मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध| अध्याय ५५ वा उत्तरार्ध दशम स्कंधाचा ( उत्तरार्ध ) सारांश अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा अध्याय ८१ वा अध्याय ८२ वा अध्याय ८३ वा अध्याय ८४ वा अध्याय ८५ वा अध्याय ८६ वा अध्याय ८७ वा अध्याय ८८ वा अध्याय ८९ वा अध्याय ९० वा स्कंध १० वा - अध्याय ५५ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १० वा - अध्याय ५५ वा Translation - भाषांतर ॥६६६॥निवेदिती शुक कृष्णासी पुढती । पुत्र होई तोचि कामदेव ॥१॥दहन पावल्यापासूनि तयातें । प्रत्यक्ष नव्हतें रुप कांही ॥२॥तदाप्रभृति तो वासुदेवाश्रय - । करुनियां, स्थिर होता तेथें ॥३॥वासुदेव तोचि जाणुनियां कृष्ण । घेई तेथे जन्म कामदेव ॥४॥कृष्णाचि तो दुजा वाटला जनांसी । प्रद्युम्न तयासी नाम ख्यात ॥५॥शंबरासुरासी कामदेवजन्म । कथिलें जाऊन नारदानें ॥६॥वासुदेव म्हणे असुर तैं क्रोधें । येई द्वारकेतें क्षणामाजी ॥७॥॥६६७॥कामदेवाचिया हस्त्रं । मृत्यु होता असुरातें ॥१॥तेणें कळतांचि वृत्त । गुप्तरुपें येई दैत्य ॥२॥दश दिन होण्यापूर्वी । जाई सूतिकासदनीं ।\३॥उचलूनि तान्हया बाळा । नेऊनियां सिंधूतीरा ॥४॥फेंकूनियां उदकीं बाळ । गांठी सुखानें स्वस्थळ ॥५॥वासुदेव म्हणे लीला । अतर्क्यचि पुढती ऐका ॥६॥॥६६८॥बलवान एका मत्स्यें तं बालक । गिळिलें क्षणांत पडतां जळीं ॥१॥धीवराच्या जालीं मत्स्य तो गवसे । अपूर्व तयाचें होतें तेज ॥२॥यास्तव धीवर शंबरासुरासी । मत्स्य तो अर्पिती लाभला जो ॥३॥पाचकाच्या करीं देती कारभारी । छेदिती सत्वरी तयासी ते ॥४॥मत्स्याच्या उदरीं पाहूनि बालक । जाहले विस्मित पाककर्ते ॥५॥वासुदेव म्हणे मायावतीप्रति । बालक अर्पिती पाचक तें ॥६॥॥६६९॥मदनदहन जाहलियावरी । निराधार झाली रतिदेवी ॥१॥कामदेवकरें शंबराचा वध । ऐकियेलें वृत्त रतिनें यदा- ॥२॥तदा असुराच्या पाककर्मी साह्य । होऊनि वास्तव्य करी तेथें ॥३॥दिव्य बालकासी पाहूनि शंकित । होई, तों नारद प्रगट होती ॥४॥चिन्हें बालकाचीं दावूनि नारद । काम हा प्रत्यक्ष म्हणती तिज ॥५॥पुढती सकल वृत्त निवेदूनि । नारद स्वस्थानी निघूनि जाती ॥६॥वासुदेव म्हणे तया बाळावरी । मायावती करी प्रेम बहु ॥७॥॥६७०॥अल्पकाळें बाळ तारुण्यांत येई । आकर्षूनि घेई युवतीचित्त ॥१॥रतीतेंही रतिक्रीडेची वासना । पाहूनियां मना सौंदर्य तें ॥२॥सलज्ज कटाक्ष फेंकितां प्रद्युम्न । बोलला वचन ऐका काय ॥३॥माते, कां वो ऐसी भ्रमिष्ट तूं होसी । भलतीच दृष्टि धरिसी केंवी ।\४॥मायावती तदा सकळ वृत्तांत । निवेदी बाळास सविस्तारें ॥५॥म्हणे प्रियतमा, पति तूं मन्मथ । वधीं या दैत्यास स्वसामर्थ्ये ॥६॥मायावी हा, तूंही जाणितोसी माया । समजें, शिकवीन त्या तुजलागी मी ॥वासुदेव म्हणे वेळ येतां हरी । अलौकिक करी घटना सर्व ॥८॥॥६७१॥सत्वरी या विद्या संपादूनि प्रिया । शंबर बधावा निजातेजानें ॥१॥पुत्रवियोगानें व्याकुळ त्वन्माता । फोडी हंबरडा धेनूसम ॥२॥यास्तव विलंब त्यजूनि दैत्यासी । वधूनि मातेची भेट घेई ॥३॥वासुदेव म्हणे मायावती ऐसें । कथी प्रद्युम्नातें सकल वृत्त ॥४॥॥६७२॥मायावती महामाया प्रद्युम्नासी । शिकवी, विद्येची महती थोर ॥१॥प्रभाव कोणाचा न चले त्यायोगें । स्फूर्ति प्रद्युम्नातें प्राप्त झाली ॥२॥पुढती प्रद्युम्न पाचारी दैत्यासी । तदा क्रोध त्यासी येई बहु ॥३॥डिवचितां सर्प करी जै फूत्कार । त्यापरी शंबर धांवें क्रोधें ॥४॥गदाघातें करी ताडन बाळासी । गर्जनेचा नभी घुमला ध्वनि ॥५॥मयासुरी विद्या स्वीकारुनि दैत्य । होऊनियां गुप्त नभीं जाई ॥६॥वासुदेव म्हणे वर्षूनियां शर । प्रद्युन्मा शंबर बंधूपाहे ॥७॥॥६७३॥परी महामाया संरक्षी बाळासी । आसुरीविद्येची न चले शक्ति ॥१॥गुह्यक- पिशाच-माया सोडी दैत्य । परी होती व्यर्थ सकलही त्या ॥२॥अंती दैत्यशिर छेदिलें प्रद्युम्नें । वर्षिलीं सुमनें देवतांनी ॥३॥पुढती प्रद्युम्न मायावतीसवें । येई नभोमार्गे द्वारकेसी ॥४॥मेघासम येती कृष्णांत:पुरांत । श्रीकृष्णस्त्रियांस पडला भ्रम ॥५॥वासुदेव म्हणे कृष्णासम छबि । होती प्रद्युम्नाची हुबेहुब ॥६॥॥६७४॥घन:श्याम सुंदर तो पीतांबरधारी । मंदहास्ययुक्त मुख आरक्तता नेत्री ॥१॥नील कुंतलांची शोभा पाहूनि मस्तकीं ॥कृष्णाचि तयासी कृष्णस्त्रियाही मानिती ॥२॥सलज्ज होऊनि उभ्या राहिल्या त्या सर्व ॥न्याहाळूनि अवलोकितां न दिसें कौस्तुभ ॥३॥वत्सलांछनही यदा दिसेना तयांतें ॥सन्निध तयाच्या तदा पातल्या कौतुकें ॥४॥इतुक्यांत रुक्मिणीसी फुटे प्रेमपान्हा । अरविंदाक्ष हा कोण असावा कळेना ॥५॥कोण ललना ही, बाळ माझा या वयाचा ॥असेल तो कोठेंतरी, असाचि भासता ॥६॥वासुदेव म्हणे देवी बोलणें चालणें । म्हणे पतीसमचि हें हांसणीं पाहणें ॥७॥॥६७५॥काय चमत्कार नकळे हा मज । माझाचि हा पुत्र वाटतसे ॥१॥वामबाहु माझा पावतो स्फुरण । अधिकचि प्रेमपान्हा येई ॥२॥इतुक्यांत कृष्ण मायबापांसवें । त्या स्थळी पातले जाणुनियां ॥३॥रति-मन्मथांसी पाहूनि हरीही । विस्मयानें होई स्तब्ध स्वयें ॥४॥नारदमुनि तो येती तयास्थानी । वृत्तांत हांसूनि कथिती सर्व ॥५॥नष्टापुत्रप्राप्ति पाहुनि आनंद । होई सकलांस तयावेळी ॥६॥आलिंगिलें बाळा वडिलजनांनी । आनंद गगनीं न समावे ॥७॥कृष्णस्त्रियाही त्या पाहूनि मोहित । इतरांची तेथ कथा काय ॥८॥वासुदेव म्हणे यापरी प्रद्युम्न । वृत्तांतें सन्मन तोष पावे ॥९॥ N/A References : N/A Last Updated : December 11, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP