मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या ४०१ ते ४५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ४०१ ते ४५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


नाभि नाभि हे रविदत्ता । तुझा भव हा सारूं परता ।
तूं कोण अससी तया आतां । भेटवूं ज्ञानें ॥१॥
नदीमाजीं कीटक पडिला । ऐसा जो कां दृष्टांत दिधला ।
तैसाचि जीव हा प्रवाहीं सांपडला । तो सत्य भाविला तुवां ॥२॥
हा खराच जरी वाहवता । तरी ज्ञानाच्या बापें न निघता ।
तस्मात् जाणें हा विचारें पुरता । भ्रमें वाहवला दिसे ॥३॥
भ्रमें वाहवला असे कैसा । तो बोलूं सावध हो मानसा ।
यासी साम्य दृष्टांत असे जैसा । तो अवधारीं ॥४॥
एक महानदी सखोल वहात । थोर वृक्ष एक असे तींत ।
त्यावरी पुरुष एक निवांत । बैसला असे ॥५॥
तो सुखरूप असतां बैसला । सहज अधोमुखें पाहता जाला ।
यया वृक्षासहित आपणाला । देखे पडिलों प्रवाहीं ॥६॥
आपण जो वृक्षासहित अचळ । तया स्वकीयत्वा विसरला सकळ ।
प्रवाहीं प्रतिबिंब कांपे चळचळ । तोचि मी भाविलें मी पडिलों
बोंबलत । कोणी काढा रे काढा त्वरित ।
 वाहूनि चालिलों काय न देखत । कृपेसहित कोणी ॥८॥
तैसा कूटस्थ निर्विकार । जों कां आपण ब्रह्मपर ।
या विकाराहून अति दूर । यांतचि असोनी ॥९॥
वृत्तीपासोनि तत्त्वें सत्रा । हें पाणी देखे द्रष्टा ।
नेत्रा त्यांत बिंबला तया अन्यत्रा । जीवा मी कल्पिलें ॥४१०॥
हाचि मी जीव प्रवाहीं पडिलों । जन्ममरण रूप वाहवलों ।
येथून केवीं जाय सुटलों । कवण्या साधनें ॥११॥
कैवारी देव कोणी असे । तोचि तारील कृपेसरिसें ।
म्हणून अट्टहास्यें पाहतसें । कर्म हेंचि बोंबलणें ॥१२॥
तो जरी खरा प्रवाहीं पडता । तरी देवासीही काढितां येता ।
जन ऐकोनि होती हेळसिता । तेवीं उपेक्षी देव ॥१३॥
कोणी हांसोनि नदीत गळ । टाकोनि धुंडित पात्र सकळ ।
तेवीं वेदवाणीं साधनें पुष्कळ । बोले जीव उद्धारा ॥१४॥
ऐसीं साधनें कल्पकोटी । केलीं जरी कल्पूनि मोठीं ।
तरी कां जीव हा उठाउठी । ज्ञानेंवीण मुक्त होय ॥१५॥
खरा जरी पडिला असता । कांहीं तरी उपाय चालता ।
येथें भ्रमें मानिलें तया सोडविता । ज्ञानेंविण कवण ॥१६॥
ऐसें ज्ञान गुरुविण कवण । बोधील बापुडा जरी देव येऊन ।
तस्मात् नाथिलिया दुःखांतून । काढिता सद्गुरु ॥१७॥
परी जयासी तया विवेक असिला । तरीच बोधें जाय सुटला ।
नाहीं तरी गुरुही अनधिकारियाला ।
उपेक्षून जाती तो विवेक कोणता म्हणसी । तरी अवधारीं निश्चयेसी ।
म्यां केले जितुकें मागां सायासीं ।
त्याचें फळ काय प्राप्त नदींत धुंडिती ते आपण पाहे ।
परी एकही पडिला न लाहे ।
तैशीं साधनें करितां लवलाहें । मी सुटलों न वाटे ॥२०॥
आणि मी बोंबलें हाका मारीं । परी कोणी धावेना कैवारी ।
तैसा मी दिननिशीं भजन करीं । परी देव कां न भेटे ॥२१॥
जरी मी खरा वाहवतों । तरी केवीं रडतों बोंबलतों ।
केवीं तारी तारी उच्चारितों । मी अज्ञान जरी ॥२२॥
आणि पडला पडिलिया न दिसे । हें तों मज साग्रत्वें दिसे ।
दिसे तरी मी पडिलों नसें । या नांव विवेक ॥२३॥
तैसा मी अंतःकरणापासून । देहापर्यंत जितुकें संपूर्ण ।
जाणतसें सर्वांलागून । तरी मी वाहवें केवीं ॥२४॥
जरी प्रवृत्तींत वाहवतों । तरी मी आपआपणा न पाहतों ।
मनादि विषयांत अवलोकितों । तरी मी हा नव्हें ॥२५॥
जरी मीच आपआपणा । अमुक अमुकसा दिसेना ।
तरी मज कृपाळू गुरुराणा । दावील अपरोक्ष ॥२६॥
ऐसा रविदत्ता विवेक जयासी । असेल अंतरीं निश्चयेंसी ।
तयासीच सद्गुरु उपदेशी । येरां उपेक्षी ॥२७॥
वृक्षीं बैसोनि पडिलों मानी । तयासी खरेपणें सांगे कोणी ।
कीं तूं न पडतां स्वस्थानीं । अससी वृक्षीं ॥२८॥
परी तयासी सत्य वाटतें । पडिलों निर्दय न काढी मातें ।
तैसाचि मी देह वाटे जयातें । जन्मतों मरतों खरा ॥२९॥
तयासी शास्त्र आणि गुरु सांगती । कीं देह नव्हेसी तूं आत्मा
चिन्मूर्ति । तया उपाय काय तयाची उपेक्षाचि गुरु करी ।
कारण कीं योग्य नव्हे अधिकारी । रविदत्ता ऐसें मानिसी अंतरीं ।
कीं गुरु निर्दय बुडतिया पाहून काढीना ।
भवव्याघ्रें धरिलें सोडवीना । तरी निर्दयामाजीं काय उणा ।
येविषयी ऐकें ॥३२॥
प्रवाहीं जरी खरा पडता । निर्दय म्हणावा त्या उपेक्षिता ।
बैसला पाहून वृक्षावरुता । त्यागितां दोष नाहीं ॥३३॥
तैसा आत्मा सर्वगत असोनी । परिपूर्ण असंग भिन्नपणीं ।
कदा न स्पर्शे जन्ममरणीं । सुखदुःखें नातळे ॥३४॥
येणें मात्र भ्रमें मानिलें । कीं जन्ममरण मज लागलें ।
परी सद्गुरु जाणती आपुले । ठाई आपण ॥३५॥
खरे बुडती तरी तारावें । खरे बांधिलें तरी सोडवावे ।
ऐसिये निश्रयें पाहोनि जावें । तया उपेक्षुनी ॥३६॥
कोणासींच नाहीं बंधन । कवणा नाहीं जन्ममरण ।
उगेंचि मानिती पामरजन । त्या उपेक्षितां बाध काय ॥३७॥
ऐसियाची बळे उपेक्षितां । गुरूसी न संभवे निर्दयता ।
तस्मात् ऐक बापा रविदत्ता । सत्य वचन आमुचें ॥३८॥
विवेकीयासी उपदेश करूं । अविवेकिया हातीं न धरू ।
मागुनिही हाचि निर्धारु । चालत आला ॥३९॥
आणि वर्तमानीं पुढें होणार । परि ज्ञात्याचा हाचि निर्धार ।
अंगीकारावें जया अधिकार । येरां उपेक्षावें ॥४४०॥
आणिकही मानिसी तूं ऐसें । कीं अन्य साधन सांगावें त्या ऐसें ।
तरी अवधारावें मानसें । दृष्टांतासहित ॥४१॥
पडलियासी टाकून गळ । प्रवाहीं धुडिती जन बरळ ।
परि जे सम नसती बाष्कळ । ते अनुमोदन देती ॥४२॥
तैशीं व्रतें तपें अनुष्ठानें । दानें तीर्थटनें पारणें ।
यज्ञ याग पुरश्चरणें । इत्यादि क्रिया ॥४३॥
अर्चन प्रतिमादिकांचें । अथवा भजन अवडत्या देवाचें ।
ऐसें साधन नाना परीचें । मोक्षा अनुपयोगी ॥४४॥
हेंचि नाना शास्त्रें प्रतिष्ठिती । पुराणेंही गलबला करिती ।
बहू कासया वेदही गाती । परी तो अर्थवाद ॥४५॥
येणें जीव हा बंधांतून । न सुटे हें सत्य सत्य प्रमाण ।
ऐसें ज्ञाते जाणती पूर्ण । कीं हें निरर्थक ॥४६॥
तस्मात् ज्ञाते अन्य साधना । कदां न सांगती मुमुक्ष नसतां येरां ही प्रेरणा ।
सहसा न करिती ते तों करितची असती सर्वें ।
तेंचि कासया प्रयोजावें । इतुकियापासून जें परतावें ।
हृदयशुद्धि होऊनि ॥४८॥
जे सर्व कार्मांपसून परतले । तेचि अंतर शुद्धीतें पावले ।
पुढें सद्गुरूसी शरण गेले । करूं लागले श्रवण ॥४९॥
श्रवणापरतें साधन कांहीं । अज्ञान निरासा दुजें नाहीं ।
तेंही श्रवण वेदांताचें पाहीं । जेथें ब्रह्मात्मा ऐक्य ॥४५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP