मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या २२५१ ते २३००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २२५१ ते २३००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


तूं निरभिमान बिंबात्मा आठवून सुखःदुख भोगणें घडे ।
तें सूक्ष्माचें सूक्ष्मासी सांकडें । तुज आत्मयासी भोक्तृत्व न जोडे ॥५१॥
कवणेही काळीं रजोगुण क्रियाशक्ति मध्यमा ।
वाणी आदि विकार सूक्ष्मा । तूं निर्विकार ब्रह्मपरमात्मा ।
गुणविकारातीत ॥५२॥
नेणपण जें कारणशरीर । उगाचि मानिलासे विकार ।
तया नेणिवेचा होसी भासकर । तरी तुज नेणीव कोठें ॥५३॥
बुद्धीसीं निर्व्यापारता आली । तये नांवें सुषुप्ति ठेविली ।
ते अवस्था तुज नाहीं बोलिली । ब्रह्मप्रत्यगात्मया ॥५४॥
सुप्ति अवस्थेंचें स्थान हृदय । तूं स्थानमानातीत अद्वय ।
मी नेणता म्हणून घेता होय । तो अभिमानी प्राज्ञ ॥५५॥
अविद्येमाजी जो बिंबला । तेणें नेणीवपणा बळें घेतला ।
तो अभिमान तुज नाहीं स्पर्शला । ब्रह्मप्रत्यगात्मया ॥५६॥
सर्व विकार विश्रांतीस आले । तुजमाजीं सहजसुख पावले ।
पांथस्थ वृक्षछाये सुखी जाहले ।
तूं आत्मा वृक्ष अभोक्ता तमोगुण आणि इच्छाशक्ति ।
तेवींच विकारी वाणी पश्यंती । तूं आत्मा ब्रह्म चिन्मूर्ति ।
गुणविकारातीत ॥५८॥
एवं स्फूर्तीपासून देहापर्यंत । जितुका उद्भवला हा संघात ।
या रूपाहून विलक्षण अत्यंत । तें तूं ब्रह्म अससी ॥५९॥
इतुकीं ही तत्त्वें बत्तीस । मिळून देहत्रय पंचकोश ।
इतुक्यांचे रूपाहुनि जो चिदंश । ते तूं ब्रह्म अससी ॥२२६०॥
जैसें घटजल जलाकाशासी । भिन्न महदाकाश पूर्णपणेंसी ।
तेवीं स्थूलसूक्ष्मांसह प्रतिबिंबासी । भिन्न चिद्रूप ब्रह्म तूं ॥६१॥
सर्वांचे रूपाहून भिन्न जे चिती । ते लिंपेल केंवी गुणदोषाप्रती ।
तस्मात् जागृदादि विकार न स्पर्शती । तें तूं ब्रह्म अससी ॥६२॥
घटादिकांचे व्यापार । गगना न स्पर्शती अणुमात्र ।
तेवीं न स्पर्शती अभिमानादि विकार । जयासी तें तूं ब्रह्म ॥६३॥
सद्रूप चिद्रूप आनंदरूप । त्यावरी हें सर्व नामरूप ।
हा अवघा नव्हेसी तूं आरोप । अधिष्ठान ब्रह्म आत्मा ॥६४॥
तो तूं ब्रह्म आत्मा आजी । नवा न होसी पहिलाची सहजीं ।
कल्पना मात्र भाविली जे दुजी ।
ते सांडितां तेंचि तूं तेंचि तूं ऐसेंही बोलता ।
विरोध मानिसील तत्त्वतां । कीं हा तूं या शब्दा अपरोक्षता ।
तें परोक्ष जाहलें ॥६६॥
तरी याचें ऐकावें उत्तर । जरी तें तूं शब्द अपरपर ।
हा उपाधीस्तव भासमात्र । परी स्वतंत्र एकरूप ॥६७॥
जेवीं तूं राजा राजपदीं । होतासी सुखरूप शय्येविशदीं ।
तोचि तूं स्वप्नीं मेळऊन मांदी ।
भीक मागसी अंत्यज गृहीं या कंगालाचे उपाधीकरितां ।
तो तूं राजा म्हणावें तत्त्वतां ।
हा भिकारी नव्हेसि जाहलासी जो आतां । ऐसाचि प्रकार हाही ॥६९॥
राजा म्हणजे सच्चिदानंद ब्रह्मा । तेंचि तूं अंगें आत्माराम ।
हें हें बत्तीस स्वप्नस्थ रूप नाम ।
नव्हेसि ओळखी भ्रम हा हाचि मी ऐसें जें वाटलें ।
यास्तव हें तूं नव्हेसि उपदेशिलें । परी हें अपरोक्ष नाहींच जाहलें ।
तरी तें परोक्ष केवीं ॥७१॥
हें नाहींच तें तूं अससी । येथें परोक्षता अपरोक्षता कैशी ।
तथापि भाविसी जरी मानसीं । तरी हे उपाधि सांडी ॥७२॥
जैसें स्वप्नगत कंगालत्व त्यागिलें । तरी राजाचे राजपद तें संचलें ।
तैसें सर्व हें मिथ्यात्वें निरसिलें ।
तरी तूं ब्रह्मब्रह्मीं ऐता हे उपाधि ईश सर्वज्ञापासून ।
साकारपर्यंत जितुकें तृण । हे पूर्वींच आम्हीं केली निरसन ।
धर्मधर्मीसहित ॥७४॥
येथें विरोध तरी असे कैंचा । मुळींच त्याग सर्वज्ञ किंचिज्ज्ञाचा ।
हा अवघाची भ्रम स्वप्नींचा ।
जाहला तेव्हांचि नाहीं जीवेशाचें मात्र ऐक्यकरण ।
तरी वाच्य विरोधामुळें न होणें । जैसा तो हा देवदत्त म्हणणें ।
येथें विरोध ॥७६॥
म्हणोनि जहदजहल्लक्षणा । केली पाहिजे एकीकरणा ।
हेंही अल्पसें बोलूं वचना । दृष्टांत द्राष्टांतीं ॥७७॥
तो म्हणजे काशीदेश । तेथें उष्णकाळ तरुण विशेष ।
देखिला होता सदंत शामकेश । त्यासी बहू दिन जाहले ॥७८॥
तोचि आतां ययादेशीं । देखिला असे वर्षाऋृतुसी ।
दंतभग्न श्वेतकेशी । वृद्ध हा पाहिला ॥७९॥
काशी देश आणि हा देश । उष्ण पर्जन्यकाळ कीं शाम श्वेतकेश ।
तरुण जरा सदंत अदंतास ।
अति दिसे विरोध म्हणोनि तो आणि देश एथीचा ।
पर्जन्य उष्णकाळ मासाचा । तरुण आणि वृद्ध आतांचा ।
त्यागावा सहसा ॥८१॥
शामकेश किंवा सदंत । श्वेतकेश आणि त्यागावे अदंत ।
मुख्य तोचि हा देवदत्त । पुरुष मात्र घ्यावा ॥८२॥
तैसा तच्छब्दें तो ईश्र्वर । त्वं म्हणजे जीव अनेश्र्वर ।
अससी म्हणतां सत्य जरी उत्तर । परी विरोध भासे ॥८३॥
ईश सर्वज्ञ विद्या हे उपाधि । जीव किंचिज्ज्ञ अविद्या संबंधीं ।
ही लक्षणें एकमेकां विरोधी ।
तरी ऐक्य कधीं नव्हे ऐसेंचि तो या सर्व जगाचा कर्ता ।
हा जन्मून सुखदुःख भोक्ता । नियम्य नियंता ऐशी हे विषमता ।
तरी समता केली ॥८५॥
तस्मात् किंचिज्ज्ञ आणि सर्वज्ञ । विद्या अविद्या विरोधी दोन ।
कर्ता भोक्ता नियंत्यादि लक्षण । सांडिजे विरोधास्तव ॥८६॥
ईश हा प्रतिबिंब जयाचा । जीवही उभारला तयाचा ।
तोचि आत्मा ब्रह्म ह्मणतां कैंचा । असे विरोध ॥८७॥
जीवेशाचें वाच्य त्यागुनी । लक्ष्याशीं ऐक्य पूर्णपणीं ।
येथें परोक्षापरोक्ष म्हणोनी । केली पाहिजे लक्षणा ॥८८॥
तैसा नव्हे आमुचा पक्ष । वाच्य नाहींच एकरूप लक्ष्य ।
तो तूं आहेस म्हणतां प्रत्यक्ष । विरोध नाहीं ब्रह्मात्मया ॥८९॥
हें ईशादि तृणांत पहिलें । मिथ्या म्हणून स्वतां निरसलें ।
अखंडैकरस सहज उरलें । तें तूं ब्रह्म आत्मा ॥२२९०॥
अस्ति भाति प्रियरूप आत्मा । सच्चिदानंद ब्रह्म परमात्मा ।
ऐथें विरोध कोणता रूप कीं नामा ।
तरी त्यागावें काई तें तूं म्हणतां या शब्दासी ।
विरोध दिसला आहाच बुद्धीसी । परी या त्यागितां सर्व मिथ्यासी ।
तें तें जाय सहज ॥९२॥
येथें रविदत्ता मागील स्मरावें । पूर्ण दृष्टांता आठवावें ।
वृक्षीं बैसला तो आणि वाहावे । जो कां प्रवाहा ॥९३॥
पडिला तो कधी नाहींच नाहीं । वृक्षस्थ तो एकचि सर्वदाही ।
अरे हा तूं नव्हेसि तोचि तूं पाही ।
वृक्षीं बैसला तो तैसाचि तो सर्वांचा अधिष्ठान ।
हा संघ नव्हेसि तूं आपण । तस्मात् मायादि तृणांत त्यागून ।
उरसी तो तूं ब्रह्मात्मा माया अविद्या ईश ।
बुद्धयादि देहांत सर्व अनेश । याचें मुख्य रूपचि मिथ्या फोस ।
तरी धर्म सत्य कैसे याचि हेतु सर्व रूपांहूनी ।
आणि सर्व गुणदोषांही पासूनी ।
चित्कला विलक्षण बोलिलें व्याख्यानीं । तो तूं ब्रह्म आत्मा ॥९७॥
हें सत्य सत्य पुनः पुनः सत्य । तोचि तूं ब्रह्म आत्मा आदित्य ।
हे नव्हेसि बत्तिसही अनित्य । धर्म अथवा धर्मी ॥९८॥
हा तत्त्वमसि वाक्याचा उपदेश । काढून दिधला तुज सारांश ।
आतां हा दृढ करी कीं मी अविनाश अन्य मीपण त्यागें ॥९९॥
येथें संशय जरी असे तुज । तरी पुसावें बापा सहज ।
तें प्रगट करूं जरी असतां गुज । न बोलावया योग्य ॥२३००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP