मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|महती संतांची| संत तुकाविप्र महती संतांची धर्मदास बाबा जीवन चरित्र भगवत् भक्त संत कुर्मदास विरनाथ महाराज पुंडलिक नावाडी परमपूज्य महादेवी आईसाहेब सद्गुरु देवनाथ महाराज संत मुकुंद महाराज सद्गुरु श्री. मल्लनाथ महाराज औसेकर संत प्रेमाबाई संत विठाबाई जीवनचरित्र संत नागरी संत लाडाई संत लिंबाई संत आऊबाई संत राजाई संत गोणाई प्रल्हाद महाराज बडवे दासो दिगंबर देशपांडे सद्गुरु ब्रम्हलिन माणिकगिरी महाराज श्री संत नारायण महाराज श्रीगोंदेकर प्रल्हाद महाराज रामदासी गोविंद प्रभू संत श्री जलाराम बापा संत आडकोजी महाराज श्री भोजलिंग काका सुतार संत जळोजी मळोजी चरित्र संत निळोबाराय महाराज संत भानुदास संत महिपती संत अमृतराय संत केशवदास संत माणकोजी बोधले संत नरसी मेहता शाह अब्दुल लतीफ संत निर्मळा संत बंका संत कान्हो पाठक जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज संत चांगदेव जनार्दन स्वामी संत कान्होबा संत शेख महंमद संत सोपानदेव संत बहिणाबाई संत तुकाविप्र संत सोयराबाई संत कान्होपात्रा संत निवृत्तीनाथ संत महात्मा बसवेश्वर संत कबीर दास संत गाडगेबाबा संत सावता माळी संत वेणाबाई संत सेवालाल महाराज संत महदंबा संत जनाबाई माहिती संत मीराबाई संत गुलाबराव महाराज संत विसोबा खेचर संत दामाजी पंत संत नरहरी सोनार संत रोहिदास संत जगनाडे महाराज संत चोखामेळा संत गोरा कुंभार संत मुक्ताबाई संत जगमित्र नागा संत परिसा भागवत जोगा परमानंद राका कुंभार संत भगवानबाबा संत वामनभाऊ संत सखू काशिबा महाराज समर्थ रामदास स्वामी संत तुकडोजी महाराज संत नामदेव संत एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाविप्र महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा समृद्ध करण्यात मराठी संत, कवी आणि लेखकांचे मोठे योगदान आहे. Tags : bookmarathi booksantपुस्तकमराठी पुस्तकसंत संत तुकाविप्र Translation - भाषांतर पेशवेकालीन संत तुकाविप्र महाराज हे संत एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील एक महान सत्पुरुष होतेसंत तुकाविप्र – जीवनतुकाविप्र महाराज यांचा काळ हा शके १६५० ते शके १७१४ म्हणजेच इसवी सन १७२८ ते इसवी सन १७९२ हा होता . हा काळ उत्तर पेशवाई म्हणून ओळखला जातो. तुकाविप्र महाराज हे आपला जन्म कीर्तनाद्वारे जनजागृती करण्यासाठी असे मानत असत हे त्यांच्या अनेक अभंगातून लक्षात येते. तसेच भक्तिमार्ग हा आत्मसाक्षात्काराचा सर्वोत्तम मार्ग आहे हे ही त्यांच्या अभंगातून जाणवते. तुकाविप्र महाराज हे वारकरी पंथाचे होते . पंढरपूरची वारी करीत भागवत धर्माचा प्रसार त्यांनी केला. तुकाविप्र महाराज हे जन्माने ब्राम्हण होते त्यामुळे त्या समाजात असलेल्या काही ठराविक परंपरांचेच पालन करत असत. संत हे नेहमीच परंपरेचा धागा न सोडता आणि त्यात न अडकता वाटचाल करत असतात. म्हणूनच जास्त कर्मकांड करणे हे तुकाविप्र महाराज यांच्या दिनक्रमांचा भाग नव्हता. स्वत:च्या वडिलांच्या श्राद्धाला ब्राम्हणांना जेवण देण्याऐवजी गरजू ब्राम्हणेतर लोकांना अन्नदान करणाऱ्या संत एकनाथ महाराज यांची थोर मातृवंश आणि गुरु परंपरा लाभलेल्या तुकाविप्र महाराज यांनी देखील कधीही कर्मकांडांचा प्रचार वा प्रसारही केला नाही. वेदांचा अभ्यास करून त्यातील मर्म हेवेद बोलती सकळा | भाव धरा येक भोळा या सोप्या शब्दात मांडले.संत नामदेव व संत तुकाराम यांनी जगाची उपेक्षा न करता त्याच जगात वावरत जन सामान्यासाठी आपले अवघे आयुष्य वेचले. अश्या महान संतांचे कार्य पुढे चालवणे या साठी आपला जन्म आहे असे आपल्या अभंगातून तुकाविप्र महाराज यांनी व्यक्त केले आहे. तुकाविप्र महाराज यांनी योग विद्येचे संपूर्ण ज्ञान असतानाही त्या मार्गाने जाण्याऐवजी त्यांनी कीर्तनाचा मार्ग स्वीकारला. कारण जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे त्यांच्याठायी पक्के होते.तुकाविप्र महाराज यांचे साहित्य अद्यापही म्हणावे तेवढे समाजात पोहोचले नाही. संत साहित्याच्या अभ्यासकांनी, समाज-प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकार प्रवचनकार यांनी या संत साहित्याला समाजाभिमुख करण्यासाठी आपापल्या परीने कार्य करायला हवे असे वाटते .संत तुकाविप्र – जन्मतुकाविप्र महाराज यांचा जन्म श्रावण वद्य अष्टमी शके १६५० ला झाला त्यांच्या जन्माचा दाखला देणारा त्यांचा अभंगश्रावण कृष्ण आष्टमी | पूर्व नेमी जन्म हासोळा शत नी पन्नास | शक खास जन्माचासौम्य नाम संवत्सर | कृपावर पूर्व जीतुकाविप्र जाला जन्म | नाम वरं कीर्तनासंत तुकाविप्र – गुरु परंपरातुकाविप्र महाराज यांची गुरुपरंपरा आदिनारायणा पासून खालील प्रमाणे सांगितली जाते.दत्तात्रय – जनार्दन स्वामी – संत एकनाथ – अनंत – विठ्ठल – विप्रनाथ – संत तुकाविप्रसंत तुकाविप्र – पितृवंशतुकाविप्र महाराज यांचे पूर्वज म्हणजे विपट आडनाव असलेले कुटुंब हे रहीमतपुर येथील राम मंदिराची व्यवस्था व पूजा करत असत. तुकाविप्र महाराज यांच्या पणजोबा म्हणजे प्रल्हादपंता हे राजकिय व सामाजिक अस्थिरतेमूळे रहीमतपूर सोडून पंढरपूरला आले. तेथे ते विठ्ठलाच्या मंदिरात गंध उगळण्याचे काम करत असत. त्यांच्या मुलांचे नाव गंगाधर पंत होते . गंगाधर पंत यांच्या मुलांचे नाव भगवंतराव विपट होते . भगवंतराव विपट हे छत्रपती शाहू महाराजांचे एकनिष्ठ सरदार होते त्यांचा विवाह विप्रनाथ यांची कन्या चिन्मयी (चिमाई) यांचाशी झालाप्रल्हादपंत – गंगाधर – भगवंत (तुकाविप्र महाराज यांचे वडील ) – तुकाविप्रअसा तुकाविप्र महाराज यांचा पितृवंश आहे.संत तुकाविप्र – मातृवंशसंत एकनाथ हे भानुदास महाराजांचे वंशज म्हणजे पणतु होते . भानुदास महाराजांचे चुलत बंधू केशवस्वामी हे देखील त्या काळचे विद्वान होते. केशवस्वामींचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील शेंदरे – वेचले येथे होते असे श्री मोरेश्वर जोशी येळंबकर यांनी आपल्या मराठवड्यातील संतांची जीवनगंगा या आपल्या पुस्तकात म्हटले आहे.केशवस्वामी – श्रीपति – माधव – यादव – गोविंद – गोपाल – अनंत – विठ्ठल – माणिक(विप्रनाथ) – चिन्माई (तुकाविप्र महाराज यांची आई) – तुकाविप्रसंत तुकाविप्र – उपनयनतुकाविप्र महाराज यांची मौंज ही वैशाख शके १६५५ ला झाली असावी. तुकाविप्र महाराज हे ५ वर्ष वयाचे होते तेंव्हा त्यांचे गुरु व आईकडील आजोबा असलेल्या नाथवंशीय विप्रनाथ स्वामी यांनी तुकाविप्र महाराज यांच्यावर उपनयन संस्कार केले असा उल्लेख आहेसंत तुकाविप्र – विद्याभ्यासतुकाविप्र महाराज यांच्या शिक्षणाचा पहिला भाग वयाच्या पाचव्या वर्षांपासून सातव्या वर्षापर्यंत, श्री विप्रनाथ स्वामी यांच्या जवळ झाले . त्यानंतरचे शिक्षण त्यांनी नीरा नरसिंगपूर येथे घेतले. तुकाविप्र महाराज यांच्या साहित्यातून त्यांचे संस्कृत भाषेचे व व्याकरणाचे ज्ञान अफाट होते हे लक्षात येते . तुकाविप्र महाराज यांनी चार वेद, १०८ प्रमुख उपनिषदे, सहा शास्त्र, अठरा पुराणे त्याच बरोबर विवेक चूडामणि, पंचदशी, विवरण यांचाही अभ्यास केला आहे यांचीही खात्री त्यांच्या साहित्याच्या अवलोकनातून पटते. तुकाविप्र महाराज यांना गायनकला देखील अवगत होती ज्याचा उपयोग ते कीर्तनाद्वारे जनजागृती करण्यासाठी करत असत.संत तुकाविप्र – लग्नतुकाविप्र महाराज यांच्या आईचे निधन शके १६६० ला झाले त्या आधी त्यांचे लग्न झाले होते व लग्नाच्या आधी नीरा नरसिंगपुरचे शिक्षण झाले. तुकाविप्र महाराज यांचे सुरुवातीचे शिक्षण शके १६५७ पर्यंत (यावेळी तुकाविप्र महाराज हे ७ वर्षे वयाचे होते) म्हणजे त्यांच्या गुरूंच्या (विप्रनाथ स्वामी यांच्या निधना पर्यंत) झाले असे मान्य करून त्या नंतर १६५८-५९ ला त्यांचे नरसिंगपुरचे शिक्षण संपले असावे व त्याच दरम्यान किंवा शके १६५९-६० ला तुकाविप्र महाराज यांचे लग्न झाले असावे असा निष्कर्ष काढता येतो . लग्नाच्या वेळेस तुकाविप्र महाराज यांचे वय ९ ते १० वर्ष असावे. तुकाविप्र महाराज यांनी लग्नानंतर अजन्म असिधारा वृताचे पालन केले . असिधारा म्हणजे पत्नीशी शरीर संबंध न ठेवता तीला देवतेसमान समजणे.संत तुकाविप्र – वास्तव्यशके१६५० ते शके १६५७ – अंजनवती, जिल्हा बीडशके १६५८ ते शके १६६० – नीरा नरसिंगपूरशके१६६० ते शके १६६६ – महाराष्ट्रभर प्रवासशके १६६७ ते शके १६७८ – ब्रम्हपुरी – जिल्हा साताराशके१६७९ ते शके १६९० – बोरबन – जिल्हा साताराशके १६९२ ते शके १७०४ – कऱ्हा नदीची प्रदक्षिणाशके१७०५ ते शके १७१४ – पंढरपूर – जिल्हा सोलापूर , अंजनवती आणि विविध ठिकाणी प्रवासतुकाविप्र महाराज यांचे साहित्यभागवताच्या सर्व भागावर अभंगात्मक टीकाशतकोटीचे अभंगतत्वमसि पान 1तत्वमसि पान १तत्वमसिसुदामचरित्रभानुदास चरित्रकालियामर्दनपंढरीपर अभंगनरदेह महिमा अभंगइतर संतावरचे अभंगविठ्ठलावरील पोवाडाअनेक पदेआरत्यायातील सर्व साहित्य हे १९५६ पर्यंत पंढरपूर येथील विप्र दत्त मंदिर येथे होते असे समजते कारण 1944 साली इतिहास संशोधक श्री रा. ग हर्षे यांनी पंढरपूरातील मठांचे सर्वेक्षण केले होते यावेळी या साहित्याच्या उपलब्धतेची नोंद झाली असा उल्लेख श्री वा.ल. मंजुळ यांनी या सर्वेक्षणावर आधारित लिहिलेल्या श्री क्षेत्र पंढरपूरातील मठांचा इतिहासया पुस्तकात केला आहे. इसवी सन 1956 साली चंद्रभागेला आलेल्या महापूरात यातील बरेच साहित्य नष्ट झाले असे विप्र कुटुंबीय सांगतात. असे असूनही तुकाविप्र महाराज यांचे उपलब्ध साहित्य बरच आहे . ते पुनर्लिखित , मुद्रित हस्तलिखित स्वरूपात आहे असे समजते.या शिवाय मराठी वाङ्मय कोश खंड १ पान क्रमांक ११६ व ११७ वर खालील उल्लेख आहेरचेनेचे नाव संग्रहाचे नावआत्मसिंधु वि ल भावे संग्रहकालियामर्दन ग ना मुजुमदार संग्रहभानुदास चरित्र गो का चांदोरकर संग्रहसुदाम चरित्र वि ल भावे संग्रहअभंग पदे स्तोत्रे ई. रचनातुकाविप्र महाराज यांचे साहित्य हे भाषा, व्याकरण तसेच गद्य रचना निर्मितीच्या दृष्टीने परिपूर्ण आहे असे त्यांच्यावर शोध निबंध लिहिणाऱ्या संशोधकांचे मत आहेसंत तुकाविप्र महाराज यांचे देवस्थान व मठतुकाविप्र महाराज आणि त्यांचे शिष्य पांडुरंग तथा बापूसाहेब विप्र यांनी ज्या मठांची स्थापना केली त्याची माहिती या प्रमाणेअंजनवती मठअंजनवती मठअंजनवती – जिल्हा बीड – महाराष्ट्र – येथे तुकाविप्र महाराज व त्यांचे गुरु विप्रनाथ स्वामी यांची समाधी आहे. येथे एकमुखी दत्त मूर्ती देखील आहेगोंदी – जिल्हा बीड – महाराष्ट्र – येथे तुकाविप्र महाराज यांनी स्थापन केलेली विठ्ठल मूर्ति आहे.बोरबन – जिल्हा सातारा – महाराष्ट्र – येथे तुकाविप्र महाराज यांनी स्थापन केलेली गणेश मूर्ती आहे याच बरोबर विठ्ठल मूर्ति आहेब्रम्हपुरी – जिल्हा सातारा – महाराष्ट्र – येथे तुकाविप्र महाराज यांनी स्थापन विठ्ठल रखुमाई यांची मूर्ति आहेपंढरपुर – जिल्हा सोलापूर – महाराष्ट्र – येथे तुकाविप्र महाराज यांचे शिष्य बापुसाहेब विप्र यांनी स्थापन केलेली एक मुखी दत्त मूर्ती आहे. याच बरोबर येथे बापूसाहेब विप्र यांची समाधी आहेतुकाविप्र महाराज यांचे कार्य , त्यांचे समाजकारणातील स्थानमराठी वाङ्मय कोश खंड १ पान क्रमांक ११६ व ११७ यावर खालील उल्लेख आहे – रोज कीर्तन करीत जनजागृती करण्याचा तुकाविप्र महाराज यांचा संकल्प असे. ह्याकरिता अखिल महाराष्ट्रभर त्यांचा संचार होई व भगवतभक्तीचा प्रचार चाले. तुकाविप्र महाराज यांना सातारकर छत्रपती , श्रीमंत नानासाहेब व भाऊसाहेब पेशवे फार मानीत असत . मोठे मोठे सरदार – जहागीरदार तुकाविप्र महाराज यांच्या शिष्यमंडळात होते. देशावर आणि कोकणात तुकाविप्र महाराज यांना अनेक इनामे मिळाली होती. तरीही तुकाविप्र महाराज हे विरक्तवृत्तीने राहात . त्यांच्याजवळ शीघ्रकवित्व होते.तुकाविप्र महाराज हे मोरोपंत रामजोशी, शिवदिन केसरीनाथ, महीपतीबुवा ताहराबादकर यांचे समकालीन होते.इसवी-सनाचे १८ वे शतक् हा उत्तर पेशवाईचा काळ ज्यात कर्मकांड करणाऱ्या लोकांचे महत्व वाढले होते. खऱ्या वेदज्ञानापेक्षा पाठांतर करून विद्या ग्रहण केलेल्या तथाकथित विद्याविभूषितांनी अशिक्षित व अल्प शिक्षित् अश्या सर्व जातीच्या लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला. ज्यांनी पेशवाईच्या उत्तरार्धाचा इतिहास वाचला आहे त्यांना हे चांगलेच माहीत आहे. या सर्व बाबींचे वर्णन डॉ. अनिल सिंगारे यांनी आपल्या इतिहास संशोधन पत्रिकेच्या सातव्या खंडात प्रकाशित झालेल्या “पेशवेकालीन ब्राम्हणाची दक्षिणा – नव्हे खंडणी” या लेखात केले आहे. या उन्मत्त लोकांना हे चुकीचे आहे असे सांगणारे त्यांच्याहून श्रेष्ठ असे कोणी नव्हते. त्यांच्या विद्वत्तेमूळे व शाप कोप या भीतीने त्यांच्या विरोधात जाण्यास कोणी धजत नव्हते.संत तुकाविप्र अभंगांचे अवलोकन केले असतं हे लक्षात येते की अशा परिस्थितीत तुकाविप्र महाराज यांनी स्वत: जातीने ब्राम्हण असूनही केवळ ज्ञानाची पूर्ण जाणीव असल्याने या सर्व बाबींना आपल्या कीर्तनांद्वारे वाचा फोडली. एवढेच नाही तर या कर्मकांडांशीवाय मोक्ष देणारा मार्ग म्हणजे भक्ति मार्ग हे पूर्वापार चालत आलेले सत्य परत एकदा लोकांच्या मनात कीर्तन या सर्व सामान्य लोकांना भावणाऱ्या आणि पटणाऱ्या माध्यमातून रुजवले.तुकाविप्र महाराज यांच्या जनजागृतीच्या कार्याचा ओझरता उल्लेख सातारा गॅझेट मधील संस्कृति व साहित्य विभागात आढळतोसंत तुकाविप्र महाराज यांचे चरित्र, अभंग आणि त्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तकेस्वातंत्रपुर्व काळात तुकाविप्र महाराज यांच्यावर झालेले लिखाणअनु क्रमांक वर्ष अंक क्रमांक साहित्याचे नाव प्रकार / संख्या संकलक पान नंबर१ ४६ १-४ ज्ञानेश्वर चरित्र ओव्या -२५० रा ग हर्षे २५-३६२ २३ ४ द्रौपदीचा धावा अभंग -१५ रा . तु जगदाळे ६५-६७३ २३ ४ भक्तिपर अभंग अभंग -११४ १२ ४ भक्तिपर अभंग अभंग -२० १६३-१६५या शिवाय तुकाविप्र महाराज यांच्या साहित्यावर अभ्यास करून जे विविध लेख प्रकाशित झाले ते असेलेखक/ अभ्यासक प्रकाशन विषय वर्ष अंक पान क्रमांककृ. वि आचार्य भारत इतिहास संशोधन मंडल त्रैमासिक तुकाविप्र महाराज कृत अभंग १२ ४ १६०-१६५पा न पटवर्धन भारत इतिहास संशोधन मंडल इति. तुकाविप्र महाराज यांचा प्रयाण काळ कोणता? शके १८३४ १ ७९-८०भा रा भालेराव मुमूक्षु (नवे) तुकाविप्र महाराज व त्यांचा वंश १९२२ मार्च १७रा. ग. हर्षे ज्ञानदेवी – (चिकित्सक व भाषाशास्त्रीय आवृत्ती) प्रास्तविक विवेचन – श्री भगवत गीता व्याख्यान १९४७ पुणे २९स्वातंत्र्यानंतरच्या काळात तुकाविप्र महाराज यांच्यावर झालेले लिखाणमराठवाड्यातील संतांची जीवन गंगा – सुहास प्रकाश पुणेविद्वत परिमल – मोरेश्वर जोशी येळंबकरसंत तुकाविप्र महाराज यांचा परिचय – संतकृपा प्रकाशनतुकाविप्र महाराज यांचा समाधी योग – विप्र कुटुंबीयांनी प्रकाशित केलेशेवट शतकोटीचा – विप्र कुटुंबीयांनी प्रकाशित केलेतुकाविप्रांचा आनंदयोग – नचिकेत प्रकाशनसंत तुकाविप्र विजय – नचिकेत प्रकाशनतुकाविप्र कृष्णेकाठी – नचिकेत प्रकाशनकामधेनू – नचिकेत प्रकाशनतुकाविप्र महाराज यांचा हरिपाठ – नचिकेत प्रकाशननाम गाती तया – नचिकेत प्रकाशनतुकाविप्र महाराज रचित ज्ञानेश्वर चरित्र – विप्र कुटुंबीयांनी प्रकाशित केलेसंत तुकाविप्र महाराज – संत सद्गुरू जीवन दर्शन – विप्र कुटुंबीयांनी प्रकाशित केलेतुकाविप्र महाराज अभंगलीला – नचिकेत प्रकाशनपंढरपूर येथील विप्र दत्त – विप्र कुटुंबीयांनी प्रकाशित केले.तुकाविप्र महाराज यांच्यावर सादर झालेले शोधनिबंधतुकाविप्र महाराज व्यक्ति आणि वाड्मय – सौ संध्या भोयरेकर – निपाणीकर – बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद· संत कवि तुकाविप्र यांच्या समग्र काव्याचा अभ्यास – श्री. देविदास श्रीमंत गुरव – सोलापूर विद्यापीठ सोलापूरशिष्य परंपरातुकाविप्र महाराज यांना गुरु मानणारे लोक अनेक ठिकाणी असणार हे त्यांच्या महाराष्ट्रभर जनजागरणांसाठी केलेल्या भ्रमंतीतून जाणवते. अनेक सरदार हे त्यांचे शिष्य होते यांचा उल्लेख मराठी वाङ्मय कोशात आहे. तुकाविप्र महाराज यांनी असिधारा वृत स्वीकारले होते म्हणून त्यांना संतती नव्हती. सासवड येथील सरदार बाबुराव पुरंदरे यांना तुकाविप्र महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने संतती झाली होती त्यातील मोठा मुलगा म्हणजे पांडुरंग हा संत वय वर्षे 10 पासून तुकाविप्र महाराज यांच्या सेवेशी होता. तोच त्यांचा परमशिष्य होता. ते पुढे बापूसाहेब या नावाने ओळखले जात. तुकाविप्र महाराज यांच्या सेवेशी असल्याने पांडुरंग आपले नाव पांडुरंग पुरंदरे न लावता पांडुरंग गुरु तुकाविप्र असे लावायचे. तुकाविप्र महाराज यांचा साहित्यिक व अध्यात्मिक वारसा हे बापूसाहेब विप्र यांचे वंशज जे विप्र या आडनावाने ओळखले जातात हे जतन करत आहेत.पसायदानतुकाविप्र महाराज यांनी अनेक प्रकारच्या साहित्य रचना केल्या. तुकाविप्र महाराज यांनी संत ज्ञानेश्वर यांच्या प्रमाणे जनतेच्या कल्याणासाठी ईश्वराकडे पसायदान देखील मागितले.काय मागावे नुमजे | द्यावे तुम्हा साजेभक्तिपरायण व्हावे लोक | सर्वकाळ सर्व सुखशांती क्षमा दया पीक | ब्रीद मुख्य भूषणसत्यवाणी नाम गर्जो | ब्रीद भूषण तुम्हा साजोकाम क्रोध निंदा विझो | द्वेष बुझो अहंतामाझे मागणे किती | तुम्ही उदार चक्रवर्तीओला चातकाचा कंठ | करिता मेघा काय कष्टकरिता चकोराचा सोहळा | न्यून नोहे चंद्रकलाविप्र म्हणे नारायणा | थेंबे सिंधु नोहे उणासमाधीतुकाविप्र – समाधी योग या पुस्तकात वर्णन केल्या प्रमाणे तुकाविप्र महाराज यांनी अंजनवती – जिल्हा – बीड येथे 14 दिवस सतत कीर्तन करत आपला देह पंचतत्वात विलीन केला. तुकाविप्र महाराज यांचा योगविद्येचा अभ्यास होता हे त्यांच्या तत्वमसि या ग्रंथाचे अवलोकन करताना लक्षात येते. N/A References : N/A Last Updated : September 01, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP