साधकाने पूर्व दिशेला तोंड करून, कुशासनावर बसून, आचमन आणि प्राणायाम केल्यानंतर उजव्या हातांत पाणी, अक्षता, पुष्प आणि द्रव्य घेऊन, संकल्प करावा-
ॐ विष्णुर्विष्णु ...............................मन्त्र प्रतिलोम दुर्गासप्तशती पाठमहं करिष्ये' पर्यंत संकल्प-वाक्य म्हणून जमिनीवर पाणी सोडावे यानंतर गौरी-गणेश, नवग्रह, कलश, मातृकादि वेदि ह्यांचे पूजन करून श्रीदेवीचे पूजन करावे आता दुर्गाकवच, अर्गला, कीलक पाठ करून न्यासपूर्वक नवार्णमन्त्राचा जप करावा, नंतर रात्रिसूक्तचा पाठ करावा. आता सप्तशतीचा न्यास व ध्यान करून मन्त्र प्रतिलोम दुर्गासप्तशतीचा पाठ प्रारंभ करावा.
=======================
मन्त्र प्रतिलोम दुर्गासप्तशती
विनियोगः
ॐ अस्य श्रीविलोम-अनुलोम सहित-सप्तशत्या उत्तम-प्रथम-मध्यम- चरितानां रुद्र-ब्रह्म-विष्णु-ऋषयः, महासरस्वती-महाकाली-महालक्ष्मी देवता! अनुष्टुपगायत्री-त्रिष्टुप-छन्दांसि, भीमा-नन्दा-शाकम्भरीशक्तय:, भ्रामरी-रक्तदन्तिका-दुर्गाबीजानि, सुर्याऽग्नि-वायुस्तत्त्वानि, साम-ऋग्-यजुर्वेदाध्यानानि, ॐ अद्याऽमुक गोत्र:, अमुकशर्माऽहं मम ( यजमानस्य च ) सकलकामनासिद्धयर्थ श्रीमहासरस्वती-महाकाली-महालक्ष्मीदेवता-प्रीत्यर्थे विलोम-अनुलोम सहित-सप्तशतीपाठे विनियोगः ।
उजव्या हातांत पाणी घेऊन उपरोक्त विनियोग-वाक्य वाचून जमिनीवर पाणी सोडावे, पुन: मन्त्र म्हणून भगवती दुर्गाचे ध्यान करून पाठ करावा-