मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी संत साहित्य|संत निळोबांचे अभंग|कृष्णचरित्र| १६१ ते १६७ कृष्णचरित्र ३० ते ४० ४१ ते ५० ५१ ते ६० ६१ ते ७० ७१ ते ८० ८१ ते ९० ९१ ते १०० १०१ ते ११० १११ ते १२० १२१ ते १३० १३१ ते १४० १४१ ते १५० १५१ ते १६० १६१ ते १६७ अभंग - १६१ ते १६७ निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner. Tags : abhanggaulannilobasantअभंगगौळणनिळोबासंत अभंग - १६१ ते १६७ Translation - भाषांतर १६१कृष्णबळिरामातें म्हणती । गोवळे तुम्हीं अर्भक जाती । मारिला म्हणोनी कुळवई हस्तीं । तेणेंचि स्फुंदेस्फुंदूं नका ॥१॥बहुत दिवस खादलें लोंणी । चोरिये वोसिली दुधाणी । सिंतरुनियां भोगिल्या गौळणी । त्याचीही झाडती निघेल । ॥२॥न विचारित पतंग जैसा । झडपूं धांवें दीपप्रकाशा । तैसे तुम्ही नेणंता कंसा । राया सन्निध पावलेती ॥३॥पिपालिके फुटतां पक्ष । म्हणे गगन लंघीन मी अंतरिक्ष । परी मृत्यु पातला हें प्रत्यक्ष । न लक्षेचि परी ते झाली तुम्हां ॥४॥रज क मर्दूनियां बलौता । निदसुरियां धनुर्धरा समस्तां । यश मानियेलें परि तें आतां । येचि क्षणीं जाणवेल ॥५॥पूतना बाई माभळ भट । एक ते स्त्री एक ते भट । कागबगादिदैत्य आदट । नेणती मल्लसंग्राम ॥६॥निळा म्हणे ठाकिलें त्यांसी । तेचि पाहों येथ आलेसी । ऐसे बोलोनियां अति आवेशी । भुजा थापटोनी उठिले ॥७॥१६२ऐसें बोलोनियां ते उन्मत । ठोक फोडिले सक्रोधयुक्त । आले सन्मुखचि धांवत । कृष्णबळिरामेंसी झगटावया ॥१॥त्यां देखोनियां बळिराम । आणि हासोनी बोलती मेघ:श्याम । तुम्ही करुं आलेती संग्राम । तरी निरऊनियां स्त्रियां बाळां ॥२॥आजिवरी भोगिलिया संपत्ती । त्याच्या संगे सुख विश्रांती । त्यांसी न पुसतां जाणें अंतीं । महापंथी हें उचित नव्हे ॥३॥कंसारायाचें वैभव । भोगिलें चिरकाळवरी सर्व । त्याचिये काजीं वेचितां जीव । पावाल स्वयमेव उत्तम गती ॥४॥परी एक सांगतों विचार । संग्रामीं न सांडावा धीर । जें जें वसउनियां शरीर । असेल विदया ते ते दावा ॥५॥बहुत वल्गना आतां । वस्तादातें न पुसतां । यावरी तरी निश्रचळ चित्ता । करुनियां आठवा तयातें ॥६॥निळा म्हणे बोलोनी ऐसें । युध्दीं उठावले सरिसे । मातंगा देखोनियां जैसे । सिंह पाडे भुकाळू ॥७॥१६३मेळवितांचि हातीं हात । आसुडिले ते अकस्मात । हें देखोनियां लोक समस्त । ठेले विस्मित अवलोकिती ॥१॥एक एका धरितीं करीं । दाविती चिकाटियाच्या परी । दंडिमुडपी उरीं शिरीं । मारिती धडका परस्परें ॥२॥पायीं पाय आडवे तिडवे । गाउनी दाविती शक्तिवैभवें । वज्र मिठियाचीं लाघवें दाविती सुहावे येरयेरां ॥३॥कोणिचि नाटोपती कोणा । चक्राकार भेदिती खुणा । रगा लाविती चाऊनि दर्शना । आक्रोशें माना मुरगाळिती ॥४॥शेंडया उपटूनियां सांडिती । घे घें म्हणोनियां झोंबती । येरयेरां पृष्ठीवरी ताडिती । मिठिया घालिती येरयेरां ॥५॥एक वरदी एक ईश्वर । उभया युध्दाचा परिचार । परी लाघविया हा सारंगधर । आणि बळिराम अवतारिया ॥६॥निळा म्हणे वर्मभेदका । पुढें कवणाचा आवांका । पाहोनी मृत्युकाळ नेटका । उपटूनि भूमितें त्राहाटिलें ॥७॥१६४नाकीं तोंडी वाहे रुधिर । हातापायांचा झाला चूर । मस्तक मेंदु उसळे बाहेर । मुष्टिक चाणुर निर्दाळिले ॥१॥तया देऊनि उतम गती । आनंदें बळरामश्रीकृष्ण् नाचती । तांडव विसरे उमापति ॥ कौशल्य तयांचे देखोनी ॥२॥मोहित होऊनियां नारी नर । अवलोकिती बळिराम आणि श्रीधर । परम सुंदरा सुंदर । नागरा नागर भुलवणें ॥३॥अवलोकिती कृष्णाकृती । लवोंचिं विसरलीं नेत्रपातीं । बळिराम देवाचीही मूर्ती । राजस सुकुमार त्याचिपरी ॥४॥अंगी यशाचें गौरव । रुप लावण्याची ठेव । पहातां नयनां न पुरे हांव । मना स्वयमेव तेंचि होणें ॥५॥यापरी तटस्थ् सकळां । लागले नरनारी बाळा । तेणें बहमानंद सुकाळा । झाली अधिकारी भोगिती ॥६॥निळा म्हणे यावरी रावो । पावेल मुक्तीचा गौरवो । सोलीव सुखाचा स्वानुभवो । समर्पील कृष्णा तयासी ॥७॥१६५सभें कंस सिंहासनीं । बैसल्याचि आश्चर्य देखिलें नयनीं । गेले चकपक अंगीचे निघोनी । संचारला मनीं श्रीकृष्णा ॥१॥राव भयाचिये भक्ती । कृष्णाचि देखे सकळां भूतीं । आपआपणसीही अंतीं । कृष्णरुपेंचि देखतु ॥२॥जें जें देखे चाखे ऐके । तें तें कृष्णाचिया रुपें एके । ऐसा वेधोनियां निष्ठकें । ठेला निजसुखें निजकृष्णीं ॥३॥सैन्य संपदा घरें दारें । स्त्रिया आदि करुनियां लेकुंरे । कृष्णवांचूनियां दुसरें । नाढळेचि जागृती निद्रे स्वप्रांत ॥४॥कृष्णदेव आले जवळीं । हेंही नेणे तो ते काळीं । कृष्णावलोकनीं हें नव्हाळीं । लाधली भये आणि व्देषें ॥५॥कृष्णचि त्या आसनीं शयनीं । कृष्ण भोजनी त्या प्राशनीं । कृष्णासी देखे जनीं वनीं । घेतला वेष्टुनी कृष्णरुपें ॥६॥कृष्णावांचुनी नुरेचि कांहिं । जिवी मनीं बुध्दी देहीं । कृष्णचि होऊनियां लवलाही । कृष्णामाजीं मिसळला ॥७॥कृष्णीमाजीं मिसळला ॥७ कृष्णीं कृष्ण तदाकार । होऊनियां राजा कंसासुर । पावला विश्रांतीचें घर । योगी साचार न लाहती जें ॥८॥निळा म्हणे निजात्मत्योती । कंसाह्रदयीं जे बहु काळ होती । ते कृष्णें शोषूनियां निगुती । ठेविला आपुलिया निजह्रदयीं ॥९॥१६६अग्निसंस्कार देउनी त्यासी । संपादिलें उत्तर विधीसी । मग निजगजरें उग्रसेनासी । स्थापिलें राज्य सिंहासनीं ॥१॥नवाचि ध्वज नवें छत्र । व्दाहीं फिरविली सर्वत्र । साखरा वांटूनियां नगरांत । केले दानपात्र परमसुखी ॥२॥रायाचे पूर्वील जे प्रधान । सन्मानिले ते गौरऊन । प्रजेसी सिरपाव देऊन । अधिकारी जन सुखी केले ॥३॥यावरी मातापिता बंदिखानीं होतीं त्या बाहेरी काढुनी । वादयें लावूनी मंगलस्नानीं । बरव्या प्रकारीं पूजिलीं ॥४॥वस्त्रे अलंकारें गौरविलीं । निजमंदिरातें अणियेलीं । सिबिका यानीं बैसविलीं । घोषगजरें मिरवित ॥५॥तये काळींचा तो आनंद । सांगावया मी मतिमंद । जेथें परमात्मा गोविंद । संतोषवित मातांपिता ॥६॥निळा म्हणे बोबडया बोली । हरिची कीर्ति हे वाखाणिली । संती पाहिजे उपसाहिली । नेणतें लडिवाळ म्हणोनियां ॥७॥१६७मी तों नेणें व्यासवाणी । अर्थ गह्यार्थ जे जे पुराणीं । बोलीले कवी प्रासाद वाणी । तेही अर्थ मी नेणें ॥१॥आपुलिये आवडीचिये भरीं । गौरविली म्यां हे वैखरी । श्रवण करावी हे चतुरीं । ऐशी नव्हेचि मुग्ध वाणी ॥२॥परी एक आहे विश्वास थोरु । स्वामी तुकया हा सद्गुरु । न करील कदाही अव्हेरु । भाव माझा जाणोनी ॥३॥कृष्णचरित्रीं हे वाग्बाणीं । वदविली तिहिंचि वर देउनी । पुरविली माझी हे आयणी । आर्त जाणोनि अंतरीचें ॥४॥निळा म्हणे कृष्णार्पण । होतु कथिलें ते कृष्णगुण । ऐशी हे प्रार्थना करुन । ठेविला मस्तक चरणांवरी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : August 21, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP