मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|उत्सवाची मागणी| बालभावाची मागणी उत्सवाची मागणी विषय उत्सवाची मागणी बलसमृद्धि व दु:संगनाशाची मागणी आमुच्या मनासम होय बालभावाची मागणी विघ्ननाशाची मागणी करुणदेवास विनंति आनुकूल्य मागणी उत्सवाची मागणी - बालभावाची मागणी श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन बालभावाची मागणी Translation - भाषांतर गुरुवार ता. ५-६-३०उत्सवकार्य तूझे जवळि पातले । तरी सिद्ध केले पाहिजे की ॥१॥आम्हांसाठी कार्य येथे सिद्ध करा । आम्हांते उद्धरा वासुदेवा ॥२॥आमुचीया पायां व्हावया निष्कृती । बनवाया मति शुद्ध देवा ॥३॥कार्य निमित्ताने भजन करवा । स्तवन वदवा निजकीर्ति ॥४॥काव्यस्फ़ूर्ति द्यावी यशे वर्णवावी । कथा करवावी गुरुराया ॥५॥गुण गाववावे आम्हां अनुग्रहावे । संपन्न करावे आम्हांलागी ॥६॥ज्योति प्रगटवावी आमुच्या चित्तांत । आम्हां अनुवृत्त करावे की ॥७॥विषयाच्या छंदे आम्ही तुज गावे । रंगोनियां जावे तूझ्याठायी ॥८॥वासना उठावी तूझीच आम्हांसी । औत्कत्ठ्य मनासी तूझे द्यावे ॥९॥कार्यामाजी भर आम्हांलागी यावा । उठाव बरवा व्हावा आम्हां ॥१०॥लहानासम व्हावे छंदाते धरावे । तुज वागवावे ह्र्दयांत ॥११॥पुन्हां पुन्हां पुन्हां केलेच करावे । नाचावे रंगावे उंडारावे ॥१२॥बालभाव आम्हां द्यावा उत्सवांत । रहावे क्रीडत तूझ्यापाशी ॥१३॥निर्लज्ज बनावे जगा विसरावे । तूज न सोडावे कांही झाल्या ॥१४॥तुज बिलगावे लोटल्या न जावे । प्रमत्त बनावे तुझे ठायी ॥१५॥विनायक प्रार्थी ऐसा रंग करा । रंगवा पामरां आम्हांलागी ॥१६॥==वासना कथिली आमुच्या मनिंची । कार्यसिद्धतेची दत्तात्रेया ॥१॥स्वये प्रगटावे कार्य करवावे । यजमान व्हावे कार्यामाजी ॥२॥निज इच्छे आम्हां नाचवा खेळवा । स्तवन गाववा स्वीय देवा ॥३॥साधनाचा करा सुकाळ कार्यात । कार्य अभिमत बहु व्हावे ॥४॥नाविन्य असावे भव्यत्व असावे । रमणीय व्हावे कार्य तूझे ॥५॥जैसी जैसी इच्छा आमुच्या मनाची । ओढी ह्रदयाची तैसे व्हावे ॥६॥साक्षात्कार तैसा असो चमत्कार । असो अवसर तेजालागी ॥७॥पुण्ये प्रगटावी प्रगटावे देव । सर्व शुभ भाव प्रगटावे ॥८॥प्रगटाव्या देवी ज्या कां आदिशक्ति । भक्ति ज्ञान विरक्ति प्रगटावी ॥९॥प्रगटावा येथे श्रीवेदपुरुष । तैसा सहस्त्रशीर्ष पुरुष देवा ॥१०॥तैसा पुरुषोत्तम प्रगटोनी येवो । येथे प्रीति पावो तूझ्या कार्यी ॥११॥काव्य प्रगटावे विद्या प्रगटावी । सरस्वती देवी प्रगटावी ॥१२॥प्रगटावे तैसे ब्रम्हणस्पति देव । कार्याचे वैभव वाढवाया ॥१३॥प्रगटावे येथे गणांचे गणपति । तैसे बृहस्पति प्रगटावे ॥१४॥प्रगटावी येथे तीर्थ क्षेत्रे सारी । पुण्यस्थळ तरी प्रगटावी ॥१५॥जी जी पुण्ये जाणा महात्म्ये जगती । तव कार्याप्रती यावी सर्व ॥१६॥यावा सह्यगिरी पश्चिम सागर । वृक्ष औदुंबर प्रगटावा ॥१७॥नर्मदेचे तीर तैसे गरुडेश्वर । प्रगटो साचार तुझ्या कृपे ॥१८॥गंधर्व नगर नृसिंह वाटिका । तैसे क्षेत्र जे का औदुंबर ॥१९॥प्रगटवी येथे तैसे कृष्णातीर । संगम प्रिय थोर तुज जो का ॥२०॥सकळ प्रगटावे निजकार्यास्तव । गुरुदत्त देव प्रार्थना है ॥२१॥न्यून येथे कांही मुळी न पडो द्यावे । आम्हांते करावे अधिकृत ॥२२॥अन्नपूर्णा येथे स्वये प्रगटावी । अन्नपूर्ति व्हावी थोर नाथा ॥२३॥लक्षुमी प्रगटावी निधि प्रगटावे । आनुकूल्य व्हावे सर्व कार्या ॥२४॥वित्त बळ द्यावे द्यावे मनुष्य बळ । आह्मांते सबळ करावे की ॥२५॥विनायक म्हणे सर्व समृद्धता । करा भगवंता निजकार्यी ॥२६॥ N/A References : N/A Last Updated : February 03, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP