर्मेंद्रिय । पृथ्वीचा शब्द विषय ।
या पांचातत्त्वें व्यापारद्वय । होय ऐकणें बोलणें ॥५२॥
ऐकणे श्रोत्र ज्ञानेंद्रियाचें । बोलणें वाचा कर्मेंद्रियाचें ।
दोहींसी काज शब्दाचें । असे व्यापारा ॥५३॥
दोहींशी आधार चळणासी । ध्यान वायु निश्चयेंसी ।
जाण तें तत्त्व निवडावयासी । अंतःकरण ॥५४॥
आतां वायुतत्त्वाचा व्यापार होता । गगनांतून मन निघे तत्त्वतां ।
समान वायु हा आपण स्वतां । त्वचा तेजाची ॥
आपाचें पाणी कर्मेंन्द्रिय । पृथ्वीचा स्पर्श हा विषय ।
एवं पांच मिळतां व्यापारद्वय । स्पर्श देणें घेणें ॥५६॥
त्वचा ज्ञानेंद्रियाचें स्पर्शणें । पाणी कर्मेंन्द्रियाचें देणें घेणें ।
समान वायूचें चळण होणें । मन जाणतें तत्त्व ॥५७॥
ज्ञानेंद्रियद्वारा जाणावें । कर्मेन्द्रियद्वारा करावें ।
दोहींचा स्पर्श विषय व्हावे । व्यापार दोन ॥५८॥
होतां तेजतत्त्वाचा व्यापार । बुद्धि आकाशाची साचार ।
उदान वायूंतून अपार । स्वये तेजाचा चक्षु ॥५९॥
आपांतून घेतला पाद । पृथ्वींतून रूप विशद ।
हे पांच मिळून व्यापारभेद । पहाणें चालणें दोन ॥३६०॥
चक्षुज्ञानेंद्रियें पाहणें । पादकर्मेन्द्रियें चालणें ।
दोहींचा विषय रूप होणें । भोग्यरूप ॥६१॥
उदान वायु चळणा आधार । जाणतें तत्त्व बुद्धि सुंदर ।
एवं हा जाला विस्तार । तेज तत्त्वाचा ॥६२॥
आपतत्त्वाचा व्यापार होत । आकाशांतून घेतसे चित्त ।
प्राणवायूंतून निघत । जिव्हा तेजाची ॥।६३॥
आपाचें उपस्थ सुरस । पृथ्वींतून विषय रस ।
हे पांच मिळून होती बहुवस । अशनरती ॥६४॥
जिव्हा ज्ञानेंद्रियें रस घेणें । उपस्थकर्मेन्द्रियें भोगणें ।
दोहींचा विषय रस होणें । ग्रहणरूप ॥६५॥
दोहींस आधार चळणा प्राण । जाणावया चित्त संपन्न ।
एवं व्यापार पांचांचे होती दोन । आपतत्त्वाचे ॥६६॥
पृथ्वीतत्त्वाचा व्यापार । आकाशाचा अहंकार ।
अपानवायूचा निर्धार । तेजाचें घ्राण ॥६७॥
गुद तें आपांतून निघालें । गंधासी पृथ्वींतून काढिलें ।
या पांचांयोगें व्यापार जाले । गंधग्रहण विसर्ग ॥६८॥
घ्राणज्ञानेंद्रियें गंधग्रहण । गुदकर्मेन्द्रियें विसर्ग करणें ।
मुख्य विषय दोहींचा होणें । गंध हा भोग्य ॥६९॥
दोहींसी आधार चळणा अपान । जाणतें तत्त्व अहंकरण ।
एवं व्यापार जे होती दोन । पृथ्वीतत्त्वाचे ॥३७०॥
ऐसे हे पांच तत्त्वांचे । व्यापार होती पांचांचे ।
या पांचांत अधिष्ठान त्रिगुणांचें । तिहीं शक्तिरूपें ॥७१॥
अंतःकरण पंचक सत्त्वगुण । हे ज्ञानशक्ति संपूर्ण ।
बरें कीं वाईट निवडणें । यास्तव भोक्ता ॥७२॥
ज्ञानेंद्रियें सत्त्वगुण असतां । परी हे निर्गम द्वार तत्त्वता ।
म्हणोनि यासी क्रियारूपता । साधन भोक्त्स्याचे ॥७३॥
तस्मात् ज्ञानेंद्रियपंचक । दुजें कर्मेन्द्रिय क्रियारूपक ।
प्राणपंचक मिळोनि एक । क्रियाशक्ति बोलिजे ॥७४॥
एवं त्रिपंचकें रजोगुण । हें क्रियाशक्तीचें लक्षण ।
भोग्या घ्यावयाचीं साधनें । उपकरणें भौक्तियाचीं ॥७५॥
पंच विषय तमोगुण । हे द्रव्यशक्ति भोग्य संपूर्ण ।
एवं त्रिपुटीनें होय ग्रहण । सुखदुःख जीवा ॥७६॥
जयाविषयीं नुसता शब्द । तो श्रोत्रद्वारा होय वेद्य ।
जेथें शब्द स्पर्श द्विविध । तें वेद्य श्रोत्रत्त्वाचे ॥७७॥
जेथें शब्द स्पर्श रूप तीन । तें श्रोत्रत्वचा चक्षुसि ग्रहण ।
शब्द स्पर्श रूप रस चतुर्गण । तें श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हेसी शब्द स्पर्श रूप रस ।
जेथें गंधादि पांच सुरस । तें श्रोत्र त्वक्चक्षू जिव्हा घ्राणास । विषय वेद्य होय ॥७९॥
एवं भोग्य तमोगुणद्रव्यशक्ति । त्रिपंचकें रजक्रियाशक्ति ।
अंतःकरण सत्त्वज्ञानशक्ति । हे भाग्य भोगणें भोक्ता ॥
प्रत्यक्ष विषय स्थूलासी । भोग जो घडे निश्चयेंसी ।
हे जागृति अवस्था जीवासी । घडे साभिमानें ॥८१॥
विषय इंद्रियांवांचून । कल्पनेनें विषय कल्पून ।
सुख दुःख भोगी अभिमान । ते स्वप्नअवस्था ॥८२॥
एवं जागृति स्वप्न स्थानीं दोही । जीव संचरे दों लोकीं पाही ।
सुषुप्तींत मात्र संचार नाहीं । परी नेणिवेंत गुप्त ॥
ऐसा एक देह पावत असतां । तों काल देहद्वयीं संचरतां ।
प्राणवियोगें मृत्यु पावतां । उत्तमाधमयोनीं ॥८४॥
ह्या लोकद्वयीं संचरे जीव । अनंत कर्मफल भोगास्तव ।
हें भ्रमण चुके ऐसा उपाव । त्रिभुवनीं नाहीं ॥८५॥
जैसा प्रावाहीं कीटक पडे । तया आवर्तीहून आवर्ती जाणें पडे ।
विसावा क्षणभरी आतुडे । ऐसा काळ नाहीं ॥८६॥
तैसा एक देह जरी त्यागावा । तों दुजा तेव्हांच अवलंबावा ।
तोही क्षय पावतां धरावा । तिजा उत्तम कीं अधम जेधवां अज्ञानें भिन्न
पडिला जीव हा मी मानून बैसला ।
तेव्हांपासून प्रवाहीं सांपडला । जन्ममृत्यूच्या ॥८८॥
निमिष्य एक विसावा घेतां । सुखा मागें दुःख होय भोक्ता ।
कीं दुःखा मागें सुख मागुता । भ्रमें कीटकापरी ॥
दैवें जरी किडा नदीतीरा । येतां कोणी देखिला नेत्रा ।
तेणें काढिला वोढून त्वरां । दयाळूपणें जरी ॥३९०॥
तरी तो वृक्षछाये तळवटीं । कीटक विश्रामे उठाउठी ।
ऐसीच सद्गुरूची होय भेटी । तया जीवासी जरी ॥९१॥
परी तो हृदयशुद्धीचे कडे । आला पाहिजे कोडें ।
त्याचेंचि बोधद्वारा सांकडें । फेडिती गुरु ॥९२॥
जन्ममृत्यूच्या प्रवाहांतून । काढिती तया बोधून ज्ञान ।
सुखें विश्रामें स्वरूपाभिन्न । कीं पुन्हां सुखदुःखा नातळे येर्‍हवी गुरुराज न भेटतां । अभिन्न ज्ञान न होतां ।
अन्य कोटि साधनें करितां । हा प्रवाह न निमे ॥९४॥
रविदत्ता हें सत्य वचन । कदां नोव्हे अप्रमाण ।
ऐसी गुरुवाणी ऐकोन । येरू साष्टांग घाली ॥९५॥
वारंवार प्रदक्षिणा । वारंवार वंदी चरणा । कंठ दाटला अश्रुनयना ।
फुटेना शब्द ॥९६॥
तैसाच गद्रद वाणी करून । त्राहि त्राहि बोले वचन ।
सोडवीं सोडवीं भवापासून । अन्य मी प्रार्थूं नेणें ॥९७॥
जय गुरू जय जय गुरू । कृपाघन करुणासागरु ।
भज दीनाचा करी अंगीकारु । न करीं उपेक्षा ॥९८॥
मी काया वाचा मनेंसी । शरण शरण श्रीचरणसी ।
दयाळा संरक्षून ब्रीदासी । उचित तें करा ॥९९॥
मागुतीं करून साष्टांग । चरणीं पडला दृढ अभंग ।
मग शंकरें उठवून लगबग । गाढ आलिंगिला ॥४००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP