हरि चला मंदिरा ऎशा म्हणती गोपिका म्हणती राधिका ।
भावें ओवाळिती यदुकुलतिलका ॥ धृ. ॥
एकीकडे राई, एकीकडे रखुमाई, भावें ओंवाळिता हरिसी तूं होसी दो ठायीं ॥ हरि. ॥ १ ॥
अष्टाधिक सोळा सहस्त्र ज्याच्या सुंदरा, ज्याच्या सुंदरा ।
जिणें जिणें प्रार्थिलें जासी तियेच्या घरा ॥ हरि. ॥ २ ॥
एका जनार्दनी हरि तूं लाघवी होसी ।
इतक्याही भोगुनी ब्रह्मचारी म्हणवीसी ॥ हरि. ॥ ३ ॥