मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध| अध्याय ८१ वा उत्तरार्ध दशम स्कंधाचा ( उत्तरार्ध ) सारांश अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा अध्याय ८१ वा अध्याय ८२ वा अध्याय ८३ वा अध्याय ८४ वा अध्याय ८५ वा अध्याय ८६ वा अध्याय ८७ वा अध्याय ८८ वा अध्याय ८९ वा अध्याय ९० वा स्कंध १० वा - अध्याय ८१ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय ८१ वा Translation - भाषांतर ॥८८४॥निवेदिती शुक सांदिपनीगृहीं । अस्तां जें पाही घडलें तेंचि ॥१॥आठवूनि वृत्त एकमेकांप्रति । प्रेमें निवेदिती कौतुकानें ॥२॥पुढती सर्वान्तर्यामी सर्वज्ञाता । भाव, भाविकांचा ओळखूनि ॥३॥ब्रह्मज्ञांचा योग-क्षेम वहावया । अवतार जया श्रीहरीसी ॥४॥तया सुदाम्याची पाहूनि ती स्थिति । दया माधवासी येई बहु ॥५॥वासुदेव म्हणे कृपेनें भक्तासी । पाही जगजेठी तयावेळी ॥६॥॥८८५॥मग कौतुकानें कराया विनोद । म्हणे काय मज आणिलेसी ॥१॥अल्पही तूं देतां पावेन संतोष । सद्भक्ताचें अल्प, बहु होई ॥२॥सर्वस्वही जरी देईल अभक्त । तरी न संतोष मजलागीं ॥३॥पत्र, फल, पुष्प कांहीही भक्तीनें । अर्पितां प्रेमानें स्वीकारितों ॥४॥वासुदेव म्हणे निवेदिती शुक । दारिद्र्याचें दु:ख कठिण बहु ॥५॥॥८८६॥उदकही देतां पावेन मी ऐसें । कथियेलें होतें ब्रह्मनिष्ठा ॥१॥परी जी आणिली सुदाम्यानें भेट । देववेन त्यास कृष्णासी ती ॥२॥कमलापतीसी पृथुकांच्या कण्या । अर्पू केंवी मना ऐसा भ्रम ॥३॥गोंधळूनि मान घालुनियां खालीं । स्तब्ध तयावेळीं बैसे विप्र ॥४॥वासुदेव म्हणे अर्पितां पृथुक । पाहुनि अच्युत चिंती मनीं ॥५॥॥८८७॥मित्र माझा थोर सदा निरपेक्ष । अपेक्षी न मज काहींचि तो ॥१॥केवळ साध्वीचे हेतु पुरवाया । पातला या ठाया विप्रश्रेष्ठ ॥२॥मग कासयासी अर्पीले पृथुक । मागणें जयास नसे कांही ॥३॥परी देवातेंही दुर्लभ जे ऐसी । अर्पीन संपत्ति तयासी मी ॥४॥मग सन्मित्राचा पदर स्वयेचि । धुंडाळूनि काढी पृथुक हरी ॥५॥वासुदेव म्हणे कायरे हें एथें । बोले अत्यादरें यदुनाथ ॥६॥॥८८८॥पाहूनि पृथुकां बोलला श्रीपति । ब्रह्मांडाची तृप्ति करितील हे ॥१॥मग एक मुष्टि भक्षिली स्वयेचि । भक्षिणार दुजी मुष्टि तोंचि ॥२॥अदिमाया देवी कर धरी त्याचा । देवा, पुरे आतां कृपा करा ॥३॥एकाचि मुष्टीनें सर्वस्व अर्पाल । आता विसराल मजलागीही ॥४॥बोलुनि रुक्मिणी पृथुक काढुनि । घेई करांगूनि श्रीहरीच्या ॥५॥वासुदेव म्हणे भक्षूनि पृथुक । जगाचा चालक तृप्त झाला ॥६॥॥८८९॥तया रात्रीं विप्र कृष्णमंदिरांत । पक्वान्नें विविध भक्षी प्रेमें ॥१॥इंद्रभुवनींच आहेसें त्या वाटे । सूर्यउदयातें अन्यदिनीं ॥२॥घेऊनि निरोप विश्वपालकाचा । सुधारिला साचा निजमार्ग ॥३॥पोचवावयासी जाई त्या श्रीपति । येई पुनरपि त्वरीत म्हणे ॥४॥अंती आलिंगन अभिनंदनादि । होऊनि गृहासी जाती दोघें ॥५॥लाजूनि विप्रानें याचिलें न कांही । स्वयें श्रीकृष्णाही वदलाचि न ॥६॥वासुदेव म्हणे तृप्त दर्शनानें । होऊनियां म्हणे विप्र ऐका ॥७॥॥८९०॥अलिंगिलें मज भाग्यहीना कृष्णें । त्या विश्वकांतानें अतिप्रेमें ॥१॥कोठें मी पातकी, कोठें जगत्पती । मंचकी मजसी बैसविलें ॥२॥बंधुसम माझा जाहला गौरव । पट्टराणी मज चवरी ढाळी ॥३॥आश्चर्य हें मज अर्ध्यपाद्यादिकें । पूजूनि संतोषे सगुणब्रह्म ॥४॥वासुदेव म्हणे पुढती जें विप्र । वदे तें श्रेष्ठत्व दावी त्याचें ॥५॥॥८९१॥काय वानूं त्याचे थोर उपकार । अर्पिलें न द्रव्य भजसी तेणें ॥१॥नारायणें जया पूजिलें मजसी । अशक्य तयासी नसे कांहीं ॥२॥ऋध्दि-सिध्दि जेथ भरिताती पाणी । मोक्षही जोडूनि कर उभा ॥३॥असूनियां ऐसें धनही क्षुल्लक । अर्पिलें न मज कृपावंतें ॥४॥कारण होईन उन्मत्त त्या धनें । हेंचि नारायणें चिंतियेलें ॥५॥वासुदेव म्हणे चिंतीत यापरी । पातला जवळी निजग्रामाच्या ॥६॥॥८९२॥तेज:पुंज पुर, पाहिला तो ग्राम । वेष्टियेला जाण विमानांनीं ॥१॥ग्राम जो तें पुर पाहिलें विप्रानें । अपूर्व उद्यानें अवलोकिलीं ॥२॥कोकिळांचे शब्द विलासी दांपत्यें । हिंडताती तेथें पाही विप्र ॥३॥विस्मयचकित होऊनियां तर्क । करी तोचि तेथ नवल घडे ॥४॥देवांगनांसम सालंकृत स्त्रिया । पुरुषही तयाठाई येती ॥५॥स्वागत विप्राचें करिती आनंदे । लक्ष्मी श्रीविष्णूतें सन्मानी तैं ॥६॥विप्रासी विप्रस्त्री सन्मानी, ती भेट । होई उभयांस अलौकिक ॥७॥वासुदेव म्हणे आनंद तो श्रेष्ठ । वर्णावया शब्द असमर्थ हे ॥८॥॥८९३॥उभयांच्या नेत्री येती अश्रुधारा । कंठही दाटला नुमटे शब्द ॥१॥झांकूनियां नेत्रे मनानेंचि अंतीं । विप्रातें आलिंगी कांता त्याची ॥२॥लोकोत्तर दीप्ति सभोवतीं दासी । कांतेच्या, विप्रासी नवलप्रद ॥३॥पुढती वाजत-गाजत सुदामा । पातला सना अत्यानंदें ॥४॥इंद्रभुवन तो पाहिलें मंदिर । रत्नस्तंभ थोर थोर तेथें ॥५॥दुग्धफेनवर्ण शय्या जागोजाग । सुवर्णमंडीत हस्तिदंती ॥६॥विंझुणा चंवर्या पाहूनि अपूर्व । म्हणे वासुदेव तोष विप्रा ॥७॥॥८९४॥अलौकिक छत मौक्तिकांचे हार । भित्ति सभोंवाअ स्फटिकांच्या ॥१॥भूमीवरी इंद्रनीलाची स्वस्तिकें । रत्नप्रभा फांके चोंहीकडे ॥२॥सुंदर युवती दक्ष निजकाजी । गूढ सुदाम्यासी न कळे कांहीं ॥३॥अंतीं श्रीहरीची कृपा हे जाणूनि । प्रेमाश्रु लोचनीं येती त्याच्या ॥४॥उद्गार तयाच्या येती मुखांतूनि । ’ वर्णवें न जनीं हरिची कृपा ’ ॥५॥काय हें आश्चर्य भक्षूनि पृथुक । अर्पिलें प्रत्यक्ष निजवैभव ॥६॥वार्ताही न कांहीं म्ज निवेदिली । गुप्तता राखिली केवढी ही ॥७॥वासुदेव म्हणी सुजनांचे दान । फेडूनिही दैन्य मूक असे ॥८॥॥८९५॥थोरही दान ते मानिताती अल्प । वाच्यता कांहींच न रुचे तेणें ॥१॥भक्तीनें अर्पिलें अगाध ऐश्वर्य । स्पष्ट हा प्रत्यय सुदाम्यासी ॥२॥भक्तवात्सल्य हे केवळ प्रभूचें । अढळ असूंदे पदी भक्ति ॥३॥उन्माद धनानें जगतांत येई । संपत्ति नको ही तेणें मज ॥४॥चिंतूनि यापरी राहुनि अलिप्त । भोगिलें वैभव सुदाम्यानें ॥५॥देहाहंभावातें त्यागूनियां अंती । पावला सद्गती परम भाग्यें ॥६॥पृथुकोपाख्यान श्रवण-मनन । करितां, साधन सिध्दि पावे ॥७॥वासुदेव म्हणी कर्मबंधमुक्त । होई ब्रह्मानिष्ठ चिंतनें या ॥८॥ N/A References : N/A Last Updated : December 14, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP