गुरुद्वादशी - रजकाची कथा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


रजक भक्त एक त्यासी कृपा करी । श्रीपाद नरहरी पूर्ण काम ॥१॥
भावे सेवा करी अंगण झाडीत । प्रभुसी वंदित नित्य नेमे ॥२॥
ऐसे किती दीन चालविला क्रम । भक्त तो परम श्रीपादांचा ॥३॥
कृष्णातीरी आला एक यवन राजा । दळ्भार बोजा घेवोनिया ॥४॥
जल क्रीडनार्थ पातला भूपति । स्त्रियांते सांगती घेवोनियां ॥५॥
पाहोनी वैभव कांक्षा झाली मना । कोणत्या साधना येणे केले ॥६॥
म्हणोनि वैभव भोगितो हा राजा । मज कां गुरुराजा दे ना ऐसे ॥७॥
ऐसे मनी आले दुश्चित्त जाहला । भाव समजला श्रीपादांसी ॥८॥
वंदितां म्हणती सुखे राज्य, भोग । जोवरि विराग प्राप्त होय ॥९॥
इह की पुढती भोगसी हे सांग । कैसे अंतरंग तुझे होय ॥१०॥
रजक बोलत वार्धक्य शरीरी । तरी भवांतरी भोगिन मी ॥११॥
बाळाभ्यासी भोग भोगीन मी चांग । परी मज दंग करुं नये ॥१२॥
शेवटी दर्शन तुमचे मज व्हावे । मजला तारावे म्हणतसे ॥१३॥
तथास्तु म्हणोनि देती आशीर्वाद । श्रीपाद वरद होवोनियां ॥१४॥
राज्य तो पावला जन्मी पुढलिया । अंती दर्शन तया देती गुरु ॥१५॥
विनायक म्हणे अनंत महिमा । बोलण्याची सीमा होत असे ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP