मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत एकनाथांचे अभंग| नवविधा भक्ति संत एकनाथांचे अभंग मंगलाचरण गर्गाचार्याचे जातक श्रीकृष्ण भगवानाचें चौर्यकर्म विचार वेणी-दाढीची ग्रंथी गौळणीस श्रीकृष्णाचा वेध गौळणींची विरहावस्था वनक्रीडा काला श्रीकृष्णमाहात्म्य पंढरी महात्म्य श्रीविठ्ठलमहात्म्य श्रीविठ्ठलनाममहिमा श्रीरामनाममहिमा शिवमाहात्म्य हरिहर ऐक्य श्रीदत्तनाममहिमा श्रीदत्तमानसपूजा श्रीहरिनाममहिमा हरिपाठ चिंतनमहिमा नाममहिमा नामपाठ गीताज्ञानेश्वरीपाठ संत महिमा श्रीविठ्ठलभावभक्तिफल नवविधा भक्ति उपदेश कलिप्रभाव वेषधार्याच्या भावना विद्यावंत वेदपाठ नवविधा भक्ति संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे. Tags : bhajanekanathasantएकनाथभजनसंत नवविधा भक्ति Translation - भाषांतर १५४नवविधा भक्ति नव आचरती । त्याची नामकीर्ति सांगू आतां ॥१॥एक एक नाम पठता प्रात:काळी । पापा होय होळी क्षणमात्रे ॥२॥श्रवणें परीक्षिती तरला भूपती । सात दिवसां मुक्ति जाली तया ॥३॥महाभागवत श्रवण करूनी । सर्वांगाचे कान केले तेणे ॥४॥श्री शुक आपण करूनी कीर्तन । उद्धरिला जाण परीक्षिती ॥५॥हरिनाम घोषे गर्जे तो प्रल्हाद स्वानंदे प्रबोध जाला त्यासी ॥६॥स्तंभी अवतार हरि प्रगटला । दैत्य विदारिला तयालागीं ॥७॥पादसेवनाचा महिमा स्वयें जाणे रमा । प्रिय पुरूषोत्तमा जाली तेणें ॥८॥हरी पदांबुज सुकुमार कोवळे । तेथें करकमळे अखंडित ॥९॥गाईचिया मागे श्रीकृष्ण पाउलें । उध्दवे घातले दंडवत ॥१०॥करूनी वंदन घाली लोटांगण । स्वानंदें निमग्न जाला तेणें ॥११॥दास्यत्वे मारूती अर्चे देहस्थिती ।सीताशुद्धी कीर्ति केली तेणें ॥१२॥सेव्य सेवक भाव जाणे तो मारूती । स्वामी सीतापती संतोषला ॥१३॥सख्यत्व स्वजाति सोयरा श्रीपति । सर्वभावें प्रीति अर्जुनासी ॥१४॥उपदेशिली गीता सुखी केलें पार्था । जन्ममरण वार्ता खुंटविली ॥१५॥आत्मनिवेदन करूनियां बळी । जाला वनमाळी द्वारपाळ ॥१६॥विट पाऊल भूमी घेऊनी दान । याचक आपण स्वयें जाला ॥१७॥नवविधाभक्ति नवजणे केली । पूर्ण प्राप्ती जाली तयालार्गी ॥१८॥एका जनार्दनीं आत्मनिवेदन । भक्ति दुजेंपण उरलें नाहीं ॥१९॥भावार्थया अभंगात एका जनार्दनीं नवविधा भक्तिचे श्रद्धेने आचरण करून अविनाशी पद प्राप्त करून घेणार्या नऊ भक्तांची नामकिर्ति वर्णन करून सांगत आहेत. प्रभातकाळी या भक्तांचे पुण्यस्मरण केल्याने महापातकांची होळी होते. १५५हरिकथा श्रवण परीक्षिती सुजाण ऐकतां आपण अंगें होये ।होय न होय ऐसा संशय नाही पूर्णत्व राहे ।राहिले गेले देह ज्याचा तो नेणें देहींच विदेहीं होये ।श्रवण समाधी नीच नवा आनंद ब्रह्माहस्मि न साहे राया ॥१॥नवविधा भक्ति नवविधा व्यक्ति अवघिया एकची प्राप्ती ।एका जनार्दनीं अखंडता मुक्तीची फिटे भ्रांति राया ॥धृ०॥हरीच्या कीर्तनें शुक आणि नारद छेदिती ।अभिमानाचा कंदु । गातां पैं नाचतां अखंड पैं उल्हास कीर्तनीं प्रेमाल्हादू ।हरिनाम गजर स्वानंदे हंबरे जितिला पायेचा बाधू ।श्रोता वक्ता स्वयें सुखरूप जाला वोसंडला ब्रह्मानंदु राया ॥२॥हरीचेनि स्मरणे इंद्व दुःख नाही हे भक्ति प्रल्हादा ठायीं ।कृतांत कोपलिया रोमही वक्र नोहे मनी निर्भयता निज देहीं ।अग्नि विष आप नेदी त्या संताप न तुटे शखाच घाई ।परिपूर्ण जाला देह विदेह दोन्ही नाहीं रया ॥३॥हरिचरणामृत गोड मायेसी उटी चाड लाहे जाली रमा ।चरणद्वय भजतां मुकली द्वंद्वभावा म्हणोनि पढिये पुरुषोत्तमा ।हरिपदा लागली शिळा उद्धरली अगाध चरणमहिमा ।चरणीं विनटोनी हरिपदा पावली परि चरण न सोडी रया ॥४॥शिव शिव यजिजे हे वेदांचे वचन पृथुराया बाणले पूर्ण ।पूज्यपूजक भाव सांडोनी सद्भावे करी पूजन ।देवी देव दाटला भक्त प्रेमें आटला मुख्य हे पूजेंचे विधान ।त्रिगुण निपुटीं छेदुनियां पूजेमाजी समाधान रया ॥५॥हरिचरण रज रेणू बंदूनिया पावन जाला अक्रूर ।पावनपणे प्रेमें वोसंडे तेणे वंदी श्वानसुकर ।वृक्ष वल्ली तृणा घाली लोटांगण घाली हरिस्वरूप चराचर रया ॥६॥जीव जायो जिणें परि वचन नुलंघणे सेवेचा मुख्य हा हेतु ।या सेवा विनटोनि सर्वस्वं भजोनि दास्य उदय हनुमंतु ।शस्त्राचेनि बळे न तुटे न बुडे न जळे देहीं असोनि देहातीतु ।जन्ममरण होळी कासे भाले बळी भजनें मुक्त कपिनाथु रया ॥७॥सख्यत्वे परपार पावला अर्जुन त्यासी न पुसत दे ब्रह्मज्ञान ।स्वर्गाची खणखण बाणाची सणसण उपदेशा तेंचि स्थान ।युद्धाचिये संधी लाविली समा कल्पांती न मोडे जाण ।निज सख्य दोघां आलिंगन पडिलें भिन्नपणे अभिन्न रया ॥८॥बळी दानदीक्षा कैसी जीवें देउनी सर्वस्वेंसी निजबळे बांधी देवासी ।अनंत अपरंपार त्रिविक्रम सभा आकळिला हषीकेशी ।हृदयींचा हृदयस्थ आकळितां तंव देवची होय सर्वस्वेंसी ।यापरि सर्व देवासी अर्पनी घरीदारी नांदें देवेशी रया ॥९॥भक्ति हैं अखंड अधिकाराचे तोंड खंडोनि के नवखंड ।एकएका खंडें एक एक तरला बोलणें हें वितंड ।अखंडता जंव साधिली नाही तंव मुर म्हणणे हे पाषांड ।बद्धता मुक्तता दोन्ही नाही ब्रह्मत्व नुरे ब्रह्मांड रया ॥१०॥सहज स्वरूपस्थित तया नांव भक्ति नवविधा भक्ति भासती ।ऐसी भक्तिप्रति अंगें रावे मुक्ति दास्य करी अहोराती ।दासीसी अनुसरणे हे तंव लाजिरवाणे मूर्ख ते मुक्ति मागती ।एकाजनार्दनीं एकविधा भक्ति ।चारी मुक्ति मुक्ति होती रया ॥११॥सार१५६वेदामाजी ओंकार सार ।शाकासार वेदान्त ॥१॥शास्त्र मंत्रामाजी गायत्री सार ।तीर्थ सारामाजी सार गुरूचरणी ॥२॥ज्ञान सार ध्यान सार ।नाम सार सारामाजी ॥३॥व्रतामाजी एकादशी सार ।द्वादशी सार साधनीं ॥४॥पूजेमार्जी ब्राह्मण सार ।सत्य सार तपामाजीं ॥५॥दानामाजी अन्नदान सार ।कीर्तन सार कलियुगी ॥६॥जनामाजी संत भजन सार ।विद्या सार विनीतता ॥७॥जिल उपस्थ जय सार ।भोग सार शांतिसुख ॥८॥सुखामा। ब्रह्मसुखसार ।दुःख सार देहबुद्धी ॥९॥एका जनार्दनी एका सार ।सर्व सार आत्मज्ञान ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : April 03, 2025 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP