मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|महती संतांची| संत गोणाई महती संतांची धर्मदास बाबा जीवन चरित्र भगवत् भक्त संत कुर्मदास विरनाथ महाराज पुंडलिक नावाडी परमपूज्य महादेवी आईसाहेब सद्गुरु देवनाथ महाराज संत मुकुंद महाराज सद्गुरु श्री. मल्लनाथ महाराज औसेकर संत प्रेमाबाई संत विठाबाई जीवनचरित्र संत नागरी संत लाडाई संत लिंबाई संत आऊबाई संत राजाई संत गोणाई प्रल्हाद महाराज बडवे दासो दिगंबर देशपांडे सद्गुरु ब्रम्हलिन माणिकगिरी महाराज श्री संत नारायण महाराज श्रीगोंदेकर प्रल्हाद महाराज रामदासी गोविंद प्रभू संत श्री जलाराम बापा संत आडकोजी महाराज श्री भोजलिंग काका सुतार संत गोणाई महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा समृद्ध करण्यात मराठी संत, कवी आणि लेखकांचे मोठे योगदान आहे. Tags : bookgonaimarathi booksantगोणाईपुस्तकमराठी पुस्तकसंत संत गोणाई Translation - भाषांतर संत नामदेव कुटुंबीय पंढरपूर येथे रहात होते. संत नामेदवांच्या आई गोणाई यांचे जन्मठिकाण, तारीख व समाधी शक मिळत नाही. त्या अतिशय पुत्रवत्सल असून नामदेवांच्या देवपित्रेपणामुळे त्रस्त झालेल्या होत्या. त्या संपूर्ण कुटुंबाला सावरणान्या होत्या. नामदेव गाथ्यामध्ये त्यांची नाममुद्रा असलेले सुमारे सव्वीस अभंग मिळतात. नामदेवांच्या बालवयातील विठ्ठलभक्तीने त्या भारावलेल्या होत्या. पण पुढे त्यांचे प्रपंचाकडे दुर्लक्ष होत असल्याने संत गोणाई नेहमी काळजीत असत. विठ्ठलभक्तीने पिसे झालेल्या नामदेवांना पाहून गोणाई माऊलीला काळजी वाटते. त्या विठ्ठलाबद्दल पुढे संताप व्यक्त करतात. विठ्ठलाला बोल लावतात. संत गोणाईची कुटुंबासाठी एक अपेक्षा होती. नामदेवाने चारचौघांसारखे वागावे, आपला प्रपंच सांभाळावा, परादाराकडे लक्ष द्यावे.‘नवमास वरी म्या वाहिलासी उदरी आस केली थोडी होसी म्हणूनी सांडी देवपिसे नको करू ऐसे बळे घर कैसे बुडविसी ॥’या अभंगातून आईच्या अस्वस्थ मनाचे मायेच्या भूमिकेतून दर्शन घडते. मुलाच्या कल्याणाची तळमळ, त्यातून येणारा संताप त्या व्यक्त करताना दिसतात. मंदिरात जाऊन विठ्ठलाशी गोणाई स्पष्ट बोलतात. “माझे घर त्या पूर्वीच बुडविले जे दर्शनासी आले बाळ माझे॥” किंवा “ऐसे काय केले नाम्या चाळविले । समूळ बुडविले आपणा माझी आम्हा दुर्बळांचा करुनिया घात केला वाताहत घराचा तो त्वा आपुल्या लावियला सोई। नव्हे मज काही ऐसा केला ॥माझा पुत्र नामाला मला परत द्या, अशी विनवणी संत गोणाई विठ्ठलाकडे करतात. माझा नामा घरादाराकडे, प्रपंचाकडे दुर्लक्ष करून चंद्रभागेच्या वाळवंटी नामाच्या गजरात रममाण होऊन संसाराचे वाळवंट करीत आहे. नामदेवाविषयीच्या जिव्हाळ्यातून चिंतेतून गोणाई माऊली विठ्ठलाविषयी (भक्तीतून) संताप व्यक्त करीत आहे. गोणाईंच्या बहुतेक रचनांमधून माता-पुत्र यांचा प्रेमवत्सल कलह पाहावयास मिळतो. केवळ आईच्या हृदयातील अनन्यसाधारण माया, जिव्हाळा, पुत्राविषयी वाटणारी चिंता, त्यांच्या प्रपंचाची काळजी अशा विविध स्वरूपाच्या उत्कट भावना संत गोणाईच्या अभंगांतून व्यक्त झालेल्या दिसतात. N/A References : N/A Last Updated : August 24, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP