मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत एकनाथांचे अभंग| उपदेश कलिप्रभाव संत एकनाथांचे अभंग मंगलाचरण गर्गाचार्याचे जातक श्रीकृष्ण भगवानाचें चौर्यकर्म विचार वेणी-दाढीची ग्रंथी गौळणीस श्रीकृष्णाचा वेध गौळणींची विरहावस्था वनक्रीडा काला श्रीकृष्णमाहात्म्य पंढरी महात्म्य श्रीविठ्ठलमहात्म्य श्रीविठ्ठलनाममहिमा श्रीरामनाममहिमा शिवमाहात्म्य हरिहर ऐक्य श्रीदत्तनाममहिमा श्रीदत्तमानसपूजा श्रीहरिनाममहिमा हरिपाठ चिंतनमहिमा नाममहिमा नामपाठ गीताज्ञानेश्वरीपाठ संत महिमा श्रीविठ्ठलभावभक्तिफल नवविधा भक्ति उपदेश कलिप्रभाव वेषधार्याच्या भावना विद्यावंत वेदपाठ उपदेश कलिप्रभाव संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे. Tags : bhajanekanathasantएकनाथभजनसंत उपदेश कलिप्रभाव Translation - भाषांतर १येऊनि नरदेही वायां जाय । नेणें संतसंग कांही उपाय ॥१॥कली वाढलासे अधमब्राह्मण सांडिती आपुलें कर्म ॥२॥शुद्ध याति असोनि चित्त । सदा नीचाश्रय करीत ॥३॥देवपूजा नेणे कर्म । न घडे मानसंध्या धर्म ॥४॥ऐसा कलीचा महिमा । कोणी न करी कर्माकर्म ॥५॥एका जनार्दनी शरण । घडो संतसेवा जाण ॥६॥भावार्थ२मंत्रतंत्रांची कथा कोण । गाइत्री मंत्र विकिती ब्राह्मण ॥१॥ऐसा कलीमाजी अधर्म ।करिताती नानाकर्मे ॥२॥वेदशास्त्री नाहीं चाड । वायां करिती बडबड ॥३॥एका जनार्दनीं धर्म । अवघा कलीमाजी अधर्म ॥४॥३कलीमाजी नोहे अनुष्ठान । कलीमाजी नोहे हवन ।कलीमाजी नोहे पठण । नोहे साधन मंत्राचे ॥१॥नोहे योगयागविधी । नसती अंगी ये उपाधी ।वाढतसे भेदबुद्धी । नोहे सिद्धी कोणती ॥२॥न चले कर्माचे आचरण । विधिनिषेदाचें महिमान ।लोपली तीथे जाण । देवप्रतिमा पाषाण ॥३॥नठाके कोणाचा कोठे भाव अवघा लटिका वेवसाव ।एका जनार्दनीं भेव । जेथें तेथें वसतसे ॥४॥४कोणासी न कळे अवघे जहाले मूढ । म्हणती हे गूढ वायां शास्त्र ॥१॥आपुलाला धर्म नाचरती जनीं । अपीक धरणी पीक न होय ॥२॥अनावृष्टि मेघ न पडे निर्धार । ऐसा अनाचार कलीमाजी ॥३॥एका जनार्दनीं नीचाचा स्वभाव । न कळे तया भाव कोण कैसा ॥४॥५पंडित शास्त्री होती नीच याती । त्यांचे ऐकताती नीति ते धर्म ॥१॥शा स्वमुखें ब्राह्मण न करती अध्ययन । होती भ्रष्ट जाण मद्यपी ते ॥२॥नीचाचे सेवक करती घरोघरीं । श्वानाचिये परी पोट भरती ॥३॥एका जनार्दनीं आपुला स्वधर्म । सानियां वर्म होती मूढ ॥४॥ब६या पोटाकारणें न करावें तें करिती ।वेद ते विकिती थोर याती ॥१॥नीचासी शब्दज्ञान सांगती ब्राह्मण ।ऐकती ब्रह्मज्ञान त्यांचे मखें ॥२॥श्रेष्ठवर्ण होउनी नीचकर्म करिती ।कांहीं न ते भीती पुण्यपापा ॥३॥एका जनार्दनी सांडोनि आचार ।करिती पामर नानामतें ॥४॥७कलियुगामाजी थोर जाले पाषांड ।पोटासाठी संत जाले उदंड ॥१॥नाहीं विश्वास संतदया मानसीं ।बोलती वायांविण सौरस अवघा उपहासी ॥२॥वेद पठण शास्त्रे संभाषे पुराणमत ।अवघे बोधोनि ठेविती बोलती वाचाळ मत्त ॥३॥देव भजन संतपूजन तीर्थ महिमान न कळे मूढा ।ऐसें कलियुगी जाले जाणत जाणत दगडा ॥४॥एका जनार्दनीं काया वाचा राम जपा ।सो हे साधन तेणे नाहे पुण्यपापा ॥५॥८अल्प ते आयुष्य धन कलीं ।मर्यादा हे केली संतजनीं ॥१॥जनमय प्राण न घडे साधन ।नोहे तीर्थाटन व्रत तप ॥२॥असत्याचे गृह भरले भांडार ।अवघा अनाचार शुद्धबद्ध ॥३॥एका जनार्दनी म्हणोनि येते कींव ।बुडताती सर्व महाडोहीं ॥४॥९कोण मानील हा नामाचा विश्वास ।कोण होईल उदास सर्वभावें ॥१॥कलियुगा- माजी अभाविक जन ।करती उच्छेदन भक्तिपंथा ॥२॥शा नानापरीची मते नसती दाविती ।नानामंत्र जपती अविधीनें ॥३॥एका जनार्दनीं पातकाची राशी ।नाम अहर्निशीं न जपती ॥४॥१०वंदूं अभाविक जन । ऐकावें साधन पावन ।कलियुगीं अज्ञान । अभाविक पैंहोती ॥१॥न कळे श्रुती वेदशास्त्र । पुराण न कळे पवित्र ।जान ध्यान गायत्री मंत्र । जप तप राहिलें ॥२॥शा यज्ञ यागादिक दान । कोणां न कळे महिमान ।अवघे जाहल अज्ञान । न कळे कांहीं ॥३॥लोपले मंत्र औषध । गाईस न निघे दुग्ध ।पतिव्रता ज्या शुद्ध । व्यभिचार करिती ॥४॥ऐसियाने करावें काय । तिहीं ध्यावें विट्ठल पाय ।एका जनार्दनीं ध्याय । विठ्ठल नाम आवडी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : April 03, 2025 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP