॥ श्री सद्‍गुरु बाबांची आरती ॥

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


आरती सद्‍गुरुराया । ओवाळीन प्रेमे काया ।
किसनगिरी नाम तुझे । असे त्रिमूर्तीची छाया ॥धृ०॥

वृत्ति तुझी दुर्वासापरी । बहु कठिण निर्धारी ।
तपश्चर्या केली जिवनीं । दुस्तर पावकापरी ॥१॥ आरती ॥

औदुम्बर तरुखाली । अवधूत साक्षात्कार झाला ।
करुनिया शक्तिपात । गोरविली तुझी काया ॥२॥ आरती ॥

दीन-दु:खी व्याधिग्रस्त । पिडियले त्रिविध तापा ।
करुनिया सकळ शांती । तोषविले इहलोका ॥३॥ आरती ॥

निष्कलंक जीवन तुझे । धन्य श्रीगुरुराया ।
श्रीगुरुदास ठेवी माथा । तव चरणावरता ॥४॥ आरती ॥

॥ श्री सद्‍गुरु बाबांचे स्तोत्र ॥

धन्य झालो तव गुण गाता । किसनगिरी देवा ।
भाविकांना उध्दरिशी तूं । पूर्ण मेघ:शामा ॥धृ०॥

गोधेवावी येथे प्रगटोनि त्वा । वंशा भूषविले ।
कुल-वंशाचा त्याग करोनि । प्रभुला तोषविले ॥१॥

दिन-रात्री तप ते केले । प्रवरेला ।
औदुम्बरासी पालवी आली । ठाव्य असे सर्वा ॥२॥

वरद मिळाला शिव -शनींचा । ताराया जगता ।
मार्कंडेयाने दिधला ठेवा । भाग्य तुझे संता ॥३॥

दत्तात्रयाने मुक्त केले । प्रगटोनि अव्यक्यता ।
दिगंबर मूर्ति अवधूत दत्त । शोभे तव माथा ॥४॥

सहज लिलेनें अवगुण हरिसी । आमुचे तू देवा ।
संतपणाचे तेज ते तळपे । तव मंगल भावा ॥५॥

प्रवरातीरी देवगड क्षेत्री । वसवुनि अवधुता ।
भाविक प्रेमळ धावूनि येती । दर्शनाकरिता ॥६॥

अपार कार्य करुनि ठेविले । जनतेचा धाता ।
भूत-पिशाच्च रोगी जर्जर । तरती तव हाता ॥७॥

तूच आमुचा माता-धाता । अवघा भव हरता ।
श्रीगुरुदास ठेवी माथा । तव चरणावरता ॥८॥ धन्य० ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 07, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP