मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी संत साहित्य|संत निळोबांचे अभंग|कृष्णचरित्र| ७१ ते ८० कृष्णचरित्र ३० ते ४० ४१ ते ५० ५१ ते ६० ६१ ते ७० ७१ ते ८० ८१ ते ९० ९१ ते १०० १०१ ते ११० १११ ते १२० १२१ ते १३० १३१ ते १४० १४१ ते १५० १५१ ते १६० १६१ ते १६७ अभंग - ७१ ते ८० निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner. Tags : abhanggaulannilobasantअभंगगौळणनिळोबासंत अभंग - ७१ ते ८० Translation - भाषांतर ७१यावरी म्हणे सवंगडियांसी । वत्सें फांकलीरे चौपासी । वळूनि आणा धांबा त्यासी । मग सावकाशी बैसा सुखें ॥१॥तंव ते म्हणती हो वनमाळी । आजीचि वळती तुमची पाळी । जाऊनियां तूंचि सांभाळीं । आम्ही निष्काम आजिचेनि ॥२॥तुंझिया शेषाची हे नवलाई । देहभाव आम्हां नुरेचि देहिं । जाणें येणें कैंचे काई । राहिलों ठायी निश्रचळपणें ॥३॥देव म्हणे हे पावले खुणे । गडी माझो झाले शहाणे । समाधी सर्वहि । काय चतुराननें कीजे यांचे ॥४॥यांचिये संगतीं वत्सें धालीं । ब्रम्हसुखातें पावलीं । वियोगवार्ता नेणती भुली । निजस्थिति राहिली स्वरुपींची ॥५॥ऐसें जाणोनियां श्रीपती । म्हणे मी जातों आजिचे वळती । तुम्ही निश्रचळ रहा वृत्ती । कोणी सांगाती फांकों नका ॥६॥निळा म्हणे सांगोनि ऐसें । मोहरी पावा घेतला हर्षे । वादन करितांचि पूर्व दिशे । वत्सेंहि सांडूनि चालिला ॥७॥७२दुरी फांकला हा श्रीहरी । ब्रम्हया जाणवलें अंतरी । मग धांवोनि झडकरी । वत्सें गोवळें उचलिली ॥१॥ते तों होती समाधिस्थ । ब्रम्हा नेतो हे नेणतीची मात । मग ते नेऊनियां समस्त । सस्यलोकीं बैसविलर ॥२॥यरवरी येऊनियां श्रीरंग । पाहे तंव न दिसे संग । भलें झालें म्हणतुसे मग । अवघे आपणचि हो सरला ॥३॥ब्रम्हा आडवूं पाहे मज । तरी मी सांडीन त्याची पैज । ऐसें म्हणोनियां श्रीराज । वैष्णवी माया विस्तारिली ॥४॥आपण वस्तें आपण गोवळ । मोह्या पावे घोंगडी सकळ । काठया पवे पाईतणें मेळ । झाला ते केवळ एकला एक ॥५॥लुडे खुडे मुडके कान । गोरे सांवळे राजीवनयन । बोलिले तोतिरे म्लान वदन । दैदिप्यमान तोहि झाला ॥६॥निळा म्हणे होतें तैसें । होऊनी ठेला तेवढेंचि जैसें । नव्हती पहिले कोणी ऐसें । ओळखेंचि नेणती अवलोकिंता ॥७॥७३तैशींच वत्सें जिची जेसीं । होतीं होउनी ठेला तैसीं । बांडीं खैरीं मोरी जांबुळसीं । तांबडी धवळी कपिलवणें ॥१॥बुजगीं मिसकिणें लातिरीं । ऐके खविरीं डिंबिरीं । एके अचपळें काविरीं । झाला श्रीहरी सर्व रुपें ॥२॥देखतां गांईसी फुटे पान्हा । घरींचिया लोभ उपजे मना । ऐशीं स्वरुपें होउनी नाना । खेळे वृंदावना चौपासीं ॥३॥येदनी ब्रम्हा पाहे डोळां । तंव पहिलिया ऐसाचि सोहळा । ध्वजा कुंचे घागरमाळा । तोरणें पताका उभविलीया ऐसाचि सोहळा ॥४॥शिंग काहाळा मोह्या पावे । गोवळ नाचतातीं सुहावे । वरी धरुनियां चांदिवे । भोवती खिलारें वत्सांची ॥५॥ब्रम्हा म्हणे आणिलीं केव्हा । म्यां तों लपविलीं होती एकिसवा । जाऊनियां पाहे तंव तो मेळावा । जेधिल तेथें तैसाचि ॥६॥निळा म्हणे लाविलें पिसें । ब्रम्हया येण्याजाण्याचाचिी वळसे । मग लज्जित होऊनियां मानसें । करीत स्तवनें श्रीहरीचीं ॥७॥७४तंव कृष्णाभोंवते गोवळ । भासती चतुर्मुखचि सकळ । करीत वेदघोश कल्लोळ । पदें क्रमें निरुक्तें ॥१॥ब्रम्हा म्हणे हें नवल झालें । ते तेथिल येथें हे कोठूनि आले । चतुर्मुखहि दिसती भले । न कळे महिमान श्रीहरिंचें ॥२॥मग जोडूनियां पाणीतळ ॥३॥ चरणीं ॥ ठेवूं इच्छी निढळ । त्राहें त्राहें जी मी केवळ । दास डिंगर कृष्णा तुझा ॥३॥ऐसा एक सुवत्सर । करीत होता नमस्कार । म्हणे वत्सें आणि कुमर । आणवाल तरी आणितों ॥४॥इकडे कृष्ण गोवळमेळीं । आपणासवें आपण धुमाळी । खेळत आला पर्वतातळी । आणि वत्समुखें हुंबरला ॥५॥चरतां पर्वत मस्तकीं गाई । ऐकोनी हुंकारिल्या ते ठायीं । मग उडया घालुनियां पाही । पाजविती पान्हा वत्सांसी ॥६॥निळा म्हणे जगत्रयजीवन । वत्सें झाला असे आपण । यालागीं स्नेहाचें महिमान । अधिकाधिक् गाईपोटी ॥७॥७५गोवळी होते राखणाईंत । ते ते म्हणती झाला घात । गाई बुजल्या अकस्मात । पडणपात त्या झाला ॥१॥मग ते आले पायवाटा । पाहाती गाई तंव सुभटा । वत्सें पान्हा घेती घटघटा । पूर लोटले क्षीराचिया सुकाळा । केले वत्सां आणि गोळियां ॥३॥ऐसा झाला संध्याकाळ । तंव पातले गौळणींचे मेळ । सांजवाणी दुडिया घेऊनी सकळ । करित गायनें सुस्वरें ॥४॥गौळी म्हणती पिंजल्या गाई द गोंविद म्हणे दोहा त्याही । आजि दुधाची उणेंचि नाहीं । न पुरती पात्रें तैसिचि क्षीरें ॥५॥गोवळ आपुलालिये घरी । रात्रीं वसती सुखशेजारीं । दिवसा जाती वनांतरी । वत्सापाठी हरिसंगें ॥६॥निळा म्हणे चतुरानन । आला गोवत्सें घेऊन । म्हणे नेण्ता महिमान । चुकी झाली क्षमा कीजे ॥७॥७६तंव ते आधिले मागिले गोपाळ । सारिखेंचि धैर्य वीर्य प्रताप बळ । हें देखोनियां विस्मित सकळ । म्हणती व्दिविध कैसेनि हे झालें ॥१॥तैसेचि वत्सें दोनी दोनी । एकएक गाईलागुनी । सुखें पिऊं देती स्तनीं । आणि दुभती वोरसोनी यथेष्ट ॥२॥तंव ते असमाई गोठी । होतीं अघासुराचे पोटीं । तेचि सांगती वडिला वोटीं म्हणती नवल वितलें ॥३॥आणि आम्हां अवघिया वनीं । घातलें होतें सर्पे वदनीं । मागें होता सारंगपाणी । तेणें तो चिरुनी टाकिला ॥४॥मग वत्सें आणि गोवळ । आम्ही बाहेरी पडिलों सकळ । त्याचे पहाहो करवाळ । रक्तें पूर वाहती ॥५॥नवल तें ऐकोनि कानीं । लोक चालिले पहावया नयनीं । तंव ते पडिले वाळोनी । गंगाओघा सारिखें ॥६॥ये गोष्टीसी झालें वर्ष । गोवळांवाटे एकचि निमिष । निळा म्हणे सेविलें शेष । तेणें सर्वदा समाधी ॥७॥७७ऐशी अगाध चरित्रें याची । वर्णिता मागला शेष विरंची । लोक म्हणती हा सर्प बिलोंची । कैसेनि पां वांचला ॥१॥मग त्या सांगे नारायण । यासी गेलें वर्ष होऊन । गोवळ वत्सें बहमसदन । पावोनि होते बैसले ॥२॥कालिचिं ते आले येथे । म्हणोनि सांगती नूतन वातें बहमसदन । व्दिगुणपणे हे कैसोनि तुमतें । प्राप्त झाले कां नेणां ॥३॥ऐसें सांगता श्रीहरी । अवघ्यां जाण्वलें अंतरी । परम लाघविया मुरारी । खेळ खेळे विचित्र ॥४॥अधासुरा वाधिल्यावरी । पुढें धेनुंका बोहरी । कैसी केली याची परी । तंहि सुजाण परिसंतु ॥५॥एकैक याचें कथानक । श्रवण भवबंधा मोचक । म्हणोनियां सात्विक लोक । हेंचि ऐकती अनुदिनी ॥६॥निळा म्हणें हे बाळक्रीडा परी परमार्थ साधनाचा हुंडा । श्रवण मनन होतांचि फुडा । ब्रम्हसाक्षात्कार पाविजे ॥७॥७८वत्सें वत्सप वनांतरी । माजी परमात्मा श्रीहरी । खेळतां खेळ नानापरी । पुढें धेनुक देखिला ॥१॥सांगतां अंगीची बारव । मृणालिके ऐसी लव । शृंगे सुवर्णाची ठेव । रत्नापरी नयन दोन्ही ॥२॥कर्णं जैसीं केतकी दळें । अती राजस पादतळें । खुर शोभति रातोत्पळें । जेवी जडूनि ठेविलीं ॥३॥चारी चरण कर्दळीस्ताभ । हदयावकाशीं सूक्ष्म नभ । पाठीवरी त्रिवेणी भांव । पुच्छा स्वयंभ शेषफणी ॥४॥कांबळी लोंबे कंठातळीं । विधुत्प्राय टिळकू भाळीं । वोसंड लवथवित् मांस मोळीं । देखतां नव्हाळी डोळियां ॥५॥गोंवळ म्हणती कृष्णा पोहें छ नवल वृष्थ आला आहे । चुकारिचाचि नवल नाहे । न्यावा धरुनि मंदिरा ॥६॥निळा म्हणे ऐकोनि हरी । दृष्टी घालोनियां सामोरी । म्हणे धेनुक हा निर्धारी आलासे मुक्ति मागावया ॥७॥७९ऐसें विचारुनियां मनीं म्हणे सौगडियां सारंगपाणी । बैल चांगला दिसतो नयनीं । परी धारुं कैसा देईल ॥१॥तुम्ही व्हारे पैलीकडे । दुरी परते वेंघोनि हुडे । चौताळातां हा चहूंकडे । करील रगडा सकळांचा ॥२॥ते म्हणती बरें कृश्णा । परी तूं सांभाळीं हो आपणा । ऐसें म्हणोनियां पळती राणा । गिरींशिखरीं बैसले ॥३॥मग कास घालूनि गोपीनाथ । चालिला पुढें चुचकारित । तंव तो म्हणे आजी कार्यार्थ । बरा साधला एकांती ॥४॥जवळी यावयाची वाट पाहे । उगाचि स्तब्ध उभा राहे । हें जाणोनियां यादवराव । अंग राखोनि चमकतु ॥५॥ऐसा आटोपिला हरी । तंव ते मायावी आसुरी । धंविान्न्ला तयावरी । शिंगे पसरुनि विस्तीर्णें ॥६॥निळा म्हणे फुंपात उठी । चौताळ लागे पाठीं । तंव हा परमात्मा जगजेठी । गांठी पडों नेदीचि ॥७॥८०शृंगें पसरिले जैसे शूळ । नेत्रींहूनि निघती ज्वाळ । श्वास रंध्रीं धूमकल्लोळ । डरकिया अंतराळ दुमदुमितो ॥१॥मागें सरे पुढे धांवे । आडवाचि उडे उंच उंचावे । ऐशीं दावूनियां लाघवें । हरिसन्निध पातला ॥२॥देव हाणे मुष्टी घातें । तेणें आर्डाय दुखवोनि तेथें । सवेंचि सरसावोनियां वरिते । उपसों धांवे गोंविंदा ॥३॥दोघां मांडलें महार्णव । दाविती बळ प्रोढीगौरव । मग धेनुकें करुनियां । कृष्णातळीं संचारला ॥४॥येरें रगडूनि तेथेंचि धरिला । दोन्ही शिंगी हात घातला । मग ते उपटुनी त्राहाटिला । निघात घातें खडकावरी ॥५॥ऐसा करुनियां शतचूर्ण । रक्त मांस त्वचा भिन्न्ा । अस्थि तिळप्राय होऊन । गेल्या उडोनि दाहिदिशा ॥६॥निळा म्हणे ऐशियापरी । धेनुका मुक्तीची शिदोरी । देऊनि पाठविला श्रीहरि । आपुलिया निजधामा सुखवस्ती ॥७॥ N/A References : N/A Last Updated : August 21, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP