मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ४ था| अध्याय २३ वा स्कंध ४ था चतुर्थ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा स्कंध ४ था - अध्याय २३ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ४ था - अध्याय २३ वा Translation - भाषांतर १६८यापरी आपुलें कर्तव्य पाळून । चिंती वयोमान पृथुराजा ॥१॥पुत्रांच्या स्वाधीन करुनियां राज्य । कांतेसवें तप करण्या जाई ॥२॥वियोगें तयाच्या सकलांसी दु:ख । परी राव श्रेष्ठ निर्धाराचा ॥३॥कंद-मुळें, फळें, पर्णे तैं उदक । सेवून वायूच प्राशी अंतीं ॥४॥पंचाग्नीसाधनादिक क्लेश भोगी । सिद्ध योगमार्गी प्राणायामें ॥५॥वासुदेव म्हणे ऐसा तप:सिद्ध । होतांचि विशुद्ध, चित्त त्याचें ॥६॥१६९गेले कामक्रोधादिक । वासनांचे तुटले बंध ॥१॥ईशआराधना करी । कुमारांनीं जी कथिली ॥२॥ऐसी सवैराग्य भक्ति । जडतां होई ज्ञानप्राप्ति ॥३॥दृढबंध अहंकार । सकल संसाराचें मूळ ॥४॥भिन्न भिन्न मार्गे तोचि । भ्रष्ट करितो योग्यासी ॥५॥परी लाभतांही सिद्धि । उपजे न त्या आसक्ति ॥६॥नित्य ईशपदीं प्रेम । गुणगानीं रंगे मन ॥७॥अंतीं ब्रह्मरुप झाला । शरीराचा त्याग केला ॥८॥वासुदेव म्हणे कैसा । देह त्यागिला तें ऐका ॥९॥१७०गुदद्वारीं टांच लावूनियां बैसे । आकर्षी वायूतें मूलाधारीं ॥१॥पुढती क्रमानें लल्लाटीं तो नेई । ब्रह्मरंध्रीं जाई सावकाश ॥२॥भूतांमाजी भूतकार्ये करी लीन । जीवांत विलीन महत्तत्व ॥३॥पुढती जीवही ब्रह्मांत विलीन । करुनियां ब्रह्मरुप होई ॥४॥वासुदेव म्हणे कृतार्थता ऐसी । येई साधकासी ईशप्रेमें ॥५॥१७१‘अर्चि’ नृपाळाची कांता । महा साध्वी पतिव्रता ॥१॥नव्हतें पाऊल भूमीसी । स्पर्श पावलें कदापि ॥२॥सुकुमार तेचि वनीं । गेली तयांत रंगूनि ॥३॥पतिसेवाचि साधन । मानूनियां सेवामग्न ॥४॥अचेतन पतिदेह । ठेवूनियां चितेवर ॥४॥स्नान करुनि उदक । देई आपुल्या पतीस ॥५॥प्रदक्षिणा घाली तीन । पतिचरणातें वंदून ॥७॥पतिध्यानें अग्नीमाजी । प्रवेशतां देव राजी ॥८॥वासुदेव म्हणे ऐसी । होई कृतार्थ ती सती ॥९॥१७२पुष्पवृष्टि तदा होई तिजवरी । तुष्टल्या अंतरीं देवस्त्रिया ॥१॥धन्य धन्य अर्चि शब्द हें नभांत । उमटले स्पष्ट तयावेळीं ॥२॥पाहतां पाहतां आमुच्या समक्ष । जाई परमोच्च विष्णुपदीं ॥३॥पुण्यवतीची हे उन्नती प्रत्यक्ष । पाहावीच मात्र सुखें आम्हीं ॥४॥योग्यता न आम्हां म्हणती देवस्त्रिया । स्तविती मानवा पुण्यवंता ॥५॥मानव देहचि मोक्षाचें साधन । तेथ विषयमग्न होतां नाश ॥६॥देवस्त्रिया ऐसें बोलती तों अर्चि । परमोच्च पदासी प्राप्त झाली ॥७॥मैत्रेय बोलती विदुरा, हे कथा । गातां ऐकवितां पुरती काम ॥८॥वासुदेव म्हणे सद्गतिलाभार्थ । पृथूचें हें वृत्त गावें ध्यावें ॥९॥ N/A References : N/A Last Updated : November 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP