मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या १५०१ ते १५५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १५०१ ते १५५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


मायादि तृणांत सहजचि जाहलें । यास्तव हें स्वभावेंचि उद्भवलें ।
यया नामरूपीं उगेंचि कल्पिले । प्रकार दोन ॥१॥
येक स्वाभाविक आणि दुसरें । ईक्षणें निर्मिलेंसे ईश्र्वरें ।
दोन्ही मायासामर्थ्य परि निमित्तमात्रें । जाण त्या हेतूचें ॥२॥
मायास्फूरण जाहलें सहज । तेथें स्मरणास्मरण दोन्ही बीज ।
स्मरण तें कळणें ज्ञान चोज ं अस्मरण न कळणें अज्ञान एवं विद्या
अविद्या सहज जाहलिया । त्यांत सहजीं पडणें आपसया ।
प्रतिबिंबा नामें दोहींचिया । जिवेश्र्वर दोनी ॥४॥
इतुकें सहज जाहलें निर्माण । हें स्वाभाविक बोलावें वचन ।
पुढें सहजचि परी कल्पावें भिन्न । कीं ईशें निर्मिलें ॥५॥
विद्या प्रतिबिंबित ईश्र्वर । सर्वज्ञ ज्ञानाभास चतुर ।
तया ईक्षणमात्रें नाना प्रकार । होते जाहले ॥६॥
प्रथम गुण शक्तीसहित । सत्त्वगुण तोचि ज्ञानशक्ति विख्यात ।
क्रियाशक्ति रजोगुणयुक्त । द्रव्याशक्ति तमोगुण ॥७॥
तमोगुणाची द्रव्यशक्ति । तेचि पंचभूतें स्पष्ट दिसती ।
जयांचे पंचविषय बोलिजेती । अनुक्रमेंकडूनी ॥८॥
आकाश वायु तेज आप भूमि । हीं पांच भूतें सविषय नामीं ।
शब्द स्पर्श रूप रस गंधानुक्रमीं । हे पंचविषय पांचांचे हेचि मुख्य पंचमहाभूतें ।
यांपासून तीं भौतिकें समस्तें । जे करून केलीं
पंचीकृतें । तीं निरोपिलीं मागां ॥१५१०॥
अवघियां मिळून चारी खाणी । पांचवी मानसिकाची उभवणी ।
इतुकींही भौतिकात्मक खाणी । भूतेंविण पदार्थ नसे कल्पनेनें सहज जाहलें तें मानसिक सहज उद्भवलें ।
जारापासून जे जन्मले ।
ते जरायुज ॥१२॥
अंडापासून जे जे होत । ते ते अंडज बोलिजेत ।
स्वेदापासून जे जे निर्मित । ते ते स्वेदज ॥१३॥
उद्भिजाचे प्रकार दोन । एक वायूपासून होती निर्माण ।
दुसरे वृक्षादि तृणांत संपूर्ण । स्थावर बोलिजे ॥१४॥
स्थावरात्मक ते न चालती । भूमींत समूळ रोविले असती ।
तेथें प्राण किंचित् न वाहती । म्हणोनि जड ॥१५॥
येर उरले ते जडचि असोनी । प्राणास्तव चालती खाती म्हणोनी । जंगम ऐसें बोलिजे वाणी ।
एवं प्रकार दोन जडाचे एवं इतुकें हें दृश्य ब्रह्मांड । त्यांत सान थोर नानापिंड ।
सर्वही नामरूपात्मक झाड । मायामूळाचें ॥१७॥
इतुकियासी आधार एक । अधिष्ठान ब्रह्म निश्चयात्मक ।
सर्वीं अस्ति भाति प्रियात्मक । ज्यावरी नामरूपें दिसतीं जैसें एक आकाश निश्चळ ।
त्यांत सान थोर घट सकळ ।
मडकीं रांजण बोळकीं परळ । अथवा नानाविध पात्रें ॥१९॥
तैसें परब्रह्म जें निघोट । त्यामाजीं ब्रह्मांड हा मठ ।
तया मठीं नाना पिंड घट । दाट ठेविले ॥१५२०॥
कित्येक जळें असती भरले । ते ते पिंड जंगम बोलिले ।
कित्येक कोरडे असती ठेविले । ते सूक्ष्माविण स्थावर ॥२१॥
कोरडे घटीं जलाकाश न दिसे । परी व्यापकपणें आकाश असे ।
सूक्ष्मावीण जीवेश नसे । परी ब्रह्म असे स्थावरीं ॥२२॥
आहे दिसे आणि चांगुलें । हे अस्ति भाति प्रिय संचलें ।
यया अधिष्ठानीं रूप तें आकार आलें ।
नाम ठेविलें ओळखीसी आतां सजल घट ते जंगम ।
जे जे सप्राण उत्तमाधम । त्यांत अस्ति भाति प्रिय परम ।
आणि सूक्ष्मासह जीवेश ॥२४॥
सुवर्णादि घट धातूंचे । तैसे उत्तमोत्तम पिंड देवाचे ।
मध्यम मानव जेवीं खापराचे । शेणादिकांचे कीटक ॥२५॥
ऐसे घटपिंड चिदाकाशीं । मांडिले असती एकरसीं ।
त्यांत वास्तव्य ज्ञानक्रिया दोहींसी । सत्त्वरजात्मक ॥२६॥
देहमात्र साकार जितुका । तमोगुण द्रव्यशक्तीचा तितुका ।
या सर्वांमाजीं संघ हा आसिका । असे जीवेशांसह ॥२७॥
इतुकें वेगळालें पाहणें नलगे । एका देहाचें पहावें अंगें ।
सर्वही माया अविद्यादि सोंगें । अनुभवा येती ॥२८॥
जेवीं घट उदंड गगनीं असती । तितुके भिन्न पहावे न लगती ।
एका घटाची कळतां रीती । सर्व कळले ॥२९॥
तैसेंचि जयासी वाटे विचारावे । तेणें आपुले देही पहावें ।
सर्व पदार्थमात्र अनुभवावे । मग सर्वों आणावे प्रत्यया ॥३०॥
घटामाजीं जैसें जल । तैशी सूक्ष्मदेहाची चळवळ ।
जयाचीं सत्रा तत्त्वें सकळ । परी कोश तीन ॥३१॥
उगे चंचळपणें वावरती । तें पंचप्राण नखशिख वाहती ।
तेणें आधारें पांच क्रिया उमटती । बाह्य कर्मेंद्रियांच्या ॥३२॥
वाचेचें बोलणें पणि देत घेत । पाद चाले उपस्थ रति भोगित ।
गुदेंद्रिय मळमूत्रविसर्ग करित । हे क्रियाशक्ति प्राणाची एवं दहा प्रकार
क्रियेचे । प्राण कर्मेंद्रिये प्राणमयाचे । ऐसेच ज्ञानशक्ति मनोमयाचे । सहा प्रकार ॥३४॥
चंचळपणीं वावरावें । परी पदार्थमात्र ओळखावे ।
निश्चयेंविण संशयीं पडावें । तेंचि मन ॥३५॥
तेंचि पांचा द्वारे निघोनी । बाह्यविषयीं पडे जाउनी ।
ज्ञानेंद्रिय नाम त्या द्वारा लागुनी ।
श्रोत्रत्वक् चक्षु जिव्हा घ्राण ॥३६॥
ऐकणें स्पर्शणें पहाणें । रस कळे गंध घेणें ।
हे पांचही ओळखावे मनें । परी संशय न फिटे ॥३७॥
एवं ज्ञानेंद्रियें पांच सहावें मन । हें मनोमयकोशाचें लक्षण ।
हें प्राणमयाचे अंतरीं जाण । त्याहून सूक्ष्म असे ॥३८॥
जैशी मनासी ज्ञानशक्ति । तैशीच बुद्धीसी ज्ञानस्फूर्ति ।
परी संशयरूप मनाची व्यक्ति । बुद्धि निश्चय करी ॥३९॥
या बुद्धीसीही ज्ञानेंद्रियद्वारा । जाणें असे शब्दादि व्यापारा ।
म्हणोनि तेचि पांच साहाकारा । बुद्धीसी असती ॥४०॥
तस्मात् पांचही ज्ञानेंद्रिय । सहावी बुद्धि जे करी निश्चय ।
हाचि जाणावा विज्ञानमय । ज्ञानशक्तीरूप ॥४१॥
एवं प्राण मन विज्ञान । हें लिंगदेहाचे कोश तीन ।
ज्ञान क्रिया शक्ति दोन । असती गुणांच्या ॥४२॥
एवं कोशत्रयात्मक सूक्ष्म । सत्रा तत्त्वांचा अनुक्रम ।
स्थूलदेहामाजीं संभ्रम । घटीं जेवीं पाणी ॥४३॥
आर्द्र चंचल जेवीं पाणी । तेवीं विहार प्राणालागुनी ।
झळके पाणी तेवीं मन विज्ञानीं । ज्ञानशक्ति असे ॥४४॥
त्यांत कांहींसा झावळपणा । तेवीं संशयरूपता असे मना ।
केवळ झळझळ तेवीं विज्ञाना । निश्चयात्मकता ॥४५॥
असो ऐसे मन बुद्धि दोन । त्यांत मुख्यत्वें वसती गुण तीन ।
जें मागां सांगितलें लक्षण । घोर मूढ शांतवृत्ति ॥४६॥
एवं स्थूलादि गुणांपर्यंत । स्वाभाविक परी इशानिर्मित
सांगितले घट सजलयुक्त । स्थूल सूक्ष्म दोन्ही ॥४७॥
आतां ईश जीवाचे उत्पत्तीपूर्वी । जे स्फूर्तिरूप तत्त्वें स्वभावीं ।
तेही वृत्तीमाजीं पहावी । सूक्ष्मदृष्टी ॥४८॥
मुख्य अहंब्रह्मास्मि स्फुरण । जे कां मूळमायेचें लक्षण ।
तेंही सहजत्वें आठवण । होतसे पिंडीं ॥४९॥
तेचि आठवण निर्विकल्प । सर्वदां होतसे आपेआप ।
परी ते न कळे झडकरी संकल्प । होतां बहिर्मुख होय ॥१५५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP