मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या ३०१ ते ३५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ३०१ ते ३५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


तेवींच स्वप्नीं दृश्यासी । पाहतसे कल्पून मानसीं ।
त्यांत आपण एकअसे तयासी । कल्पूनी पाहे ध्यासें ॥१॥
दृश्य आणि आपणाही कल्पिलें । परि हाचि मी त्या दृढ धरिलें ।
हे हे अन्य ते परते वाटले । मज सुख दुःख देती ॥२॥
एवं स्वप्नांत जो अभिमान धर्तां । तोचि तैजसाभिमानी तत्त्वता ।
पुढें झोंपही जरी लागतां । मीपणा न त्यागी ॥३॥
मी काय बहु वेळ निजेलों । होतों अन्य किमपि न स्मरलों ।
सुखदुःखासी न होतों स्पर्शलों । आणि कांहीच नेणें ॥४॥
कांही विषय इच्छा नाहीं केली । न किंचित्स्वप्न-अवस्था देखिली ।
ते जागें जालिया आठवली । परि अनुभविली नेणीव तेथें मीपणा जरी नसतां ।
तरी जागृतींत अनुभवा न येता ।
एवं नेणिवेचा अभिमान धर्ता । तो प्राज्ञ अभिमानी ॥६॥
एवं जागृति स्वप्न सुषुप्ति । ऐसिया तिन्ही अवस्थांप्रती ।
मीच म्हणोनि दृढ प्रतीति । तया बोधाभासाची ॥७॥
या तीन अवस्था स्वाभाविक । परी अन्य असती आगांतुक ।
तेथेंही मीपणा आवश्यक । उणा नोव्हे ॥८॥
मुद्रल प्रहारें मूर्च्छा आली । तेंव्हा मज मूढत्वें पडली भुली ।
हेही सावधानीं अठवली । परी तेथें मीपण होतें ॥९॥
तैसेंच मरण जेंव्हा पातलें । तेंही मी मेलों ऐसें भाविलें ।
परी अभिमानाचें उणें जालें । नाहीं रोम ॥३१०॥
हें असो समाधींत बैसतां । मीपणासि नये उणिवता ।
मी सुखी बैसलों सांडून परता । विषय चिंतनादि ॥११॥
ऐसा मीपणा धरिला जेणें । तोच जीव आभास वोळखणें ।
असो देहक्रिया जे जे होणें । ते ते म्हणे म्यां केली ॥१२॥
स्नान संध्या स्वधर्म कर्म । नित्य नैमित्तिक यज्ञ होम ।
दान अथवा नित्य नेम । कर्ता मीच पुण्यासी ॥१३॥
शास्त्रीय जें कां न करावें । तें जरी केलें स्वभावें ।
तेंचि अभिमानानें माथां घ्यावें । पाप केलें म्हणोनी ॥१४॥
अथवा लोकरीती विषय । जैसा जैसा वर्ते काय ।
तें तें माथां घेत जाय । पुण्य पाप म्हणोनी ॥१५॥
विचार पाहतां जीवासी । करणें नाहीं आभासासी ।
परी मी कर्ता बुद्धि जरी ऐसी । तरी तें भोगावें लागे ॥१६॥
देह इंद्रिय आणि प्राण । कर्म आणि अंतःकरण ।
हें इतुकें मिळतां संपूर्ण । करणें घडे ॥१७॥
देह नसतां प्राण इंद्रिय । चित्तें कर्में करणें ही काय ।
इंद्रियांविण करणें न होय । देहादिही असतां ॥१८॥
प्राणेंविण इंद्रिय देहे । मन कर्म जरी आहे ।
तरी कर्म निफजूं न लाहे । शुभ कीं अशुभ ॥१९॥
एकलें अंतःकरण नसतां । देह प्राणादि असतां ।
कर्में नुद्भवती तत्त्वतां । तस्मात् कर्ता कोण ॥३२०॥
होणें कर्म नाहीं उदेलें । जरी मन इंद्रियादि असलें ।
तरी कर्में न घडतील जाणिलें । पाहिजे विचारें ॥२१॥
जीव तरी बुद्धि आंत । मिथ्यात्वें प्रतिभास दिसत ।
तेथें करणियाचा संकेत । उपाधिविण केवीं ॥२२॥
एवं सर्व हे भिन्न भिन्न । परी कोठेंचि नाढळें कर्तेपण ।
उगेंचि भाविलें न कळून । अभिमानें मी कर्ता ॥२३॥
नेणें देह इंद्रिय प्राण । नेणें कर्म अंतःकरण ।
नेणें जीवाचें काय लक्षण । उगाचि सर्वां मी म्हणे ॥२४॥
एवं तया मीपण योगें । अन्याचें कर्म तें म्यां केलें अंगें ।
तया ध्यासेंचि लागेवेगें । मज भोगणें लागे मानी ॥२५॥
पुण्य केलें तेणें मज । पुढें सुख होईल सहज ।
पापें घडलीं जीं जीं सहज । तेणें दुःख होय पुढें ॥२६॥
ऐसें जें जें कर्म जालें । तें तें कर्तेपणें दृढ भाविलें ।
तितुकें ध्यास अंतरीं बैसलें । हा देह पडिला जरी ॥२७॥
मरणकाळीं ऐशी वासना । दृढ धरून पावे अवसाना ।
तयाचि ध्यासें पावें जनना । भलतेहि योनी ॥२८॥

सएवसंसरेत्कर्मवशाल्लोकद्वयेसदा ।

ऐसा जो चिदाभास जीव । जेणें मीपणाचा घेतला भाव ।
तोचि जन्ममरणा पावे स्वयमेव । अध कीं उर्ध्व लोकीं मीपणध्यासें एक देह सोडी ।
एक देहा पावे परवडी ।
सदां फिरताचि असे आवडी । कर्मफलाची धरोनी ॥३३०॥
जेव्हां पुण्यकर्माचा उदय । तेव्हां स्वर्गस्थ होय स्वयें ।
पाप उद्भवतां अधोगती जाय । नाना नीच योनी ॥३१॥
अंतकाळीं जे आठवण । तैसा देह पुढें होणें । ऐसा कर्मवशें कडून ।
पुनः पुनः जन्मे मरे ॥३२॥
जन्ममरणा नाम संसृती । हें भ्रमण न चुके कल्पांतीं ।
मा असो अधम कीं उत्तम गती । परी भोगी अचुक ॥३३॥
उत्तमामागें अधम । कीं अधमामागें उत्तम । हा कांहीं न संभवे नेम ।
कर्मा ऐसें होय ॥३४॥
उत्तमाचा उत्तमची । कीं अधमाचा अधमची ।
हा नेम न संभवे कांहीची । परी जन्मे कर्मवंशें ॥३५॥
मनुष्यापासून कीटकांत । वृक्षादि हे अधम समस्त ।
तैसाचि मानवापासोन देवांत । उत्तम योनी ॥३६॥
यास्तव मानव देह हा मध्यम । येथें पुण्यपाप असे सम ।
या तळीं हे सर्व अधम । उत्तम ते ऊर्ध्व ॥३७॥
देव गंधर्व यक्ष स्वर्गावासी । तेथून जरी सत्यलोकवासी ।
हे उत्तम गति असे जीवासी । परी संसृति न चुके ॥३८॥
सलोकता समीपता । तिसरी ते मुक्ति स्वरूपता ।
चौथी सगुण ही सायुज्यता । परी भ्रमणें न चुके ॥३९॥
सायुज्यांत जे उर्ध्व गती । तयाही म्हणावी संसृती ।
मा अधमत्वें जे मरती जन्मती । तेथें बोलणें नको ॥३४०॥
जोंवरी अज्ञान न फिटे । जंव स्वरूपज्ञान नव्हे गोमटें ।
तोंवरी संसृति न पालटे । जन्ममरणरूप ॥४१॥
जन्मता साकार प्रगटावा । मरता वासनेंत गुप्त असावा ।
ऐसा लोकद्वयी हा फिरावा । सदां जीव ॥४२॥
देह प्रगटता सत्रा प्रकार । प्रगटती करिती व्यवहार ।
तेथेंही स्वप्न किंवा जागर । फिरे या लोकद्वयीं । ॥४३॥
मग असो देव कीं मानव । अथवा कीटक गो अश्र्व ।
परी स्वप्न जागरीं दोन्ही ठाव । असे भ्रमणें ॥४४॥
जन्ममरण हे संसृती । कीं फिरणें स्वप्नीं जागृती ।
एवं भ्रमणें जें जीवाप्रती । चुके ना कीं ॥४५॥
अथवा संसृति हा संसार । म्हणजे देहद्वयाचा व्यापार ।
केव्हां स्वप्नं केव्हां जागर । या लोकद्वयीं संचरे ॥४६॥
तया व्यापाराचे पांच प्रकार । होत असती सविस्तर ।
त्यांत एकेक व्यापारीं साचार । पांच पांच तत्त्वें ॥४७॥
तेचि व्यापार कैसे कैसे । बोलिजेत असती अल्पसे ।
मुमुक्षें अवधारितां मानसें । विवेचन घडे ॥४८॥
पूर्वी अपंचिकृत उद्भावलीं । तेचि तत्त्वें पंचीकृत जालीं ।
एकेकांत पांच पांच राहिलीं । पुढें प्रवेशलीं देहीं ॥४९॥
व्यापार जेधवां होत । तेव्हां येकेकांतून एकेक निघत ।
पांचाचे पांच जेंव्हां मिळत । तेव्हां व्यापार एक होय ॥३५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP