मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या १२०१ ते १२५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १२०१ ते १२५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


स्वप्रकाशें चिदुपता विषय तेंचि रूपरसादिकें साकारत्वें । दृश्य जितुकें ।
ब्रह्मादि स्थावरांत अनेकें । सान थोर ईशजनित ॥१॥
तयावरी जीवाची कल्पना । जे कां जीवसृष्टीची रचना ।
मनोमयात्मक भास नाना । प्रिय द्वेष्य उपेक्ष्य ॥२॥
ऐसे जीव ईशसृष्ट दोनी । प्रकाशीं आत्मप्रभा चित्खाणी ।
दुजें नसतां साह्य उपकरणीं । येकपणीं स्वतेजें ॥३॥
जैसा सूर्य आकाशींचा । दुजा साहाकारी तरी कैंचा ।
एकलाचि स्वप्रकाशें साचा । पदार्थमात्र प्रकाशी ॥४॥
भिंती माळवदें अंगणें । जैसा आकार त्रिचतृष्कोणें ।
त्यामाजीं घट ठेविले भिन्नभिन्ने । सजळें भरोनी ॥५॥
त्या जळामाजीं प्रतिबिंबे पडतीं । दुसरे सूर्याऐशींची वाटती ।
त्याची झळझळ पडली भिंती । सामान्य प्रकाशावरी ॥६॥
असो भिंती आणि घट सजळ । प्रतिबिंब आणि भिंती झळझळ ।
येकदांचि प्रकाशी सकळ । सूर्य माध्यान्हींचा ॥७॥
तैसाचि आत्मा सूर्य जगाचा । त्यावर आदि जंगमाचा ।
जया तळीं सर्वां उत्पत्तीचा । प्रकार जाला ॥८॥
ऐसा ब्रह्मांडरूप हा मठ । भिंती रूपरसादि ह्या नीट ।
त्यामाजीं चारी खाणी घट । लिंगजळें भरिलें ॥९॥
अथवा स्थूल मांसमय भिंती । त्यांत अविद्या घट अव्याकृति ।
जळ तेंचि बुद्धीची वृत्ति । आदिकरोनि सत्रा ॥१२१०॥
त्या बुद्धीमाजीं आत्मसूर्याचें । प्रतिबिंब पडलें जेवीं साचें ।
तेंचि रूप मिथ्यात्वें जीवाचें । चिदाभास नांवीं ॥११॥
त्या प्रतिभासाची झळझळ । रूपसादिकांवरी पडे सकळ ।
तेचि कल्पना उंच नीच बरळ । भावना जीवाची ॥१२॥
पहिलें रूपादि ईशनिर्मित । वरती जीवाचें भासरूप जनित ।
आणि बुद्धिआदि जीवासहित । भासवी चित्प्रभा ॥१३॥
जैसे भिंती घट जळासहित । प्रतिबिंब आणि भिंती झळकत ।
हें इतुकेंही एकदांचि प्रकाशित । निजतेजें सूर्य ॥१४॥
तैशी स्थूल अविद्याबुद्धि । प्रतिभास जीवही त्यामधीं ।
रूपरसादि ईशजनित आधीं । त्यावरी कल्पना जीवाची ॥१५॥
इतुक्यासहित जितुकें निर्माण । कार्य अथवा अज्ञान कारण ।
ज्ञान किंवा विपरीत ज्ञान । स्वयें प्रकाशी चित्प्रभा ॥१६॥
मूळ मायेपासून तृणांत । गुणविषय पंचभूत ।
ईश आणि ईशजनित । आत्मप्रकाशें भासती ॥१७॥
बुद्धिपासून विषयांत कल्पना । व्यापार मनोमय जे नाना ।
जीवजनित आणि जीवपणा । आत्मप्रकाशें भासती ॥१८॥
एवं साराही इतुका आभास । वाउगा अज्ञानें भासला भास ।
परी आत्मा हा येकदांचि सर्वांस । आत्मप्रकाशें भासवी या श्र्लोकींचें
निरूपण ऐसें । सत्यमिथ्या निवडिलें असे ।
आणि ईश जीवांचें निर्मित जैसें । तेंही स्पष्ट जालें ॥१२२०॥
मुख्य सामान्य आणि आभासानिवडिले कळावया साधकास
आणि अज्ञानकाळींही चिद्रुपासलोप नसे तें स्पष्ट जाहलें ऐसें ऐंकताचि रविदत्त ।
साष्टांग घाली दंडवत । जी जी महाराज हर्षें स्तवित ।
प्रश्र्न हेतु ठेऊनी ॥२२॥
द्वैत ईशाचें आणि जींवाचें । भिन्न भिन्न साकार मनोमयाचें ।
निरूपण जालें संकेतें त्याचें । परी अपेक्षा उरली ॥२३॥
वेद आणि शास्त्रें सारीं । हे निर्माण जाहलीं बहुधा परी ।
यांसी ईश कीं जीव । निर्माण करी । हें कळावें मज ॥२४॥
बहू बरें म्हणून श्रीगुरु । बोलते जाले करुणाकरु ।
यर्थार्थचि बोलिजे साचारु । निर्भीडपणें आतां ॥२५॥
जीवही साकार असेना । मा साकारत्व कैसें ईशाना ।
हें न कळून करिती वल्गना । उभयां साकारत्वाची ॥२६॥
पुरुषत्व आलें साकारत्वासी । श्र्वासही उत्पन्न तयासी ।
कल्पितां वेद होणें श्र्वासीं । अति विरोध कीं ॥२७॥
जरी पुरीमध्यें राहिला । पुरुष नाम यास्तव जीवाला ।
तरीही तया आभासाला । अभाव श्र्वासाचा ॥२८॥
तस्मात् श्र्वासापासून वेदाची । उत्पत्ति म्हणता साची ।
अपौरुषत्व यया वचनाची । हानि होय ॥२९॥
म्हणोनि अज्ञानाची कल्पना । स्वीकारिली जरी वल्गना ।
तरी अनुभवा उणेपणा । आणि श्रुतीसी विरोध ॥१२३०॥
यास्तव लोकवार्ता सांडावी । अनुभवें प्रतीति स्वीकारावी ।
तरीच हे भ्रांति निरसावी । येऱ्हवीं सदृढ ॥३१॥
असो स्वानुभवानुसार । बोलिजेत आहे सविस्तर ।
आधीं कैसा जीव कोण ईश्र्वर । पुढें वेद तो कैसा ॥३२॥
मागें तुजला ईशजीवाचें । रूप निवडून दिधलें साचें ।
परी तें तुजला कळलें न वचे । म्हणोनि पुन्हा सांगूं ॥३३॥
वृत्तिरूप माया उद्भवली । तेचि दोप्रकारें विभागली ।
विद्या अविद्या जे सांगितली । ज्ञानाज्ञानरूप ॥३४॥
अविद्येंत जाणतेपणाचें । प्रतिभासलें रूप तें जीवाचें ।
विद्येत प्रतिबिंब चिद्रुपाचें । तोचि ईश्र्वर ॥३५॥
अविद्या उपाधीमुळें जीवा । अन्यथात्वें भाव यावा ।
सूक्ष्मदेहाचा प्रकार व्हावा । विकार बुद्धिवृत्तीचा ॥३६॥
बुद्धिवृत्तींत जें पडिलें । तें बुद्धि न जाय कल्पिलें ।
तरी मग सत्रा प्रकारें जीवत्व जालें । कासयावरुनी ॥३७॥
बुद्धीचे विकार सत्रा असती । त्यांत प्राण जडत्वें पांच बोलती ।
त्या प्राणाचे श्र्वास उमटती । तरी ते न होती जीवाचे अज्ञानास्तव मात्र जीवानें ।
देहासहित तादात्म्य धरणें ।
तया अभिमानत्रयाचें बोलणें । पुढें निरोपूं ॥३९॥
कल्पनारूप जीवें केलें । तें आतां जीवसृष्ट सांगितलें ।
जें जें योजना करून उभविलें । जागृतीपासून मोक्षांत ॥४०॥
असो जीवांचें रूप ज्ञानाऐसें । परी तें ज्ञान नव्हे प्रतिबिंब भासे ।
तें बुद्धीहूनही अनारिसें । कळावें साधका ॥४१॥
आतां ईश जो विद्यात्मकवृत्ति । त्यामाजीं प्रतिबिंबरूप वस्ती ।
जयाची तो सर्वज्ञ अमूर्ति । विद्येऐसाही नव्हे ॥४२॥
तया वृत्तीपासून बहू निर्मित । जालें परी तें विकारा न पावत ।
अन्यथा न होऊन निवांत । स्फूर्तिरूप स्फूर्ति असे विद्यास्फूर्ति
विकारा न पवे । मा ईशें कैसें अन्यथा व्हावें । नुसधें विद्या उपाधीनें असावें ।
उत्पत्ति हेतु ठेउनी हिरण्यगर्भ सत्रा प्रकार । त्यांत या ईशाचें जरी बिढार ।
म्हणावें परी सर्वांचे विकार । सर्वज्ञा न लागती ॥४५॥
ऐसें ईशाचें जरी भासरूप । सांगितलें कळावया अल्प ।
तेथें श्र्वास ना नव्हे संकल्प । तरी योजना कैंची ॥४६॥
श्र्वास हे धर्म प्राणाचे । कल्पनारूप तें जीवाचें ।
श्र्वास संकल्पाविण ईशाचें । रूप नुसधें स्फूर्तिरूप ॥४७॥
तया स्फूर्तिज्ञानामुळें । भूत गुणादि जालीं सकळें ।
परी तें जीवेशाहून वेगळें । चंचळ जड दोन्ही ॥४८॥
आरंभी ब्रह्मा निर्माण जाला । स्वयंभूव नामें बोलती त्याला ।
परी तो साकार जेणें निर्मिला । तया नांव स्वयंभू ॥४९॥
साकारावरीच दृष्टि जयाची । अज्ञानास्तव बोलती तेची ।
कीं स्वयंभूव साकार विरिंचि । परी तें नव्हे ॥१२५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP