मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध| अध्याय ७५ वा उत्तरार्ध दशम स्कंधाचा ( उत्तरार्ध ) सारांश अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा अध्याय ८१ वा अध्याय ८२ वा अध्याय ८३ वा अध्याय ८४ वा अध्याय ८५ वा अध्याय ८६ वा अध्याय ८७ वा अध्याय ८८ वा अध्याय ८९ वा अध्याय ९० वा स्कंध १० वा - अध्याय ७५ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय ७५ वा Translation - भाषांतर ॥८४१॥निवेदिती शुक राजसूयामाजी । विभागिली होतीम सकल कार्ये ॥१॥महानसाध्यक्ष होता भीमसेन । तेंवी सुयोधन धनाध्यक्ष ॥२॥आदर -आतिथ्य करी सहदेव । पुरवी नकुळ साहित्यातें ॥३॥अर्ध्यपाद्य, अनुलेपन तें पार्थ । प्रक्षाळी अच्युत विप्रपाद ॥४॥पानें वाढी कृष्णा, दानाध्यक्ष कर्ण । सात्यकि, विकर्ण, हार्दिक्यादि ॥५॥विदुरासमेत होते अन्य काजी । केली यज्ञासिध्दि श्रीहरीनें ।\६॥वासुदेव म्हणे अवभृथस्नान । वर्णिती तें जाण मुनि आतां ॥७॥॥८४२॥मृदंग-दुंदुभिआदि वाद्यनाद । वारांगनानृत्य गवई गान ॥१॥जयजयशब्दें कोंदलें गगन । चतुरंग सैन्य शोभे बहु ॥२॥नगराबाहेरी येती सर्व राजे । ध्वज-पताका ते गगनशोभा ॥३॥यदु, सृंजय तैं कांबोज, केकय । कुरु तै कोसल नृप सर्व ॥४॥धर्माच्या मागूनि जाती सैन्यासवें । तदा कंप पावे धरणीदेवी ॥५॥वेदघोषें विप्र भेदिती नभातें । वर्षिती सुमांते तदा देव ॥६॥परस्परांवरी सौगंधिक द्रव्यें । सिंचिताती हर्षे नारी-नर ॥७॥वासुदेव म्हणे दृष्य तें पहाया । विमानीं शोभल्या देवांगना ॥८॥॥८४३॥शिबिका-रथस्थ बहु राजस्त्रिया । येती गंगातटा स्थानालागीं ॥१॥भावंडे सख्या त्यां गोरससिंचनें । भिजविती प्रेमें मोदभरें ॥२॥सलज्ज त्या तदा अद्वितीय तेजें । विराजूनि, हर्षे करिती तेंचि ॥३॥पिचकारीनें त्या उडविती जल । आनंदे अपार करिती क्रीडा ॥४॥पत्न्यांसवें धर्म मूर्तिमंत यज्ञ । प्रगटला जाण ऐसें भासें ॥५॥वासुदेव म्हणे पत्नीसंयाजादि । करिताती विधि ऋत्विज तैं ॥६॥॥८४४॥अवमृथस्नानविधिही करुनि । धर्मालागीं मुनि गंगेमाजी ॥१॥द्रौपदीसमेत घालिताती स्नान । इहपरस्वन वाद्यांचा तैं ॥२॥देव, ऋषि तेंवी पितर, मानव । करिती वर्षाव सुमनांचा ॥३॥धर्मामागोमाग सकलही जन । करितांही स्नान गंगेमाजी ॥४॥अवभृथस्नानें ब्रह्महत्याकृत । पातकही नष्ट होत असे ॥५॥वस्त्र अलंकार, लेऊनि धर्मानें । अर्पियेलीं प्रेमें सकलां वस्त्रें ॥६॥वासुदेव म्हणे आप्त- सह्र्दांचा । सत्कार थाटाचा करी धर्म ॥७॥॥८४५॥वस्त्रअलंकारयुक्त । बहु शोभले समस्त ॥१॥पुढती सकलां निरोप । स्वयें देई धर्मराज ॥२॥वियोग न सहन त्यासी । घेई ठेऊनि आप्तांसी ॥३॥सांबादिकांसी धाडून । स्वयें राही तेथें कृष्ण ॥४॥ऐसा यज्ञ तो दुर्घट । पार नेई यदुनाथ ॥५॥वासुदेव म्हणे कृपा । सांठा सर्व सामर्थ्याचा ॥६॥॥८४६॥संपत्ति मदांध करी सकलांसी । मत्सरें कोणाची मति भ्रष्टें ॥१॥मस्तकभ्रमणें दुष्टवृत्ति वाढे । स्थिर विवेक्याचें चित्त राही ॥२॥ऐशा विवेक्यांचा नीच करी द्वेष । जनी तैं अनर्थ होई बहु ॥३॥लोकोत्तर ऐसें वैभव धर्माचें । मत्सरानें पेटे दुर्योधन ॥४॥रात्रंदिन धर्मनाशार्थ तो यत्न । करीतसे, भान न उरे कांहीं ॥५॥वासुदेव म्हणे अपूर्व संपत्ति । पाहूनि दुष्टाची निद्रा उडे ॥६॥॥८४७॥अंतःपुरीं देव-दानव संपत्ति । द्रौपदीच्या त्यासी दिसली बहु ॥१॥तदा द्रव्यासवें द्रौपदीची इच्छा । होऊनियां चित्ता न पडे चैन ॥२॥पुढती एकदां मयसभेमाजी । स्वारी नृपाळाची विराजली ॥३॥भोंवतीं भीमादि बाधव तैं कृष्ण । सुहास्य वदन बसले होते ॥४॥कृष्णस्त्रियाआदि बहुत ललना । शोभविती स्थाना आपुलाल्या ॥५॥वासुदेव म्हणे इतुक्यांत दुष्ट । पातले सभेंत दुष्टभावें ॥६॥॥८४८॥दु:शासनादिक बांधवांसमेत । येई खड्गहस्त दुर्योधन ॥१॥दटावूनि क्रोधें द्वारपाळांप्रति । येई सभेमाजी उन्मत्त तो ॥२॥परी जळाप्रति मानूनियां स्थळ । स्थळाप्रति जळभ्रम पावे ॥३॥सांवरुनि वस्त्र घेई तो सुस्थळीं । न कळतां जळीं चिंब होई ॥४॥भ्रमामाजी ऐसा पडतां भीमादि । हांसले तयासी उपहासानें ॥५॥स्त्रियाही हांसतां दापिलें धर्मानें । प्रोत्साहन कृष्णें दिधलें तयां ॥६॥वासुदेव म्हणे पाहूनि तें, हास्य । माजलें बहुत सभेमाजी ॥७॥॥८४९॥खळवला तदा दुष्ट दुर्योधन । पावूनि अपमान निघूनि जाई ॥१॥निरोप धर्माचा न घेतांचि जाई । खिन्न तदा होई धर्मराज ॥२॥अनर्थचि आतां जाणिला ज्ञात्यांनीं । श्रीकृष्ण होऊनि बसला मूक ॥३॥वासुदेव म्हणे द्वेषचि या मूळ । खवळला खळ व्याघ्र जैसा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 12, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP