मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या १९०१ ते १९५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १९०१ ते १९५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


हें सत्य सत्य त्रिवाचा पूर्ण । जीवचि ब्रह्म यथार्थ ॥१॥
मुख्य आत्मा म्हणावें आपणासी । आपण तें ब्रह्म अविनाशी ।
प्रत्यगात्म ब्रह्म निश्चयासी । सदृढ धरावें ॥२॥
येथें जेणें अभाव कल्पिला । अथवा संशयीं वाउगा पडला ।
तो सत्य सत्य जाणावा बुडाला । मायामृगजलीं ॥३॥
जे गुणदोष आणि रूपाहूनी । चित्प्रभा निरोपिली पूर्णपणीं ।
तेचि आत्मत्व ब्रह्मत्व ऐक्यपणीं । येर अनात्मजात बत्तीस
श्रुति युक्ति अनुभवयुक्त । बोलतां कोणतें अयुक्त । ऐसा
आमुचा अर्थसिद्धांत । तेथें कोणी शंका करी ॥५॥
कीं अन्न प्राण मन विज्ञान । आनंदादि कोशांसिही संपूर्ण ।
श्रुति युक्ति अनुभव प्रमाण । तरी अनात्मत्व कैसें ॥६॥
अहं ब्रह्म प्राण ब्रह्म । मन ब्रह्म विज्ञानही ब्रह्म ।
आनंद ब्रह्म ऐसा हा नेम । श्रुतीच करी ॥७॥
ऐसें पंच कोशांसिही श्रुति । ब्रह्मत्व वाखाणी निश्चितीं ।
याची अर्थाविशीं युक्ति । असे तें दाऊं ॥८॥
सर्व भूतें अन्नापासूनी जाहलीं । आहे तों अन्नेंचि वांचलीं ।
लयासी पावलीं । अन्नामाजी ॥९॥
तैसेंचि प्राणापासून सर्व जाहलें । प्राणामुळें वांचलें मेलें ।
मन असतां उद्भवलें राहिलें । शेवटीं लयही मनीं ॥१९१०॥
ऐसेंचि विज्ञान आनंदापासूनी । उद्भवल्या राहती भूतश्रेणी ।
लयही पावताति निर्वाणीं ऐशी युक्तिही असे ॥११॥
श्रुति युक्ति ही प्रमाण जैशी । तेवीं अनुभूति बोलिजे अल्पशी ।
मी देह वाटतसे सर्वांसी । मीच क्षुधातृषायुक्त ॥१२॥
मीच संकल्पविकल्पात्मक असें । मीच निश्चयही करीतसें ।
मीच सुखरूपपणें वसें । हा अनुभव सर्वांचा ॥१३॥
तस्मात् श्रुतियुक्त अनुभव । युक्तचि पंचकोशांसी ब्रह्मत्व ।
ऐसें असतां अनात्मत्व । पंचकोशां केवीं ॥१४॥
ऐशी शंका जरी सप्रमाण । केली श्रुति युक्ति अनुभवेंकडोन ।
तरी याचें उत्तर ऐका सावधान । बोलिजेत असे ॥१५॥
अरे अन्न प्राण मनादिकांसी । श्रुति बोले सायासीं ।
तिचें रहस्य न कळे अल्पांसी । विचारवंत जाणती ॥१६॥
ज्याच्यापासून हे सर्व जाहलें । आणि जेथेंचि राहून मेलें ।
तेंचि ब्रह्म सर्व नाथिले । भूतजात ॥१७॥
भूत म्हणिजे निर्माण जाहलें । ईशादि तृणांत जाहलयांत आलें ।
भूतांवेगळें तें एकचि उरलें । तेंचि परब्रह्म ॥१८॥
तेंचि ब्रह्म कळावें साधकां । हाचि श्रुतीनें घातला आडाखा ।
कीं भूतादि परता तया एका । स्वानुभवें जाणावें ॥१९॥
ऐसें हें जाणावयाचें स्थान । श्रुति माउली दावी आपण ।
परी हे जीव एका वचनेंकडून । ब्रह्मत्व जाणतीना ॥१९२०॥
तेव्हां श्रुति ते पुन्हां मागुति । सांगती जाहली जीवाप्रति ।
कीं लय राहणें सर्वांची उद्भुति । तें ब्रह्म कोणतें विचारा तेंव्हा विचारही पाहतां करून ।
परी जीवा न कळे यारीतीं कोण ।
मग म्हणे अन्न प्राण मन । विज्ञान आनंदही असे हेंही बोलावया
असे कारण । कीं विचारवंत अधिकारी कोण । कळेल अनायासें
जो विचारहीन । गुंतेल सुटेल येर यास्तव हेतु जो कां आपुला ।
यथार्थ तो प्रगट नाहीं केला । तोचि अडाखा एथें बैसविला ।
यया पंचकोशांवरी ॥२४॥
कीं अन्नादि आनंदांत संपूर्ण । भूतें जाहलीं पांचांपासून ।
वांचती शेवटीं पावती मरण । या पांचामाजीं ॥२५॥
ऐसा संकेत करून श्रुति । उपदेशीत असे जीवाप्रति ।
म्हणे पहारे विचारून चित्तीं । यांत खरे ब्रह्मत्व कोणतें ॥२६॥
मग आपुलाले बुद्धीऐसे । विचार करिते जाहले मानसें ।
जे जे विचारासी पात्र जैसे । ते ते निश्चय करिती तैसा ॥२७॥
कोणी अन्नमयचि ब्रह्म म्हणून । बैसले पावले दृढबंधन ।
तैसेचि प्राण मन विज्ञान । ब्रह्म निश्चयें स्थापिती ॥२८॥
हें असो आनंदमयासी । ब्रह्मत्व कल्पिती जे मानसीं ।
तेही न पावती मुक्ततेसी । मा येर निश्चया मोक्ष केवीं ॥२९॥
हेंचि श्रुतीचें घेऊन वचन । गुरुत्वें सांगें चतुरानन ।
तेणें इंद्र आणि विरोचन । निश्चय करिती द्विविध ॥१९३०॥
विरोचनें अन्न ब्रम्ह कल्पिलें । देहासीच आत्मत्व दृढ केलें ।
देहपातांती  मोक्ष मानिलें । ते सुटले न म्हणावें ॥३१॥
तयाचा सहाध्यायी इंद्र । चारी वेळां जाऊन सत्वर ।
मुख्य ब्रह्माचा करून निर्धार । मुक्त जाला येर त्यागें ॥३२॥
ऐसाचि भृगुही वरुणाप्रती । पंचवेळां विचारून चित्तीं ।
आत जाईला तेणें जीवन्मुक्ति पावला सत्य निर्धारें ॥३३॥
तस्मात् श्रुतीनें अधिकार । पाहिला जीवाचा अल्पमात्र ।
म्हणून केला असे उच्चार । पांचांसी ब्रह्मत्वाचा ॥३४॥
येरव्हीं पांचकोशांसी ब्रह्मत्व । श्रुति बोलेना अघटितत्व ।
बोले तरी कैचें महत्त्व । श्रुतीसी उरलें ॥३५॥
एक ब्रह्म अद्वयही म्हणत । आणि पांचांलागीं  ब्रह्मत्व स्थापित ।
तरी कां मदिरा पिऊन । जाहली उन्मत्त । विरोधि प्रलाप करी ॥३६॥
परी ते श्रुति उन्मत्त नसे । हे अविचारी आपुलाले बुद्धीऐसे ।
स्वतां भ्रमीं आणि लाविती पिसे । श्रुति बरळ म्हणोनी असो तया
मुढासी काज काय । नेणती भवचा तरुणोपाय । आपण बुडोन श्रुतीवरी अपाय ।
विरोधाचा घालिती जरी मूढ विरोध श्रुतीसीं ।
ठेवितां उणीव नये तिसी । हें ज्ञाते जाणती बंधन येरासी ।
कल्पांत दृढ होय ॥३९॥
तस्मात् ब्रह्मत्व पंचकोशांसी । यथार्थ न बोले श्रुति अल्पसी ।
तरी अनात्मया ब्रह्मत्व कल्पना कैशी । करिती मूढ एवं श्रुति प्रमाण होतें मानिलें ।
तें विरोधास्तव व्यर्थ गेलें । आतां युक्तीनें पंचकोशां
ब्रह्मत्व आणिलें । तेंही निर्दाळूं अन्नापासून सर्व जाहलें ।
अन्न तो पृथ्वीसी  असे बोलिलें । आणि देहासीच ब्रह्मत्व कल्पिलें । कासयावरुनी ॥४२॥
या देहापासून जाहलें सर्व । कीं सर्व वांचलें या देहास्तव ।
कीं लय पावलें स्वयमेंव । एका देहामाजीं ॥४३॥
पृथ्वीपासूनही जाहलें म्हणतां । विरोध बहुत तत्त्वता ।
जाहलें तया असे भौतिकता ।
येर भूता उद्भव केवीं ईशादिकांसी कोण कारण ।
तें तों राहिलेंचि मुख्य अधिष्ठान ।
परी आकाशादि हे जाहले कोठून ।
पृथ्वी तों आपकार्य तैशींचि प्राणापासून सर्व ।
जाहलीं म्हणतां भूतें अपूर्व । तरी काय जाहला असे उद्भव ।
एकाच्या प्राणापासूनी आपोमयता असे प्राणासी ।
यास्तव आपीं उद्भव जरी कल्पिसी तरी ही उत्पत्ति नव्हे
सर्व भूतांसी । खाणी मात्र उद्भवती मनापासून जाहलें  म्हणावें ।
तरी मनासी भूतांचि रचना नव्हे । मन उद्भवता अमुकसें कल्पावें ।
परी रूपें पहिलीं असतीं तैसाचि बुद्धीनें जाहलियाचा ।
निश्चय करावा अमुक साचा ।
परी बुद्धीपासूनियां सर्वांचा ।
उद्भव नव्हे ॥४९॥
तस्मात् विज्ञानाचि ब्रह्म ऐसें ।
हें कल्पांतींही न घडे अल्पसें ।
आतां आनंदमयीं कारणात्व असे ।
परी एका पिंडीचिया नाहीं । ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP