गुरुद्वादशी - श्रीपादांचे पूर्व चरित

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


करुंया स्मरण श्रीकृष्णातीराचे । कुरवपुराचे स्मरण करुं ॥१॥
धन्य कूर्म गड्डी जेथे श्रीपादराव । प्रगटिती वैभव आपुले की ॥२॥
पिठापूरी जन्म तीर्थासी संचार । गोकर्णासी थोर प्रीति जाणा ॥३॥
गोकर्ण क्षेत्रासी केले अनुष्ठान । पातले नेमून कुरवपूरा ॥४॥
पुण्य पावन क्षेत्र कृष्णातीर जाणा । प्रसिद्ध आपणां तेथे केले ॥५॥
विनायक म्हणे करणे स्मरण । आज पुण्य-दिन पुण्यतिथीचा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP