श्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय ५

श्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.


अर्जुन म्हणाला -

हे कृष्ण ! तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता ! तेव्हा या दोहोपैकीं माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल, ते सांगा. ॥१॥

श्रीभगवान म्हणाले -

कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याण करणारेच आहेत. परंतु त्या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे. ॥२॥

हे अर्जुना ! जो पुरुष कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची अपेक्षा करीत नाही, तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा. कारण राग-द्वेष इत्यादी द्वन्द्वांनी राहित असलेला पुरुष सुखाने संसारबन्धनातून मुक्त होतो.॥३॥

वर सांगितलेले संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारे आहेत, असे मूर्ख लोक म्हणतात; पण्डित नव्हते. कारण दोहोंपैकी एकाचे ठिकाणी सुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेल्या पुरुष दोहोंचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो. ॥४॥

ज्ञानयोग्याना जे परम धाम प्राप्त होते; तेच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते. म्हणुन जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत, असे पाहतो, तोच खर्‍या अर्थाने पाहतो. ॥५॥

परन्तु हे अर्जुना ! कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणार्‍या सर्व कर्माच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. आणि भगवत्स्वरुपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो. ॥६॥

ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंन्द्रियनिग्रही आणी शुब्द अन्तःकरणाचा आहे, तसेच सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्माचा ज्याचा आत्मा आहे. असा कर्मयोगी कर्मे करूनही अलित्प राहतो. ॥७॥

सांख्ययोगी तत्त्ववेत्याने पाहात असता, ऐकता असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, भोजन करीत असता, चालत असता, झोप असता, श्वासोच्छवास करीत असता, ॥८॥

बोलत असता, टाकीत असता, घेत असता तसेच डोळ्यांची उघडझाप करीत असताही सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहेत, असे समजून निःसंशय असे मानावे की, मी काहीच करीत नाही.॥९॥

जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्मे करतो, तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. ॥१०॥

कर्मयोगी ममत्वबुद्धी सोडून केवळ इन्द्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारा आसक्ती सोडुन अन्तःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात. ॥११॥

कर्मयोगी कर्माच्या फळांचा त्याग करून भगवत्प्राप्तिरूप शान्तीला प्रात्प होतो आणि कामना असलेला पुरुष कामानांच्या प्रेरणेमुळे फळांत आसक्त होऊन बद्ध होतो. ॥१२॥

अन्तःकरण ज्याच्या ताब्यात आहे, असा साख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्मे करणारा किंवा करविणारा न होताच नऊ दरवाजांच्या शरीररूपी घरात सर्व कर्माचा मनाने त्याग करुन आनन्दाने सच्चिदानन्दघन परमात्म्याच्या स्वरूपात स्थित राहतो. ॥१३॥

परमेश्वर मनुष्यांचे कर्तेपण, कर्मे किंवा कर्मफलांशी संयोग उत्पन्न करीत नाही; तर प्रकृतीत खेळ करीत असते. ॥१४॥

सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचेही पापकर्म किंवा पूण्यकर्म स्वतःकडे घेत नाही. परन्तु अज्ञानाने ज्ञान झाकलेले आहे. त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात.॥१५॥

परन्तु ज्यांचे ते अज्ञान परमात्माज्ञानाने नाहीसे झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानन्दघन परमात्म्याला प्रकाशित करते. ॥१६॥

ज्यांचे मन व बुद्धी तद्रूप झालेली आहे आणि सच्चिदनान्दघन परमात्म्यांतच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे, असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परम गतीला प्राप्त होतात. ॥१७॥

ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पाहातात. ॥१८॥

ज्यांचे मन समभावात स्थिर झाले, त्यांनी या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला. कारण सच्चिदानंदघन परमात्मा निर्दोष आणि सम आहे. म्हणुन ते सच्चिदानन्दघन परमात्म्यातच स्थिर असतात. ॥१९॥

जो पुरुष प्रिय वस्तु मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तु प्राप्त झाली असता उद्विग्र होत नाही, तो स्थिर बुद्धी असलेली संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानन्दघन परब्रह्मा परमात्म्यात ऐक्यभावाने नित्य स्थित असतो. ॥२०॥

ज्याच्या अन्तःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते, असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणार्‍या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तो सच्चिदानन्दघन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्याभावाने स्थिति असलेला पुरुष अक्षय आनन्दाचा अनुभव घेतो. ॥२१॥

जे हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उप्तन्न होणारे सर्व भोग आहेत, ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटत असले, तरी तेही दःखालाच कारण होणारे आणि अनित्य आहेत. म्हणुन हे अर्जुना ! बुद्धिमान विवेकी पुरुष त्यांत रमत नाहीत. ॥२२॥

जो साधक या मनुष्यशरीरात शरीर पडण्याआधीच काम-क्रोधामुळे उप्तन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी होय व तोच सुखी होय. ॥२३॥

जो पुरुष अन्तरात्म्यातच सुखी, आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो, तो सच्चिदानन्दघन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्यभावाला प्राप्त झालेली सांख्ययोगी शान्त ब्रह्माला प्राप्त होतो. ॥२४॥

ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहे, ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहेत, जे प्राणिमात्राच्या कल्याणात तप्तर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणें परमात्म्यात स्थिर असते, ते ब्रह्मवेत्ते

शान्त ब्रह्माला प्राप्त होतात. ॥२५॥

काम- क्रोध मावळलेले, मन जिंकलीले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करुन घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात, त्यांना सर्व बाजूंनी शान्त परब्रह्म परमात्माच परिपूर्ण असतो. ॥२६॥

बाहेरच्या विषयभोगाचें चिन्तन न करता ते बाहेरच ठेवून, दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातुन वाहणारे प्राण व अपान सम करून ॥२७॥

ज्याने इंद्रिये मन व बुद्धी जिंकली आहेत, असा मोक्षतत्पर मुनी इच्छा, भय आणी क्रोध यांनी रहित झाला की, तो सदोदित मुक्तच असतो. ॥२८॥

माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोक्ता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर, प्राणीमात्रांचा सुहृद अर्थात स्वार्थरहित दयाळु आणि प्रेम, असे तत्त्वतः समजून शान्तीला प्राप्त होतो.॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP