उत्सवाची मागणी - आमुच्या मनासम होय

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


शुक्रवार ता. १३-१२-१९२९
उत्सव तुझा जवळी आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥
म्हणुनि आम्ही शरण चरणां । घालितसो लोटांगणा ॥२॥
आमुच्या मनासम होय । आम्हांसाठी दत्तात्रेय ॥३॥
आमुची वृत्ति जेण खुले । ऐसे रुप धरी भले ॥४॥
ज्या ज्या वेळी कल्पना जी । तैसे रुप तेव्हां योजी ॥५॥
जैसी इच्छा तैसा मूर्त । होवोनि राहे भगवंत ॥६॥
भक्त-काम-कल्पद्रुम । सार्थ करी तव नाम ॥७॥
बाल युवा जरठ बन । खेळगडी येई होवोन ॥८॥
तुझ्यासंगे आम्ही खेळूं । तुजपाशी काढूं वेळूं ॥९॥
सोंगडी तूं होवोनियां । येथे येई द्त्तात्रेया ॥१०॥
विनायक चरणी शरण । वरद होय नारायण ॥११॥
==
शनिवार १४-१२-१९२९
उत्सव तुझा जवळी आला । पाहिजे तो सिद्ध केला ॥१॥
उत्सव तुझा कार्य तुझे । तेथे आहे काय माझे ॥२॥
होवो माझी पाप धूणी । प्रेम उपजो अंत:करणी ॥३॥
मन माझे तेथे भुले । वृत्ती माझी तेथे खुले ॥४॥
बुद्धि माझी विकसीत । रंगी रंग भरुनि जात ॥५॥
आनंदाचा भाव येतो । दुजेपण विसरतो ॥६॥
समरस होतो जीव । काय सांगुं ते वैभव ॥७॥
विकल्प सारे मावळती । पसरते मग शांति ॥८॥
शांतिचीये छायेखाली । जीवा झोप लागे भली ॥९॥
बिश्रांतीते जीव घेतो । जीवपण विसरतो ॥१०॥
आत्मस्वरुपांत लीन । रहातसे मग होऊन ॥११॥
म्हणुनि उत्सवाचा रंग । करि येथे सर्व दंग ॥१२॥
विनायक विनवीतो । कार्य-सिद्धीते मागतो ॥१३॥
==
रविवार ता. १५-१२-१९२९
उत्सव तुझा उदईक । प्राप्त झाला विश्वपालक ॥१॥
आमुचा तो महासण । आनंदले अंत:करण ॥२॥
उजाडले कधी होय । पाहिन कधी दत्तात्रेय ॥३॥
उतावीळ झालो देवा । हेतु माझा पूर्ण व्हावा ॥४॥
प्रेमे तूज मी पूजीन । उपचार समर्पिन ॥५॥
तुझे यश मी गाईन । तुजपुढे मी नाचेन ॥६॥
सर्वदिन करिन सेवा । आवडीने मी केशवा ॥७॥
केला ऐसा संकल्प मी । धरीला असे मनी स्वामी ॥८॥
सांडोनिया सर्व लाज । गाईन मी देवा तुज ॥९॥
कोणासही न भीईन । निंदास्तुति अवगणीन ॥१०॥
सकळांत तूंच श्रेष्ठ । तूंच  मज एक श्रेष्ठ ॥११॥
मग कोणासी कां भ्यावे । कोणासी कां म्यां लाजावे ॥१२॥
कोणाचे मी काय खातो । काय कोणा लुबाडीतो ॥१३॥
भजने दु:ख कोणा देतो । स्वार्थ कोणाचा हरितो ॥१४॥
कोणाचे मी काय करितो । आवडीने तुज गातो ॥१५॥
विनायकाचा अभिमान । तुज असो दयाघन ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP