मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|श्रीकृष्ण आरती संग्रह|
अवतार गोकुळी हो । जन तारा...

श्रीकृष्ण आरती - अवतार गोकुळी हो । जन तारा...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


अवतार गोकुळी हो । जन तारावयासी ॥

लावण्यरुपडे हो ॥ तेज:पुंजाळ राशी ॥

उगवले कोटिबिंब ॥ रवि लोपला शशी ॥

उत्साह सुरवरां ॥ महाथोर मानसी ॥ १ ॥

जय देवा कृष्णनाथा । राईरखुमाई कांता ।

आरती ओवाळीन । तुम्हां देवकीसुता ॥ धृ. ॥

कौतुक पहावया ॥ भाव ब्रह्मयाने केली ।

वत्सेंही चोरुनियां सत्यलोकासी नेलीं गोपाल गाईवत्सें ।

दोन्ही ठायी रक्षिलि । सुखाचा प्रेमसिंधु । अनाथांची माउली ॥ २ ॥

चारितां गोधनें हो । इंद्र कोपला भारी मेघ कडाडीला ॥

शिला वर्षल्या धारी । रक्षिले गोकुळ हो ।

नखिं धरिला गिरी । निर्भय लोकपाळ अवतरला हरि ॥ ३ ॥

वसुदेव देवकीचे । बंद फोडीली शाळा ।

होउनिया विश्वजनिता । तया पोटिंचा बाल ।

दैत्य हे त्रासियेले । समुळ कंसासी काळ ।

राज्य हें उग्रेसेना । केला मथुरापाळ ॥ ४ ॥

तारिले भक्तजन । दैत्य सर्व निर्दाळुन ।

पांडवा साहाकारी । अडलिया निर्वाणी ।

गुण मी काय वर्णु । मति केवढी वानूं ।

विनवितो दास तुका । ठाव मागे चरणी ॥ ५ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP