मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|उत्सवाची मागणी| आनुकूल्य मागणी उत्सवाची मागणी विषय उत्सवाची मागणी बलसमृद्धि व दु:संगनाशाची मागणी आमुच्या मनासम होय बालभावाची मागणी विघ्ननाशाची मागणी करुणदेवास विनंति आनुकूल्य मागणी उत्सवाची मागणी - आनुकूल्य मागणी श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन आनुकूल्य मागणी Translation - भाषांतर शुक्रवार ता. २८-११-१९३०वार्षिक जे तुझे कार्य । जवळी आले दत्तात्रेय ॥१॥करवोनी घेणे नाथा । आमुच्या हाती श्रीसमर्था ॥२॥भजन पूजनाचा रंग । करोनि त्यांत करी दंग ॥३॥भजनांत दंग रहावे । आम्हांमध्ये मिसळावे ॥४॥आमुच्या देही प्रगटावे । अंतर्बाह्य आम्हां दिसावे ॥५॥भाव तुमचा प्रगटावा । येवो आम्हां दत्त देवा ॥६॥आमुचीया उद्धारासी । पापक्षय व्हावयासी ॥७॥आम्हांलागी वांचवावे । आम्हांलागी खेळवावे ॥८॥बहुतजन मिळवावे । आनुकूल्य वितरावे ॥९॥साहित्य सर्व जमवावे । आनंदासी भरते यावे ॥१०॥देहभान गळवावे । वृत्ती-शून्यत्व करावे ॥११॥दत्तमय सर्व भासावे । तुमचे रुप आम्हां दिसावे ॥१२॥तुमच्या रुपी आम्ही लीन । देवा रहावे होऊन ॥१३॥करवा प्रेमाचे भजन । कीर्तनाचे अनुवादन ॥१४॥तारि तारि भगवंता । द्त्तमय करी समर्था ॥१५॥आम्ही दत्तरुप व्हावे । आम्ही दत्ता अनुभवावे ॥१६॥सकळ विघ्ने व्हावी दूर । आरोग्य द्यावे की निर्धार ॥१७॥चिंता आम्हां मुळि नसावी । निजकृपे निवारावी ॥१८॥समर्थ तुम्ही अमुचे धनी । कार्य करा प्रगटोनी ॥१९॥सुरवर सकळ यावे । साहाय्य आम्हांलागी द्यावे ॥२०॥ऋषिसंघ येथे लोटावे । निजभक्त येथे आणावे ॥२१॥जे जे कांही सहाय्यक । तुझे कार्यसिद्धिदायक ॥२२॥ते ते सर्व दाखवावे । ऐसे नाथजी करावे ॥२३॥विनायकाची ही आशा । पुरवावी जगदीशा ॥२४॥==शनिवार ता. ३०-११-१९३०उत्सवकार्य तुझे जवळी पातले । शिर हे ठेविले पायांवरी ॥१॥उत्सवाची सिद्धि देई भगवंता । गुरुराया ताता निजक्रुपे ॥२॥सकळ विघ्नांते करुनियां दूरी । कार्य निज करी सिद्धनाथा ॥३॥सर्व पुण्याईते येथे वसवोनी । भाग्या प्रगटवोनी येथे दत्ता ॥४॥कार्य येथे नाथा निज संपादावे । यशस्वी करावे आम्हां दासां ॥५॥प्रारब्ध आमुचे सर्व फ़िरवोनी । अनुकुल करोनी दयावंता ॥६॥सकळ साहाय्य देई आम्हांलागी । धैर्य अंतरंगी देई आम्हां ॥७॥विजयी करावे आम्हां निजदासां । आम्हां भरवंसा तुझाच की ॥८॥आम्ही तुझे असो नामाचे धारक । यशाचे गायक दत्तात्रेया ॥९॥आम्ही तुझे असो चरणसेवक । आम्हांसी कौतुक तुझेच की ॥१०॥तुझाच की आम्हां सर्वदाच छंद । आम्हांसी आनंद तुझ्यामाजी ॥११॥आमुचा बडिवार जगी वाढावया । गौरव व्हावया आमुचा की ॥१२॥सत्यत्व आणावया आमुच्या वाणीला । कार्य हे सिद्धीला नेई दत्ता ॥१३॥विनायक म्हणे करी उपकार । कार्य सोपस्कार घडवावे ॥१४॥==मंगळवार ता. २-१२-१९३०उत्सव तुझा जवळि आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥वारुनियां संकटांला । निज करवीं कार्याला ॥२॥सहाय्य द्यावे मजलागी । प्रेम द्यावे अंतरंगी ॥३॥बळ द्यावे संपत्तीचे । बळ द्यावे मनुष्यांचे ॥४॥बळ द्यावे आनुकूल्याचे । बळ द्यावे ऋद्धिसिद्धिचे ॥५॥बळ द्यावे समृद्धीचे । बळ द्यावे इच्छापूर्तीचे ॥६॥वळ द्यावे साधनांचे । बळ द्यावे गौरवाचे ॥७॥बळ द्यावे संकल्पाचे । बळ द्यावे कवित्वाचे ॥८॥बळ द्यावे निजकृपेचे । बळ द्यावे दृढइच्छेचे ॥९॥विनायक म्हणे बळ । मज द्यावे श्री स्नेहाळ ॥१०॥==गुरुवार ता. ४-१२-१९३०उत्सव तुमचा जवळि आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥आमुचे प्रिय करण्यासी । हित आमुचे साधण्यासी ॥२॥स्वामिकार्य करवावे । आम्हांलागी बळ द्यावे ॥३॥समर्थाचेद आम्ही दास । तैसेच व्हावे आम्ही खास ॥४॥आम्हांपाशी दैन्य नाही । विपत्ति दु:ख कांही नाही ॥५॥आम्हां विघ्ने न बाधती । कोण कांही करुं न शकती ॥६॥प्रतिबंध दूर होतो । आनुकुल्ये प्रगटती ॥७॥आम्ही जेथे तेथे विजयी । प्रगट देव आमुच्या ह्रदयी ॥८॥आमुचा सदाच सन्मान । ठावा नाही अपमान ॥९॥इंद्रचंद्र देव सारे । साहाय्य देती आम्हां त्वरे ॥१०॥सकळ ब्रह्मांड सहाय । प्रसन्न आम्हां गुरुराय ॥११॥आमुच्या वैभवासी मिति । नाही कोठे या जगती ॥१२॥समर्थाचे समर्थदास । आमुची पुरतसे आस ॥१३॥विनायक म्हणे धरिला । निर्धार हा आम्ही भला ॥१४॥ N/A References : N/A Last Updated : February 03, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP